Submitted by Adm on 30 March, 2011 - 22:35
२०११ सालच्या क्रिकेट विश्वचषकाची अंतिम लढत २ एप्रिलला मुंबई येथे भारत आणि श्रीलंकेच्या संघांमध्ये होणार आहे.
हा धागा अंतिम लढतीच्या आधीची, दरम्यानची आणि नंतरची चर्चा करण्यासाठी...
चक दे इंडिया.... !!!!!!!!!!!!!!!
आला आला गुढी पाडवा |
भारतीय बॅटिंग चा जोर वाढवा |
मलिंगाचे यॉर्कर बडवा |
मुरलीची फिरकी तुडवा |
दिलशानचे स्ट्रोक्स आडवा |
लंका दहनचा इतिहास घडवा|
विजयी पताकेची गुढी चढवा ||
- Courtesy : DJ
मारू छक्के चौके आणि करु त्यांच्या दांड्ये गुल्ल!
आला आला भारत, टरकली लंकेची फुल्ल!!!!!!
जोर लगा के... दे घुमा के !!!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आदौ सचिनसेना इंग्रज दमनम्
आदौ सचिनसेना इंग्रज दमनम् हत्वा आफ्रिकं
विंडीज हरणं कांगारू मरणं पश्चात् पाकम् च लंकापुरी दाहनं
एदध्दी विश्वचषकं ||
इती मंदाररचित सचिनसेना विजयं
इती मंदाररचित सचिनसेना विजयं अल्पकाव्यं समाप्तं
सचिनेनमः महेंद्रायनमः आद्य क्रिकेटरायनमः
मन कशातचं लागत नाही, अदमास
मन कशातचं लागत नाही, अदमास क्रिकेटचा घ्यावा; माझ्या क्युबिक्लस मधे, मज दिसतात धावा :प
सही रे मंदार
सही रे मंदार
(१) श्रीलंकेविरूध्द नाणेफेक
(१) श्रीलंकेविरूध्द नाणेफेक जिंकल्यास भारताने पहिली फलंदाजी करावी. कोणत्याही परिस्थितीत नाणेफेक जिंकल्यास प्रथम क्षेत्ररक्षण करण्याची चूक करू नये.
(२) काल पाकड्यांचे प्रमुख अस्त्र समजल्या जाणार्या गुलवर पहिल्यापासूनच जोरदार हल्ला चढवून त्याला निकामी केले होते. तसेच श्रीलंकेविरूध्द मलिंगा आणि / किंवा मुरलीधरन विरुध्द पहिल्या षटकापासूनच जोरदार हल्ला चढवून श्रीलंकेला बॅकफूटवर जाण्यास भाग पाडावे.
(३) या सामन्यात श्रीलंका मेंडीसला बाहेर ठेवून कुलसेकराला आत आणेल. आपल्यापुढे अश्विनला घेऊन मुनाफ्/नेहराला बाहेर ठेवावे का हा प्रश्न आहे. लंकेकडे चांगले डावखुरे फलंदाज असल्यामुळे नेहराला खेळविल्यास फायदा होईल. त्यामुळे अश्विन किंवा मुनाफ हाच एकमेव प्रश्न शिल्लक आहे.
मिडल ऑर्डर बेभरवशाची म्हणून
मिडल ऑर्डर बेभरवशाची म्हणून तीनच गोलंदाज?<<<
२० overs should be shared by Viru, Yuvaraj, Raina, Yusuf(5X4 or 3X6+2), कारण एकदा आपण ढेपाळलो तर साऊथ अॅफ्रिका विरुध्द जी परिस्थिती झाली होती तसे नको व्हायला. :), पण हे सर्व स्लो बॉलर्स आहेत, इफ द पिच इस स्लग्गीश देन ओन्ली दे कॅन रेलिश. ईट ऑल डिपेन्ड्स ऑन हॉव द पिच टर्न्स, सीम ऑर स्पिन, हाच मोठा यक्ष प्रश्न आहे.
http://www.espncricinfo.com/i
http://www.espncricinfo.com/icc_cricket_worldcup2011/content/current/sto...
भाऊसाहेब--- तो मिसबाह आऊट
भाऊसाहेब---
तो मिसबाह आऊट होता होईना >> म्हमईकरजी, पण मिसबाह सारख्या अनुभवी व खंद्या फलंदाजाने खूप आधीच 'ओपन अप' व्हायला पाहिजे होतं असं नाही वाटत ? षटकामागे १२ धावा हव्या असताना शेवटच्या दोन फलंदाजाना घेऊन ५०-६० धांवा असल्या विकेटवर करायला थांबणं ही स्वतःची व संघाची फसवणूकच होती !
याला निषेधित भाषेत मॅच ----ग म्हणतात ना??
मुरलीधरन आणि मॅथ्यूजच्या जागी
मुरलीधरन आणि मॅथ्यूजच्या जागी रणदिव(टा) आणि वास? विश्वासच बसत नाही. भारताला गाफिल ठेवण्यासाठी श्रीलंकेने ही पुडी सोडली असावी.
<< तो मिसबाह आऊट होता होईना
<< तो मिसबाह आऊट होता होईना >> म्हमईकरजी, पण मिसबाह सारख्या अनुभवी व खंद्या फलंदाजाने खूप आधीच 'ओपन अप' व्हायला पाहिजे होतं असं नाही वाटत ? षटकामागे १२ धावा हव्या असताना शेवटच्या दोन फलंदाजाना घेऊन ५०-६० धांवा असल्या विकेटवर करायला थांबणं ही स्वतःची व संघाची फसवणूकच होती !
भाऊ,
मान्य. मिसबाह असे का खेळला ते एक कोडचं आहे, आपली गोलंदाजी तेव्हा चांगलीच होत होती आणि शाहिद आफ्रिदी ने खरं म्हणजे तेव्हाच पॉवर प्ले घ्यायला पाहिजे होते, पॉवर प्ले उशीर घेण्याचे आफ्रिदि चे कारणे ही हास्यासपद. पॉवर प्ले घेतल्यावर मिसबाह ओपन अप झाला, बट ईट वॉस टु लेट
काल पाकड्यांनी असंख्य चुका
काल पाकड्यांनी असंख्य चुका केल्या. त्यामध्ये प्रमुख चुका म्हणजे (१) सचिनला ५ जीवदाने दिली (त्यातले एक दुसर्या षटकातल्या धावबाद न करण्याचे जीवदान), (२) गुलला धोपटत असताना रझाकसारख्या अनुभवी गोलंदाजाला केवळ दोनच षटके दिली, (३) मिसबाह आणि आफ्रिदी खेळत असताना पॉवरप्ले घेतला नाही, आणि (४) मिसबा खूपच उशीरा पेटला.
काल नेहराने चातुर्याने गोलंदाजी केल्याचे बघून थक्क झालो. विशेषत: गुलला त्याने ज्या पध्दतीने पायचित केले ते अप्रतिम षटक होते. त्या षटकातले पहिले २ चेंडू त्याने तिरके ऑफ स्टम्पच्या खूप बाहेर टाकले. गुलला ते खेळता न आल्यामुळे नॉनस्ट्रायकरला असलेला मिसबाने अस्वस्थ होऊन त्याला काहितरी करून १ धाव घेऊन आपल्याला स्ट्राईक देण्याचा सल्ला दिला. त्यानंतर पुढचे २ चेंडू नेहराने कोणताही बदल न करता तसेच टाकले. गुलला तेही खेळता आले नाही. मिसबा दुसरीकडे अतिशय अस्वस्थ झाला होता. पुढचा चेंडू तसाच पडेल हे गृहीत धरून चेंडू पडायच्या आधीच गुल ऑफकडे सरकून चेंडू मारणार हे ओळखून नेहराने पुढचा चेंडू थेट स्टंपात लो फुल्टॉस टाकला. अंदाजापेक्षा पूर्ण वेगळा आलेला चेंडू गुलला खेळता आला नाही व तो चेंडू थेट त्याच्या पायावर खाली लागून तो अचूक पायचित झाला.
भज्जीने देखील आफ्रिदीला असेच फसवले. आधीचे २-३ चेंडू ऑफच्या खूप बाहेर टाकल्यानंतर पुढचा चेंडू ऑफच्या खूप बाहेर फुल्टॉस टाकल्यावर आफ्रिदी अचूक जाळ्यात सापडला.
मुनाफने रझाकला ज्या चेंडूवर त्रिफळाबाद केले तो सामन्यातला सर्वोत्कृष्ट चेंडू असावा.
काल आफ्रिदी व अख्तरबद्दल प्रथमच वाईट वाटले. अख्तरने स्पर्धेनंतर निवृत्त होणार असे जाहीर केले होते. पण काल त्याला संघात स्थान मिळाले नाही. न्यूझीलॅन्ड विरूध्दचा सामना त्याचा अखेरचा सामना ठरला.
काल मनमोहन सिंगांकडे बघून हसू येत होते. गिलानीच्या शेजारी ते अत्यंत अवघडल्या अवस्थेत बसले होते. बहुतेक गिलानीला वाईट वाटेल व आपली डिप्लोमसी फेल जाईल या हेतूने त्यांना आनंद सुध्दा व्यक्त करता येत नव्हता. शेवटी भारताने सामना जिंकल्यावर शेजारच्या गिलानीला तर सोडाच पण स्वतःला सुध्दा ऐकू जाणार नाहीत अशा पध्दतीने अत्यंत हलक्या टाळ्या त्यांनी वाजवल्या.
मला युवी बोल्ड झाला तो
मला युवी बोल्ड झाला तो सामन्यातला सर्वोत्कृष्ट चेंडू असावा असे वाटतंय
That was a gem of delivery, what a yorker
मला हरभजनने अकमलची काढलेली
मला हरभजनने अकमलची काढलेली काठी आणि मुनाफने रझाकची काढलेली काठी सगळ्यात आवडल्या.
काल दांड्या बर्याच उडल्या..
काल दांड्या बर्याच उडल्या.. ते सगळेच चेंडू चांगले होते.. कारण कोणीच बॅटची कत्ती लागून आउट झाले नाहीत बॉल नीट खेळता न आल्याने डायरेक्ट स्टंप उडलेत..
कालचा MOM रियाझला द्यायला हवा होता त्याबद्दल काय म्हणणे आहे???
म्हमईकरसाहेब, एकाच फास्ट
म्हमईकरसाहेब, एकाच फास्ट गोलन्दाज घेऊन खेळायचे का
<< गुलला धोपटत असताना
<< गुलला धोपटत असताना रझाकसारख्या अनुभवी गोलंदाजाला केवळ दोनच षटके दिली, >> मिसबाहसारखंच मला गुलचंही खेळणं आफ्रिदीचा तो वैरी असल्यासारखं वाटलं; सुरवातीला सेहवागने त्याला ऑफचे फटके मारल्यावर आफ्रिदीने मिडविकेटचा क्षेत्ररक्षक एक्स्ट्रॉ कव्हरला आणला तर गुलने सेहवागला आतां मिडविकेटला फटके मारायला रिकामी जागा आहे असं सांगून त्याच्या पायावर चेंडू टाकून सेहवागची सोय करून दिली ! दूसर्या स्पेलमधे तर फलंदाजाच्या पट्ट्यात बरोब्बर येतील असे फुलटॉस टाकण्याचा चंगच बांधला होता त्याने !! काय करणार बिचारा आफ्रिदी, त्याचा सगळ्यात अनुभवी व विश्वासार्ह गोलंदाजच त्याची वाट लावायला निघाल्यावर !!!
रैनाला माझा परत एक सलाम.
रैनाला माझा परत एक सलाम. त्याच्यामुळे आपला स्कोअर जरा रिसपेक्टेबल झाला. या आर्टिकल मधे पण त्याचं कौतुक केलंय..
http://www.telegraph.co.uk/sport/cricket/cricket-world-cup/8417068/India...
आर्निअस, ईट ऑल डिपेन्ड्स ऑन
आर्निअस,
) नाही तर तो ही "चली तो चली नही तो अब्दुल गनी" ह्या प्रकारात मोडतो. रैना ने अपेक्षा उंचावले आहेत. इफ वी बॅट सेकंड देन मी सुचवलेली टीम वुड बी द बेस्ट, लंकन्स नी पहिली बॅटिंग घेऊन आपल्याला धुतलं तर..... म्हणुन ८ फलंदाज आणि ३ गोलंदाज
ईट ऑल डिपेन्ड्स ऑन हॉव द पिच टर्न्स, सीम ऑर स्पिन, हाच मोठा यक्ष प्रश्न आहे.<<<
एकदा का आपण कोसळायला लागलो कि सगळ्यांना घाई लागते. नेहरा आणि मुनाफ काल चाललेत म्हणुन नाही तर ते "चली तो चली नही तो अब्दुल गनी" ह्या प्रकारात मोडतात. युसुफ कडुन किमान २५-३० रन्स ची मुबलक अपेक्षा आहे (जास्त केल्यास काहीच हरकत नाही
काल मनमोहन सिंगांकडे बघून हसू
काल मनमोहन सिंगांकडे बघून हसू येत होते. ते अत्यंत अवघडल्या अवस्थेत बसले होते. बहुतेक शेवटी भारताने सामना जिंकल्यावर अत्यंत हलक्या टाळ्या त्यांनी वाजवल्या.>>> अगदी अगदी.
हरभजनने अकमलची काढलेली काठी आणि मुनाफने रझाकची काढलेली काठी >>> चिमण यु सेड इट.
सुरेख चेंडु. मुनाफचे सगळे गुन्हे माफ.
>>> कालचा MOM रियाझला द्यायला
>>> कालचा MOM रियाझला द्यायला हवा होता त्याबद्दल काय म्हणणे आहे???
माझेही तेच मत आहे. सचिनची खेळी मोठी असली तरी ती ५ जीवदानांमुळे डागाळलेली होती. रैना व सेहवागच्या धावा सामनावीर पुरस्कार मिळण्याएवढ्या मोठ्या नव्हत्या. आपल्या पाचही गोलंदाजांनी जवळपास सारखीच कामगिरी केली. त्यामुळे त्यांच्यातल्या एकाला निवडून सामनावीर करणे शक्य नव्हते. पाकड्यांकडून रियाझने ५ बळी घेण्याची मोठी कामगिरी केली. तसेच हफीझने ४३ धावा करताना एक बळीही मिळविला होता. त्यांच्या इतर खेळाडूंची कामगिरी यथातथाच होती. अशा परिस्थितीत रियाझच सामनावीर ठरतो.
>>> कालचा MOM रियाझला द्यायला
>>> कालचा MOM रियाझला द्यायला हवा होता त्याबद्दल काय म्हणणे आहे???
मास्तुरे, सहमत!
मस्त मॅच झाली कालची. सचिनला
मस्त मॅच झाली कालची. सचिनला जी ६ जीवदाने मिळाली त्यातल्या प्रत्येक जीवदानावर जीव वर - खाली होत होता. पाकड्याच्या स्पीनरला त्याचे चाचपडत खेळणे म्हणजे धोनीचं पीच रिडींग चुकलं की काय अशी शंका येऊ घातली होती.
युव्ही चा यॉर्करवर उडालेला दांडला, सामन्यातला उर्क्रुष्ट चेंडू होता.
रैना चा सध्याचा फॉर्म पाहता त्याला अगोदर पाठवायला हवं होतं, अशी शंका मनात येऊन गेली.
सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आपल्या गोलंदाजांनी बॉलिंग अचूक केली व उत्क्रुष्ट क्षेत्ररक्षणाचा पाया रचत वाढीव धावा दिल्या नाहीत याचे कौतुक. याच मुख्यत्वे या सामना जिंकण्यामागच्या ठळक गोष्टी.
अंतिम सामना लंकेविरूद्ध. मिळालेल्या विजयाने हुरळून न जाता अशीच सातत्यपूर्ण फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण भारताने दाखवावे. वाढीव धावा न देण्यावर जास्त भर द्यावा. कोणास खेळवावं आणि कोणास नाही यापेक्षा जे खेळाडू खेळतील त्यांनी चोख कामगीरी करावी जेणेकरून कुणाच्या उणीवा काढण्यास वाव मिळणार नाही हीच सर्वसामान्य भारतीयांकडून माफक अपेक्षा...
क्रिकेट हा एक हाती फिरणारा खेळ. पारडं कधी कोणाच्या बाजूने झुकेल सांगता येत नाही. तरी आतापर्यंतच्या सामन्यातली आपल्या संघाची घोड्दौड पाहता विजय आपला निश्चित व्हावा असे मनोमन वाटते..
लंकेविरूद्धच्या वानखेडेवर रंगणार्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाला अनेकानेक शुभेच्छा...
कराच रे गड्यांनो लंकादहन... सारा भारत देश आवाज देतोय.........................
<< मुरलीधरन आणि मॅथ्यूजच्या
<< मुरलीधरन आणि मॅथ्यूजच्या जागी रणदिव(टा) आणि वास? विश्वासच बसत नाही. भारताला गाफिल ठेवण्यासाठी श्रीलंकेने ही पुडी सोडली असावी. >> मास्तुरेजी, वास 'ओव्हर द विकेट' गोलंदाजी करताना त्याचा इनस्विंगर स्लीपच्या दिशेने जाताना अचानक "सरळ"होऊन पॅडवर येतो; भल्या भल्या फलंदाजाना हा चेंडू खेळणं अवघड जातं. [ नेहरा अशी दहशत नाही निर्माण करत !]कुंबळेच्या टॉप स्पिनरसारखा वासचा तो चेंडू विकेटखाऊ तर ठरलाच आहे पण त्यामुळे त्याच्याविरुद्ध धांवा काढण्यावरही अंकुश बसतो. वास तंदुरुस्त असेल, तर त्याला मुंबईला बोलावण्याची भाषा 'पुडी सोडणं' यात बसत असेलच असं नाही !
>>> कालचा MOM रियाझला द्यायला
>>> कालचा MOM रियाझला द्यायला हवा होता त्याबद्दल काय म्हणणे आहे???
मला काहीच अडचण नाही! किंवा ते अॅवॉर्ड तेंडल्याचे कॅच सोडणार्या सर्वांना विभागून दिले तरी चालेल.
होप वी माईट हॅव लर्न्ट फ्रॉम
होप वी माईट हॅव लर्न्ट फ्रॉम २००३ फायनल्स
ताजी बातमी Yes match is fixed
ताजी बातमी

Yes match is fixed with each side allowed a max. of 50 overs to score their runs. Each bowler is permitted to bowl a max of 10 overs, thats fixed too. Many other aspects of this game are fixed as well.
भाऊराव, चामिंडा हा ग्रेट बॉलर
भाऊराव,
चामिंडा हा ग्रेट बॉलर "होता" असेच म्हणावे लागेल. २००८ साली तो शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. त्यानंतर खराब कामगिरीमुळे त्याला डच्चू मिळाला. २००९ नंतर तो कसोटी सामन्यांतून सुध्दा निवृत्त झाला. त्याचे वय सुध्दा जास्त आहे (३७). या स्पर्धेत तो व रणदिव अजून एकही सामना खेळलेले नाहीत. किंबहुना गेल्या २-३ वर्षात वास एकही सामना खेळलेला नाही. त्याच्यापेक्षा सध्या नूवान कुलसेकरा अनेक पटींनी चांगली गोलंदाजी करतो. महत्वाचे म्हणजे कुलसेकरा भारताविरूध्द चांगली गोलंदाजी करून बळी मिळवितो. कुलसेकराची फलंदाजी सुध्दा बरी आहे. अशा परिस्थितीत वासला घेणे हे योग्य वाटत नाही.
एकवेळ रणदिव आत येऊ शकेल, पण, चामिंडा वास अंतिम सामन्यात खेळेल असे मला वाटत नाही. मुरलीधरन व मॅथ्यूज जखमी असून त्यांच्या ऐवजी वास व रणदिव खेळणार अशी बातमी पसरवून भारताला आपले डावपेच बदलायला भाग पाडायचे आणि आयत्यावेळी मुरलीधरन व मॅथ्यूजला खेळवायचे अशी कदाचित श्रीलंकेची रणनीती असेल. मात्र मेंडीसच्या जागी श्रीलंका कुलसेकराला खेळवणार हे नक्की.
मंजु.. अग तुझ ऑफिस
मंजु.. अग तुझ ऑफिस वानखेडेजवळच असल्यामुळे तुला तिकडे नजर गेली तरी उचंबळुन येत आहे असे म्हणतेस.. अग मला इथे अमेरिकेत असुनही.. नुसत्या वानखेडे स्टेडिअमच्या आठवणींनी उचंबळुन येत आहे.. अग माझ कॉलेज (जय हिंद कॉलेज) वानखेडेच्या बाजुच्याच गल्लीत होते.. कॉलेजला असताना गावस्कर तिथे टेस्ट मॅच खेळत असताना वानखेडेच्या बाहेर घुटमळत असायचो.. आत त्याने फोर मारली की तो स्टेडिअममधुन येणारा जल्लोश ऐकुन जिव वर खाली व्हायचा.. तिकिट असायला पाहीजे होते म्हणुन.. शाळेत असताना १९७८ मधे एकदा तिकिट मिळाले होते व कालिचरणच्या वेस्ट इंडिज टिम विरुद्ध गावस्करला याची देही याची डोळा पहिल्या डावात २०५ व दुसर्या डावात ७० धावा चोपुन काढताना बघण्याचे सौभाग्य मला लाभले होते.. त्याची ती सिल्व्हेस्टर क्लार्क्,नॉर्बर्ट फिलिप्स,रफिक जुमादिन व डेरेक पॅरीला चोपुन काढलेली बॅटींग बघताना स्वर्ग २ बोटेच राहीला होता मला.. परवा तेंडुलकर त्याच मैदानावर गावस्करचा त्या मैदानावरचा कित्ता गिरवेल या विचाराने मलाही गहिवरुन येत आहे..
पौर्णिमा.. तुझ बरोबर आहे की भज्जु आजकाल रडक्या तोंडाने वावरत असतो.. पण तो मॅच विनर आहे हे विसरु नकोस.. त्याला टिममधुन काढुन टाकणे चुकीचे ठरेल.. अग त्याला जास्त विकेट न मिळण्याचे कारण म्हणजे बहुतेक टिम्स त्याच्या बॉलिंगवर आउट व्हायचे नाही असे ठरवुन त्याच्या ओव्हर्स रिस्क न घेता जपुन खेळतात व युवराज किंवा दुसर्या बोलर्सना मारायचा प्रयत्न करतात व इतरांच्या बॉलिंगवर रिस्क घेतात व त्यांना विकेट्स देतात.. म्हणजे भज्जुच्या रेप्युटेशनचा बाकिच्यांना फायदा होतो...
असो.. पण तुझे ते मागच्या मॅचमधले पोपटवाले भविष्यकार फायनलबद्दल काय म्हणत आहेत?:)
चिमण.. रैना माझा सगळ्यात फेव्हरेट प्लेयर आहे.. जिगरबाज व जबरी कॉन्फिडन्स असलेला.. फिल्डिंगमधेही आपला जाँटी र्होड्स आहे तो.. त्याला व विराट कोहलीला मी त्यांच्या नुसत्या फिल्डिंगसाठी माझ्या टिममधे केव्हाही घेइन... दे बोथ आर टोटली इन्व्हॉल्व्ड(१००%) इन इच अॅन्ड एव्हरी मॅच दे प्ले विथ अ ग्रेट बॉडी लँग्वेज अँड अॅटिट्युड!
शॉकिंग
शॉकिंग बातमी............चामिंदा वास परत येतोय.......अंतिम सामन्यांसाठी...........
http://www.dawn.com/2011/03/31/chaminda-vaas-in-shock-recall-for-world-c...
शेवटी भारताने सामना
शेवटी भारताने सामना जिंकल्यावर शेजारच्या गिलानीला तर सोडाच पण स्वतःला सुध्दा ऐकू जाणार नाहीत अशा पध्दतीने अत्यंत हलक्या टाळ्या त्यांनी वाजवल्या. >>>
Pages