Submitted by Adm on 30 March, 2011 - 22:35
२०११ सालच्या क्रिकेट विश्वचषकाची अंतिम लढत २ एप्रिलला मुंबई येथे भारत आणि श्रीलंकेच्या संघांमध्ये होणार आहे.
हा धागा अंतिम लढतीच्या आधीची, दरम्यानची आणि नंतरची चर्चा करण्यासाठी...
चक दे इंडिया.... !!!!!!!!!!!!!!!
आला आला गुढी पाडवा |
भारतीय बॅटिंग चा जोर वाढवा |
मलिंगाचे यॉर्कर बडवा |
मुरलीची फिरकी तुडवा |
दिलशानचे स्ट्रोक्स आडवा |
लंका दहनचा इतिहास घडवा|
विजयी पताकेची गुढी चढवा ||
- Courtesy : DJ
मारू छक्के चौके आणि करु त्यांच्या दांड्ये गुल्ल!
आला आला भारत, टरकली लंकेची फुल्ल!!!!!!
जोर लगा के... दे घुमा के !!!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तेच तर महत्त्वाचं आहे..
तेच तर महत्त्वाचं आहे.. वर्ल्डकपची फायनल...
मीच वरती म्हणलो आहे की ही ह्या पीच वरची पहिलीच मॅच असेल पण तस नाहीये.. श्रीलंकाच ह्या पीच वर आधी एक मॅच खेळली आहे..
आता पर्यंतचा खेळ बघता भारत
आता पर्यंतचा खेळ बघता भारत जि़ंकणार नाही हेच खरे. आपली मिडल ऑरडर एकदम गच्याड आहे. एक गेला की सगळे जातात. वरुन तणावपुर्ण वातावरणात तग धरणे तर आमच्या लेखीच नाही. वरुन तिकडे तो मुरली धरण आहेच आपला समाचार घ्यायला.
आज पर्यंत भारताने एकही मॅच खेचुन आणली (ईंग्लड मधे कैफने केलेल्या पराक्रमाचा अपवाद सोडता) नाही. सगळ छान जुळुन आल्यास आपला विजय होतो. किंवा पुढच्या टीमनी चुका केल्यास.
आपल्या टीमची बॉलिंग व फिल्डींग सगळ्या जगाला माहीत आहे. बॅटिंग चांगली आहे पण वेळ प्रसंगी पत्याच्या ईमारतीसारखे कोसळण्याचे सगळे विक्रम आपल्याच नावे आहेत.
हे सगळं पाहता विश्व चषक श्रीलंकेचाच आहे हे मात्र पक्क..
इथे दोन मॅचेस झालेल्या
इथे दोन मॅचेस झालेल्या आहेत.
काल सुधीर नाईक ने टीव्ही वर सांगीतल्याचे मी ऐकले. खेळपट्टी स्लो टर्नर असेल . बोलर्सना सुद्धा मदत करेल.
माझ्यामते श्री पेक्षा अश्विन बरा. गम्भीर नसेल तर पठाण आहेतच.
आपण मॅच जिंकणार आहोत. पहिल्या बॅटिंग ला आपला पार स्कोअर ३००+. श्रीलंका २५०.
दुसरी बॅटींग असेल तर त्यांनी कितीही केल्या तरी ५ विकेटस राखून चेस करू.
साहेबांची सेंचूरी.
आता भेट वर्ल्ड कप जिंकल्यावर.

आमची उद्या साठी जय्यत तयारी. घट्ट काळ्या जॉन बरोबर चालण्याचा व्यायाम.
होय रे होय हिम्या....
होय रे होय हिम्या.... श्रीलंका वि. न्यूझिलंड साखळी सामना वानखेडेवर झाला आहे. वर्ल्डकपच्या एकून तीन मॅचेसपैकी दोन मॅचेस वानखेडेवर खेळून झाल्यात. त्यापैकी एका मॅचमधे श्रीलंका होतीच... नव्या पीचवर ते नुकतेच खेळलेले आहेत, हा त्यांच्यासाठी अॅडव्हांटेज आहे.
पण उद्याचा दिवस आपला आहे.... भारतच वर्ल्डकप जिंकणार
मंजु.. ये हुइ ना बात! तुला
मंजु.. ये हुइ ना बात! तुला १००% अनुमोदन! और तुम्हारे मुह मे घी शक्कर!
>>गेल्या २ मॅचमधे ७ नंबरवर
>>गेल्या २ मॅचमधे ७ नंबरवर आलेल्या रैनाच्या३०-३५ धावांनीसुद्धा दोन्ही वेळेला विजयास मोठा हातभार लावला आहे..
मुकुंद,
परफेक्ट! त्यातून रैना धोणी च्या वर खेळायला आला तर अजून जास्त परिणामकारक ठरेल. मी तर म्हणतो धोणी च्या वर युसूफ ने देखिल यावे. रैना-युसूफ जोडी भन्नाट असेल, शिवाय लेफ्टी राईटी काँबो.
पण धोणी चा स्वताच्या फलंदाजीचा हट्ट संपत नाही तेही स्वतः फॉर्मात नसताना.
>>"ऑर्थोडॉक्स लेगस्पिन" हल्ली कांहीसा दुर्मिळ झाल्याने अश्विनपेक्षा श्रीलंकावाले चावलालाच अधिक जपून व दबावाखाली खेळतील, अशी माझी धारणा आहे. अर्थात, हा प्रयोग विकेट निश्चितपणे स्पिनला अनुकूल असेल तरच !
भाऊ,
थोडक्यात सर्वांगानी युसूफ चा समावेश फायद्याचा वाटतो.
ज्या फॉर्म मध्ये लंकेचे मुख्ख्य फलंदाज खेळतायत ते पहाता चावला/श्री कुणीही असले तरी फरक पडत नाही. अश्विन असला तरी त्यांना फरक पडत नसला तरी आपल्याला भरपूर पडतो कारण अश्विन ची फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण दोन्ही बरच चांगलं आहे (चावला/श्री पेक्षा निश्चीतच!). तेव्हा नेहरा नसेल तर अश्विन ला घेण्यात आपला फायदा आहे. अश्विन विकेट घेणारा गोलंदाज आहे श्री/चावला तसे वाटत नाहीत. अश्विन पाट्यावर देखिल विकेट घेवू शकतो- त्याचा अॅप्रोच भन्नाट आहे. चावला पाट्यावर फक्त षटके पुरी करू शकेल. शिवाय, झहीर सर्व सामन्यात चेंडू जुना झाल्यावरच यशस्वी ठरलेला आहे. अशा वेळी थरंगा आणि दिलशान यांना रोखायचे आणि विकेट घ्यायची असेल तर भज्जी, अश्विन यांच्याशिवाय पर्याय नाही. मला वाटतं ही अतीशय मह्त्वाची बाब विचारात घेतली तर नेहराच्या जागी अश्विन हे स्पष्ट आहे.
गंभीर्/युसूफ मध्ये देखिल हाच मुद्दा आहे. लंकेविरुध्ध गंभीर ला खेळवण्यापेक्षा युसूफ जो गोलंदाजी देखिल करू शकतो त्याला खेळवण्यात आपला जास्त फायदा आहे.
गंभीर देखिल फिरकीवर बाद होवू शकतो/जसे युसूफ पुन्हा फलंदाजीत फेल जावू शकतो. पण युसूफ चा जुगार जास्त यश देणारा आहे- गंभीर चा जुगार "सेफ प्ले" आहे. लंकेविरुध्ध "सेफ प्ले" पेक्षा "आक्रमक धोका पत्करणे" अधिक फायद्याचे ठरेल असे वाटते. गंभीर हा काही मॅचविनर नाही- ३०/४० धावा करू शकतो (डळमळीत), पण युसूफ खेळला तर नक्कीच मॅचविनर आहे तेव्हा जुगार त्याच्यावर खेळायला हवा. गंभीर येतो तेव्हा बरेच वेळा पहिला फलंदाजी पॉ.प्ले. देखिल संपलेला असतो. आणि शेवटचा पॉ.प्ले. घेईपर्यंत गभीर बाद झालेला असतो
विकेट पाटा असेल तर युसूफचा समावेश, अन्यथा गंभीर. तसे झाल्यास पुन्हा एकदा फक्त ४ मुख्ख्य गोलंदाज (भज्जी, झहीर, अश्विन, मुनाफ) आणि एक चांगला पार्ट टाईम (युवी) एव्हडेच पर्याय राहतात. रैना/युसूफ दोघे असतील तर गोलंदाजीला अधिक पर्याय असतील असे मला वाटते.
शेवटी आपली ऊद्या स्ट्रॅटेजी काय यावर संघनिवड अवलंबून असेल. आणि समजा आपली पहिली फलंदाजी असेल आणि विरू सचिन ने पुन्हा जोरदार सलामी दिली तर युसूफ ला वर पाठवून (क्र. ४ वर) त्याला सेट व्हायला वेळ दिला तर सेट झालेला युसूफ हा ९९% मॅचविनर आहे. युसूफ वर जुगार खेळायचाच आहे तर त्याला सेट व्हायला थोडासा वेळ द्यायचा.. पहिले २० चेंडू घालवले तरी नंतर तो डबल भरपाई करून देतो हाच त्याचा अनुभव आहे. धोणी तसा धाडसी निर्णय ऊद्या घेईल का एव्हडेच बघायचे. मला तरी सचिन, विरू, कोहली, युसूफ, युवी, रैना, धोणी, हा फलंदाजीचा क्रम अधिक फायद्याचा वाटतो. शिवाय ऊद्या बॅटींग पॉ.प्ले. फारच निर्णायक ठरू शकतो. यावेळी तरी धोनी याबाबतीत काही वेगळी कल्पकता दाखवतो का पहायचे.
परवाच्या सामन्यात आपल्या फायद्याच्या झालेल्या गोष्टी:

१. भज्जी ने दोन विकेट घेतले ते चेंडू उत्कॄष्ट होते- भज्जी इज बॅक!
२. मुनाफ ला ऐन मोक्याला गोलंदाजीत मस्त फॉर्म गवसलाय.. त्याचा अत्मविश्वास प्रचंड वाढला असेल- झहीर साठी ही आनंदाची बाब आहे.
३. फलंदाजीत फेल गेला तरी गोलंदातील हमखास कामगिरी करू शकतो हे युवी ने पुन्हा सिध्ध केलय- लॉ ऑफ अॅवरेज ने परवा भेट दिली ते बरे झाले
४. रैना ने पुन्हा एकदा त्याच्या फलंदाजीचे अन क्षेत्ररक्षणाचे (दोन्ही मिळून संगासाठी ६० धावा) महत्व दाखवून दिलय. त्याच्या खाली येवून हमखास ३० धावा बनवण्याने त्याला स्वताला प्रचंड आत्मविश्वास आला असणार.
५. आणि सचि, विरू आहेतच.. रतीब घालतायत
६. गेल्या दोन सामन्यात क्षेत्ररक्षणाचा एकंदर ऊंचावलेला दर्जा.
मला वाटतं या सर्वाला अश्विन, युसूफ ची जोड मिळाली तर आपल्याला हरवणे लंकेसाठी फारच अवघड गोष्ट आहे.
युसूफ वि. मलिंगा... थरारक... असेल. याखेरीज मुरलीला खेळून काढणे एव्हडेच केले तरी लंकेकडे हमखास विकेट घेणारे गोलंदाज नाहीत. आपल्याकडे ऊपलब्ध असलेल्या गोलंदाजीच्या पर्याय वैविध्यापुढे लंकेची गोलंदाजी कमकुवत वाटते.
---------------------------------------------------------------------------------
मलिंगा च्या प्रत्त्येक षटकातील तीन यॉर्कर खेळून काढले तरी ऊरलेल्या तीन खराब चेंडूवर हमखास चौकार असतात
overall i would say we have more and better match winners than lanka.. this will be the difference between the win and loss.
(आता सामना संपेपर्यंत एकही विश्लेषण नाही- तेव्हा विश्लेषणाची अॅलर्जी असलेल्यांनी निर्धास्त असावे!)
(No subject)
काहीही काय बकासुर, आपण
काहीही काय बकासुर, आपण ऑस्ट्रेलियाबरोबरची मॅच चांगली जिंकली की. मॅच खेचूनच आणली पाहिजे असे काही आहे का? आपल्याला खेचून वगैरे आणायची गरजच पडली नाही. तसेच जुळवून आणले की जुळून येते हो.
उलट हे अलीकडचे सामने बघता आपली मिडल ऑर्डर (धोनी वगळता) चांगली बलवान वाटते. पाकिस्तानच्या विरुद्ध एकवेळ आपली परिस्थिती ४ बाद १४० होती. इतर वेळी चांगली गोलंदाजी असलेल्या संघाविरूद्ध आपले २००-२२५ वगैरे झाले असते. पण आजकाल आपले लोक २५०-२६० करतातच की.
युवराजने आता फायनलमध्ये "त्या" स्पेशल व्यक्तीसाठी शतक करावे..
होल्ड ऑन लोकहो, सकाळच्या ह्या
होल्ड ऑन लोकहो,
सकाळच्या ह्या बातमी प्रमाणे "अंतिम सामन्यासाठी मात्र सेंटर विकेट (मध्य भागातील विकेट) वापरण्यात येणार आहे. त्यामुळे तिचे स्वरूप गुलदस्तातच आहे. "
मुकूंद, भाऊ, मास्तूरे छान
मुकूंद, भाऊ, मास्तूरे छान लिहिताय.. लिहीत रहा..
भाऊ व्यंगचित्र भारी !!!
मंजू, तू म्हणतेस ते बरोबर आहे... मुंबईच्या मैदानावर न्युझिलंड, श्रीलंका ह्यांच्या मॅचेस आधीच्या फेर्यांमधे ठेवल्या आपलीही ठेवायला हवी होती खर तर !! आपलच ग्राऊंड आणि आपल्यालाच नविन.. !!!!
बाकी उद्या आपण जिंकणार ह्यात वादच नाही..
योगजी, तुमचे बरेचसे मुद्दे
योगजी, तुमचे बरेचसे मुद्दे पटतात मला. पण लेग्-स्पिनबद्दलचा माझा ' सॉफ्ट कॉर्नर ' मला स्वस्थ बसूं देत नाही इतकंच ! युसूफ श्रीलंकेच्या बेरक्या गोलंदाजीपुढे मॅचविनर होणं मात्र जरा कठीणच वाटत मला. उद्याच्या सामन्यात धावांचा पाऊस पडणं कांही शक्य वाटत नाही त्यामुळे आपले सात फलंदाज असताना युसूफच्या एक्स्प्लोझीव्ह बॅटींगची बहुधा गरजही पडूं नये. पण काय सांगावं ... !!!!!
इथल्या चर्चेमुळे स्पर्धेचा आनंद द्वीगुणीत होतोय हे खरं.
मंजुडी, तुझ्या व तुझ्या
मंजुडी,
तुझ्या व तुझ्या रजनीच्या तोंडात साखर......
आपल्या मिडल ऑर्डरची मला फारच धास्ति बसलिये....... (थरथर कापनारा बाहुला)
एक एक्स्प्लोझीव्ह सेहवाग पुरे
एक एक्स्प्लोझीव्ह सेहवाग पुरे आहे. आणखी युसूफ कशाला? या एक्स्प्लोझीव्ह लोकांचा काही भरवसा नसतो. सर्दाळलेल्या फटाक्यांसारखं असतं त्यांच. वाजले तर वाजतात नाहीतर नुसती वात जळते.
युसुफच्या पट्ट्यात बॉल आला तर छकडी बसते नाहीतर आउट होतो. शिवाय एक छकडी बसली की त्याला वाटतं की आता फक्त छकडी शिवाय रन्स निघणारच नाहीत. त्यात फिरकीला अनुकूल असेल तर बघायलाच नको. मोहालीत काय झालं ते पाहिलं ना सगळ्यांनी? आयपीएल खेळलेलेच बॉलर असल्यामुळे त्याला आउट कसा करायचं ते सगळ्यांना माहिती आहे. बाकी, गंभीर मोडला आहे का?
कुठल्याही परिस्थितीत रैना धोनीच्या वर येता कामा नये. त्याच्या सध्याच्या नंबरवर तो स्थिरावला आहे. फायनलला अजून प्रयोग नको आहेत.
संघात कोणी पर्यायी विकेट किपर
संघात कोणी पर्यायी विकेट किपर आहे का? धोनी कसला बसतोय म्हणा. जाउदेत! काहीही करा लेकहो, पण जिंका!!
वर कुणीतरी लिंक दिलेलं नाना
वर कुणीतरी लिंक दिलेलं नाना पाटेकरचं पत्र मस्तय .
चर्चेला रंग आलाय इथल्या. माझा
चर्चेला रंग आलाय इथल्या. माझा आनंद त्रिगुणित झाला आहे.
उद्या आपण ही मॅच जिंकूचं जिंकू.
मलाही युसुफ पठाणकडुन अपेक्षा
मलाही युसुफ पठाणकडुन अपेक्षा वाढल्या होत्या पण गेल्या ४ मॅच मधे तो फेल झाला आहे. ४ पैकी १ किंवा दोन मधे ठीकठाक खेळला असता तर ठीक आहे. गंभीरच बरा.
नेहरा ऐवजी श्रीसंत ला खेळवणार असे म्हणतायत. लंकाचा वीक पॉईंट (असलाच तर) कोणता आहे? फास्ट का स्पिन?
बर्याच लोकांचे म्हणणे असे
बर्याच लोकांचे म्हणणे असे आहे..
अश्वीनचा नंबर परत गेला क काय?
अश्वीनचा नंबर परत गेला क काय? आता परत मिसरीड करू नको म्हणा विकेट. श्रीसंत आजिबात आवडत नाही मला. त्याचे स्टॅट्स माहीत आहेत का कोणाला?
>> लंकाचा वीक पॉईंट (असलाच
>> लंकाचा वीक पॉईंट (असलाच तर) कोणता आहे? फास्ट का स्पिन?
धावांचा डोंगर!
जेव्हा तेंडल्याला फॉर्म नव्हता तेव्हा असं पत्र लिहीण्याचं डेरिंग होतं का नाना पाटेकराचं? धोनी सध्या फॉर्मात नाही.. इट्स अॅज सिंपल अॅज दॅट! पण तो कॅप्टन पण आहे म्हणून काढता पण येत नाही. शिवाय तो विकेटकीपर पण आहे. आत्तापर्यंत त्याने काही फार वाईट किपिंग केलेलं नाही. बेकार किपिंगचं उदाहरण हवं असेल तर कमरान अकमलकडे पहा.
धोनी कितीही वाईट परिस्थिती असली तरी खचत नाही. कुणी कॅच सोडला तर उगाच वेडेवाकडे हातवारे करून दाखवत नाही की आता सगळ संपलं! ते फार महत्वाचं आहे. द. आफ्रिके विरुद्ध नेहराच्या शेवटच्या षटकात १३/१४ धावा गेल्या. होतं असं कधी कधी! पाकीस्तान विरुद्ध झहीरच्या एका ओव्हरीत पण गेल्या. रैनाने ब्रेट लीच्या एका ओव्हरीत पण ठोकल्या. खेळ आहे तो.. इतकं प्रिसाईज आणि कॅल्क्युलेटेड काही होत नसतं.. कारण खूप फॅक्टर्स आहेत.. बॉलरने टाकलेल्या चेंडूवर बॅटसमनने काय शॉट मारला आणि तो बॉल कुठे उडाला तिथे फिल्डर होता का नव्हता आणि असला तर तर कॅच घेताना तो किती प्रेशर खाली होता त्याच्या डोळ्यावर लाईट/सूर्य आला का नाही, त्याचा पाय घसरला का इ. इ.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे धोनी लकी कॅप्टन पण आहे.
चिमण तुझी वरची पोस्ट वाचून
चिमण तुझी वरची पोस्ट वाचून मला एकदम तागुची नामक माणसाची Design of Experiments ची आठवण झाली...
>> लंकाचा वीक पॉईंट (असलाच
>> लंकाचा वीक पॉईंट (असलाच तर) कोणता आहे? फास्ट का स्पिन? >> सीम विथ बॉउंन्स. दुर्दैवाने आपला पण तोच आहे.
धोनी पक्का चालु माणुस आहे.
धोनी पक्का चालु माणुस आहे. बोलताना तो कधी समोरच्याच्या डोळ्यात बघुन बोलत नाही आणि बोलतो एक (अश्विन) आणि करतो दुसरेच (नेहरा). सिवाय विकेट्किपिंग पण ठीकठाक आहे. सिनियर्सना मोटिवेट करतो आणि जुनियर्सना कामाला लावतो.
कॅप्टन असाच हवा.
(No subject)
एक महान विनोदी लेख!
एक महान विनोदी लेख!
http://www.loksatta.com/lokprabha/20091127/alkem.htm
मुकुंदजी, ती लिन्क
मुकुंदजी,
ती लिन्क extracover.net अशी आहे. मी वरती पण दुरुस्त करतीय.
अरे सगळ्यांनी इथे केवढे नाव
अरे सगळ्यांनी इथे केवढे नाव बदलून ठेवले आहेत. आहेत जुनेचं परंतु नावामुळे कळत नाही. तरी विचार केला नवीन लोक जुन्यासारखे का बोलत आहेत
>>एक महान विनोदी लेख! << राजु
>>एक महान विनोदी लेख! <<
राजु परुळेकरला सिरियसली घ्यायचंच नसतं. सचिनची "मुंबई सर्वांची" या कमेंट्मुळे झालेली जखम अजुन ठुसठुसतेय...
धोरणात्मक आयोजन केल्यास सचिन भारतीय उपखंडात शांतता प्रस्थापित करण्यास मोलाची कामगिरी करु शकतो.
सध्यातरी लंकेच्या रावण/मेघनाथ/कुंभकर्ण यांच्या बंदोबस्ताची चर्चा करुया...
>>एक महान विनोदी लेख! << हो
>>एक महान विनोदी लेख! <<
हो खरंच.. अत्यंत भंपक लेख. कशाचा काही संबंध नाही. यापेक्षा मायबोलीवरील पब्लिक चांगले लेख लिहितं...
इरफान पठाणला घ्यायला पाहीजे.
इरफान पठाणला घ्यायला पाहीजे. त्याची बॉलिंग पण मस्त आहे आणि बॅटिंग पण. त्याच्या भावापेक्षा तो देखणा आहे. धोनीचे केस लांब होते तेव्हां तो छानच खेळायचा. बारीक केल्यानंतर थोडा प्रॉब्लेम झाला असेल. त्याने लांबच केस ठेवावेत ..
Pages