अजय यांचे रंगीबेरंगी पान

तेंंडूलकर माफ करा, आम्ही अजूनही तुम्हाला समजू शकलो नाही !

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

kamala.jpg

सध्या तेंडूलकरांच्या "कमला" नाटकावर आधारीत, "कमला" याच नावाची मालिका चालू आहे.

मी ही मालिका पाहीली नाही. ती किती चांगली किंवा वाईट आहे हे मी सांगू शकत नाही.

सध्या सोशल मिडीयामधे ही मालिका किती भंकस आहे याबद्दल प्रतिक्रिया वाचतो आहे. प्रत्येक प्रेक्षकालाच आपले मत व्यक्त करायचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेच.

विषय: 
प्रकार: 

हिवाळा आला !

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

मेंढ्यांवरी लोकर दाट भारी
थंडीस त्यांच्या बहू निवारी !

हूहू हू हू SSSSS कडकडकडकड SSSSSSS

- हिवाळा आला या चि. वि. जोशींच्या लेखाची सुरुवात.

या वर्षी हिवाळा जरा जास्तीच जाणवतो आहे. स्थानिक वेळेप्रमाणे आज सकाळी मायबोलीच्या मुख्यालयाबाहेरचं तापमान, डीग्री सेल्सियस मधे.
maayboli_is_cool.jpg

प्रकार: 

नशीबानं एका हातानं दिलं , दुसर्‍या हातानं काढून घेतलं

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

बराक ओबामाला प्रत्यक्षात बघायची खूप दिवसांपासूनची इच्छा आहे. नुसतं लांबून नाही तर जवळून बघायची संधी अचानक चालून आली.

प्रकार: 
शब्दखुणा: 

मराठीचं काय होणार?

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

बेफिकीर यांचा मराठीचा अभिमान Uhoh हा लेख नक्कीच विचार करायला लावणारा आहे. लेखातले काही मुद्दे पटले तरी त्यामधे भविष्यात काय घडू शकेल, याबद्दल जे विचार मांडले आहेत ते मला पटले नाही. थोडे पुढे जाऊन मी असे म्हणेन कि त्यांनी वर्तवलेले भाकीत खरे ठरले तरी त्यामागची कारणे मात्र त्यांनी मांडलेली नसतील. त्यांच्या एकेक विधानाचे मुद्देसूद खंडण करणारा हा लेख नाही. तर मनात आलेले काही वेगळे विचार मांडण्याचा हा प्रयत्न आहे.

१. मानववंशशास्त्र आणि समाजशास्त्रः

प्रकार: 
शब्दखुणा: 

श्री रत्नाकर मतकरींबरोबर मायबोलीबद्दल थोड्या गप्पा

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

शिकागोच्या बृ. म. मं. च्या अधिवेशनात मायबोलीचा विश्वसेतू हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमानंतर प्रमुख पाहुणे श्री रत्नाकर मतकरी यांच्याबरोबर थोड्या गप्पा मारण्याचा योग आला. त्यांना मायबोली आणि मायबोलीकरांबद्दल अगोदरच माहिती होती. ती त्यांच्याच शब्दात.

विषय: 
प्रकार: 

किती बदललंय शिकागो !

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

१९ वर्षांपूर्वी पहिल्यांदा अमेरिकेत पाऊल ठेवलं ते शिकागोमधे. पण आल्या आल्या एका टुमदार उपनगरात (शाँबर्ग) रहायला गेलो त्यामुळे प्रत्यक्ष शिकागो शहर पहायचा योग जवळ जवळ महिन्यांनी आला.

विषय: 
प्रकार: 

'पुरुष’मय स्वप्न च्या निमित्ताने

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

निमित्त आहे मणिकर्णिका यांचं ’पुरुष’मय स्वप्न हे विनोदी लेखन !

सगळ्यात महत्वाचं. हा लेख मायबोलीवर आहे यात काहीच वावगं नाही. हा लेख इतर अनेक वाचकांना आवडला तसा मलाही आवडला.

हा लेख विनोदी नसता तरी तितकाच योग्य आहे. एका व्यक्तीला वाटलेलं स्वप्न, विचार तिने हवे तसे मांडले. आणि माझ्यासकट अनेक वाचकांना ते तितकेच आवडल्याचंही दिसतंय.

माझा मुद्दा आहे त्यावर आलेल्या प्रतिसादांबद्दल.

किंवा त्यापेक्षाही त्यावर न आलेल्या प्रतिसादांबद्दल.

विषय: 
प्रकार: 

एक "ताप"दायी अनुभव

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

दोन दिवस अंगातली कसकस जात नव्हती. मधून मधून ताप होता. अंगदुखी, घसादुखी,खोकला, सर्दी हे चालूच होतं. हं असेल थोडा फ्लू म्हणून Tylenol घेऊन थोडं दुर्लक्ष केलं. पण अगदीच बरं वाटेनासं झालं तेंव्हा डॉक्टरची भेट मिळतेय का म्हणून फोन लावला.

विषय: 
प्रकार: 
Subscribe to RSS - अजय यांचे रंगीबेरंगी पान