विश्वचषक क्रिकेट २०११ अंतिम लढत : भारत वि. श्रीलंका

Submitted by Adm on 30 March, 2011 - 22:35

२०११ सालच्या क्रिकेट विश्वचषकाची अंतिम लढत २ एप्रिलला मुंबई येथे भारत आणि श्रीलंकेच्या संघांमध्ये होणार आहे.
हा धागा अंतिम लढतीच्या आधीची, दरम्यानची आणि नंतरची चर्चा करण्यासाठी...

चक दे इंडिया.... !!!!!!!!!!!!!!!

आला आला गुढी पाडवा |
भारतीय बॅटिंग चा जोर वाढवा |
मलिंगाचे यॉर्कर बडवा |
मुरलीची फिरकी तुडवा |
दिलशानचे स्ट्रोक्स आडवा |
लंका दहनचा इतिहास घडवा|
विजयी पताकेची गुढी चढवा ||
- Courtesy : DJ

दे घुमाके !!!

मारू छक्के चौके आणि करु त्यांच्या दांड्ये गुल्ल!
आला आला भारत, टरकली लंकेची फुल्ल!!!!!!

जोर लगा के... दे घुमा के !!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गंभीर ला न घेता युसुफ ला घेता येयील...............किमान गोलंदाजी तरी करतो.........गंभीर कुठे धावा काढतोय....?? मोक्याच्या क्षणी विकेट गमवतोय.........त्या पेक्षा कोहली ३ नंबर वर फार चांगली फलंदाजी करतो....मुख्य म्हणजे त्या ठीकानी विकेट सहजा सहजी सोडत नाही.........तेवढेच सचीन वरचा भार हलका होइल....

याच्यात शॉकिंग काय आहे>>>>>>>>>>> उद्या कपिल खेळनार बोलल्या वर शॉक नाही लागनार ???

मास्तुरे..

शेवटी भारताने सामना जिंकल्यावर शेजारच्या गिलानीला तर सोडाच पण स्वतःला सुध्दा ऐकू जाणार नाहीत अशा पध्दतीने अत्यंत हलक्या टाळ्या त्यांनी वाजवल्या. >>>
Rofl

मस्त ऑब्झर्वेशन..

मुकुंद, कालचं भविष्य खोटं ठरलं ह्याचा कोण आनंद झाला! ऐन सामन्याआधी तुम्ही काय लिहिताय, याचा जराही पाचपोच नको? Angry हे घ्या! मटा! :

'त्यामुळे वर्ल्डकपही भारत जिंकणार असेच हे ग्रहमान आहे. फक्त पराक्रमात हर्षलची उपस्थिती असल्यामुळे सामना अटीतटीचा होणार, असे म्हणता येईल.

१९८३ साली भारताने वर्ल्डकप जिंकला होता. त्यावेळी भारताच्या कुंडलीत दशमस्थानी असलेल्या तुळेच्या गुरु बरोबर गोचरीच्या उच्चीच्या शनीचे भ्रमण सुरु होते. त्यावेळी भारताने बाजी मारून विश्वविजेता ठरला होता. कारण दशमातील उच्चीच्या तूळेचा गोचर शनीने हे यश दिले होते व भारताची विश्वभर प्रसिद्धी झाली होती. सांप्रत सध्या शनि सुद्धा दशमाच्या सीमा रेषेवर भ्रमण करीत आहे. दशमेश शुक्र दशमाच्या लाभातून गोचराने भ्रमण करीत आहे. ही ग्रहस्थिती अनुकुल असल्यामुळे भारताची विजयाकडे आगेकूच सुरु होईल यात तीळमात्र शंका नाही.'

कस्लं व्हेग आहे हे! Lol सामना अटीतटीचा होईल>> ह्यात नवल ते काय? अंतिम सामना आहे. अटीतटीचा होणारच!
विजयाकडे आगेकूच सुरू राहील- ती दोन्ही संघांची असतेच की!

कायपण लिहितात.

ह्याही सामन्याचा जो काही निकाल लागेल तो सर्वांनी खुल्या मनाने, केवळ त्या दिवशी मॅचमध्ये जे काही झाले त्याच कसोटीवर पारखावा आणि मान्य करावा!! मे द बेस्ट टीम ऑन दॅट डे विन!

काय हे ???"जग कुठे चाललय?" >>> जग चंद्रावर चाललय आणि हे चंद्रा वरून भविष्य सांगत आहेत.

लंकेला आधीच पराभवाचा 'वास' आला असणार म्हणून त्यांची 'वास'वाणी सुरू आहे.

गोचिड भ्रमण >>> खोट कशाला बोला... दिलशान, संगा हे भारत्याच्या दृष्टिने गो चिड भ्रमण म्हणायला हवं.

बस काय भाऊ... वेळ मिळाली की आम्ही तुमच बी कवतिक करतोच की Wink

अरे मैदानाच्या पिच बद्दल लिहा ना? >>> त्या पिच वर लिहायला 'वाघाच' काळीज लागतं... :p

>> अंतिम सामना आहे. अटीतटीचा होणारच!
असं काही नाही! वन साईडेड सुद्धा होऊ शकतो.. पूर्वी पाक ऑस्ट्रेलियाचा किंवा आपला ऑस्ट्रेलियाचा(२००३) झाला होता तसा!

याच मैदानावर श्री लंकेची एक मॅच झाली होती. त्या वरून विकेट स्लो टर्नर आहे. ३५०+ची नाही. कालच्या सारखी. माझ्या मते आपल्या साठी अनुकूल. Happy

भाउसाहेब विकेटस आपल्यासाठी बनवणार हे मी पहिल्या पासून म्हणतोय. यावेळेस सगळ जमून येतय.
भरत मला काही चेंज करायला लागल नाही.
मास्तुरे - फक्त बंगला देशने मात्र माझा अपेक्षा भंग केला.

मुकुंद,

>>आणी तस बघायला गेल तर आपली टीम अजुन कोणत्याही मॅचमधे एकत्रीत पेटुन उठुन खेळलेली नाही.. खासकरुन धोनी व विराट कोहली त्यांच्या पोटेन्शियलला साजेसे अजुन खेळलेच नाहीत.. त्यामुळे फायनलला जर सगळी भट्टी जमुन आली तर कप जिंकायला कठीण नाही..

अगदी. किंबहुना हिच गम्मत आहे की संपूर्ण संघ आणि काही खेळाडू (धोणी, कोहली, युसूफ) पूर्ण पोटेंशियल नुसार खेळले नाहित तरी आपण फायनल ला पोचलो आहोत. जर पूर्ण ताकदीनीशी खेळलो तर कुठलाही संघ या मालिकेत आपल्याला हरवू शकत नाही हेच मी आधी म्हणत होतो. काल मुनाफ, नेहरा, भज्जी सर्वांनी ते सार्थ केले.
एक नक्की आहे की अजूनही गोलंदाजी करताना सामना निव्वळ संपवून टाकायच्या (सर्व गडी बाद करायच्या) धडाडीने आपला खेळ होत नाहीये. काल दुसर्‍या टोकाकडून मोसबाह ला थोडीशी जरी साथ असती तरी शेवटच्या पॉ.प्ले. मध्ये अगदी हातघाईवर प्रकरण आले असते.
ज्या प्रकारे आपण काल गोलंदाजी/क्षेत्ररक्षण व संघ भावनेने खेळलो ते पहाता आपला संघ कप जिंकायला आता तयार/लायक आहे हे निश्चीत Happy
(ऑसी पेक्षा, पाक विरुध्ध सामन्याची मल चिंता अधिक होती याचे कारण त्यांची भन्नाट गोलंदाजी! काल सचिन चे झेल सोडले नसते तर काही वेगळे चित्र पहायला मिळाले असते का? माहित नाही.. कालच नेमका गुल ला वाईट दिवस लागला अन पाक ची वाट लागली. तेव्हा क्रिकेट हा गमतीशीर खेळ आहे हे खरच.. आपले लोक निश्चीतच प्रचंड दडपणाखाली खेळले आणि तरिही विजयी झाले... हे मह्त्वाचे!)
बाकी वैयक्तीक माझा धोणीवर राग नाही पण खेळात मैदानावर तयचे काही निर्णय अनाकलनीय ठरतात. आपण सामना जिंकलो तर ते निर्णय मास्टरस्ट्रोक वगैरे ठरतात ईतकच.
काल धोणी ने दोन चुका केल्या ज्या महागात पडू शकल्या असत्या:
१. स्वत: ला रैना च्या वर फलंदाजीला पाठवले. अन्यथा आपली धावसंख्या २८०+ असती.
२. स्वतः (पेक्षा रैना) व सचिन फलंदाजी करत असताना बॅटींग पॉवररप्ले घ्यायला हवा होता नो घेतला नाही.

काल शेवटी झहीर जेव्हा बैला सारखा हवेत बॅट फिरवत होता, रैना ला एक धाव काढून फलंदाजी देण्या ऐवेजी, तेव्हा अश्विन हा फलंदाज म्हणूनही किती उपयुक्त आहे हे वारंवार जाणवत होते.

लंकेचे फलंदाज पाक प्रमाणे हाराकिरी करत नाहीत- शेवट्पर्यंत झुंज देतील. नेमकी इथेच आपल्या गोलंदाजीचा अधिक कस लागेल. शिवाय लंकेच क्षेत्ररक्षण पाक पेक्षा खूपच चांगले आहे. तेव्हा आपण अजून जास्त आक्रमकतेने गोलंदाजी केली तर लंकेवरही दडपण आणून त्यांना चुका करायला भाग पाडू शकतो.

दिलशान (लंकेचा सेहवाग), संगा, आणि माहेला यांना लवकर बाद केले तर आपल्या विजयाचा मार्ग सुकर आहे कारण लंकेच्या मधल्या अन तळाच्या फलंदाजांवर या मालिकेत विशेष कामगिरी करायची वेळ आलेली नाही. त्यामूळे आयत्या वेळी प्रेशर खाली ते गडबडतील.

बाकी मैदानावरील खेळाडू, कॅप्टन आणि कोच यांनाच त्या सामन्याबद्दल ईतर सर्वांपेक्षा (यात सर्व समालोचक, जाणकार, ऊत्साही वगैरे) जास्त कळत असतं हेच सत्त्य आहे. आपण फक्त तर्कसुसंगत विचार मांडू शकतो Happy कधी कधी तेही चुकतात, कधी कधी आपणही चुकतो. शेवटी, असं म्हणतात की भारतात प्रत्त्येकाला क्रिकेट मधलं कळतं.. म्हणूनच या खेळाची गम्मत जास्त आहे Happy

तेव्हा कागदावर आपण भारी आहोत, मैदानावर भारी पडलो की काम फत्ते!

आता परवा ऐकायला मिळेल सचिइइइइइइइइइइइइइइन सचिइइइइइइइइइइइइइइन... गो साहेब!! Happy

टीम इंडिया लय भारी!!!

शनिवारी एका ठिकाणी एकत्र जमुन मॅच पहाणार आहोत! Happy ड्रेस कोड ब्ल्यु!!!
जुने दिवस आठवताहेत! तेव्हा असेच आमच्या छोट्याशा घरात एकत्र जमुन छोट्याशा टीव्हीवर मॅच बघायचो.

>>. शेवटी भारताने सामना जिंकल्यावर शेजारच्या गिलानीला तर सोडाच पण स्वतःला सुध्दा ऐकू जाणार नाहीत अशा पध्दतीने अत्यंत हलक्या टाळ्या त्यांनी वाजवल्या.

Rofl

वास परत येतोय वगैरे मुद्दामून सोडलेल्या पुड्या असाव्यात... एक आहे की डावखुर्‍या तेज्/मध्यम गोलंदाजांविरुध आपले फलंदाज थोडे व्हलनरेबल वाटतात (चँडूचा अँगल अन एकंदरीत आत येणारा चेंडू).
अंतीम सामन्यात अश्विन हवाच असे मला वाटते. लंकेला नेहराची गोलंदाजी माहित आहे, अश्विन मात्र त्यांच्यासाठी नविन ठरेल त्याचा फायदा आपल्याला होवू शकतो.
पण नेहरा ने अचानक चांगली कामगिरी केल्याने तोच संघात राहील असे वाटते. काल त्याचे क्षेत्ररक्षणही भारी होते. Happy
असो. गंभीर च्या जागी युसूफ आणि नेहराच्या जागी अश्विन चालतील... पण धोणी तसे करणार नाही हे माहित आहे Happy

>> शेवटी भारताने सामना जिंकल्यावर शेजारच्या गिलानीला तर सोडाच पण स्वतःला सुध्दा ऐकू जाणार नाहीत अशा पध्दतीने अत्यंत हलक्या टाळ्या त्यांनी वाजवल्या.
कारण पाठीशी मॅडम ऊभ्या नव्हत्या त्यामूळे जोर कमी पडला.. Happy बाकी मॅडम अन राहुल बाबा आम जनतेत बसले होते.. एकही संधी सोडत नाहीत! Happy

मास्तुरेजी, वासला घ्यावा किंवा घेतील असं नाही म्हणत आहे मी; त्याचा निश्चित पण मर्यादित उपयोग होऊं शकतो व म्हणून 'त्याला बोलावणार' ही नुसतीच "पुडी सोडणं" नसण्याचीही शक्यता असूं शकते, एव्हढंच.

याहि धाग्यावर भारताविरुद्ध लिहिणे, भारतीय खेळाडूंवर टीका करणे, यास सक्त मनाई आहे. भारतच जिंकेल अशी भावना घेऊनच इथे यावे. भारतीय संघातील खेळाडूंची निवड ही योग्यच आहे, भारतीय खेळाडू जे करतील ते बरोबरच आहे, असे लिहावे. भारतीय संघ किंवा खेळाडू यांच्यावर व्यक्तिशः टीका करणे, किंवा त्यांच्या खेळाबद्दल चुका काढणे, यास सक्त मनाई आहे. इतकेच काय, सर्व खेळाडू किती सुंदर दिसतात असेच लिहावे. कुणि रडके तोंड घेऊन खेळतो, अश्या प्रकारचे लिहू नये.

प्रत्येक लिखाणात 'भारतच जिंकणार' असे असलेच पाहिजे.

भारत जिंकणार.

Happy

वासला फक्त एक बॅक अप म्हणून ठेवले आहे.. तो खेळेलच असे नाही... कारण गेल्या दोनेक वर्षात त्यानी एकही इंटरनॅशनल मॅच खेळलेली नाही... कितीही भारी गोलंदाज असला तरी तो सध्या रस्टी असणार.. कुलसेखरा खेळायचे चान्सेस जास्त आहेत.. तो चांगला खेळतोय.. आणि आता सुद्धा दोन तीन मॅचेस खेळलाय...

सचिन आणि दिलशान यात सर्वात जास्त धावा कोण करेल वर्ल्डकप मध्ये काही अंदाज.
पहिल्या ३ कमकुवत प्रतिस्पर्ध्यांबरोबरच्या सामन्यानंतर मी साहेबांबद्दलची (सर्वात जास्त धावा करण्याची ) आशाच सोडली होती पण आता सही चान्स आहे ३र्ड टाइम इज चार्म.
मलिंगा मुरली मेंडीज ही बोलिंग खतरनाक वाटते. माझ्या मते युसुफ पठाणला घ्यावे या गेम मध्ये.

Pages