नशीबानं एका हातानं दिलं , दुसर्‍या हातानं काढून घेतलं

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

बराक ओबामाला प्रत्यक्षात बघायची खूप दिवसांपासूनची इच्छा आहे. नुसतं लांबून नाही तर जवळून बघायची संधी अचानक चालून आली.

President_Official_Portrait.jpg अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधीच्या दिवशी रात्री अनेक सोहळे असतात. त्यातलाच एक म्हणजे Inaugural Ball. असे एका पेक्षा अधिक Inaugural Ball असतात आणि राष्ट्राध्यक्ष या सगळ्याच ठिकाणी हजेरी लावतात. काही सोहळे फक्त अमेरिकन सैन्यात असणार्‍यांसाठी असतात. पण त्यातल्या काही ठिकाणांची तिकीटं लॉटरी पद्धतीने कुणालाही मिळू शकतात. पण तिकिटं मर्यादित असल्यामुळे त्याला प्रचंड मागणी असते. काही दिवसांपूर्वी सहज गंमत म्हणून मी माझं नाव दिलं होतं आणि मी ते विसरूनही गेलो होतो.

काल रात्री अचानक मला उद्घाटन समितीकडून एक ईमेल आली. त्यात त्यांनी असं म्हटलं होतं अजून काही तासात आम्ही तुम्हाला दुसरी ईमेल पाठवतोय तिच्याकडे लक्ष ठेवा. ती खरी ईमेल आहे. स्पॅम नाही. पण तातडीने तिकीटे घ्या कारण तुम्ही घेतली नाही तर कितीवेळ राहतील याचा भरोसा नाही. आणि काही तासांनी खरोखरच दुसरी ईमेल आली जी खाली दिली आहे. मला Inaugural Ball ची तिकीटे मिळणार होती. मी तातडीने त्यांनी दिलेल्या वेबसाईटवर त्यांनी दिलेल्या खात्यात प्रवेश केला. आणि आनंदाची गोष्ट तिकीटे शिल्लक होती. मी तिकीटे घ्यायच्या प्रक्रीयेस सुरुवात केली. आणि एका वाक्यावर अडलो. Once Issued Tickets are non transferable and will be sent to the address you enter, by UPS.

आणि मला आठवलं, मला जाणं शक्य नाही कारण २-३ दिवसात मी देशाबाहेर चाललो आहे. घरी कुणीच नसणार होतं. मी तिकीटे माझ्या नावाने काढली असती तर वाया जाणार होती. मग असा विचार आला की मला नाही जाता आलं तर दुसर्‍या कुणाच्या नावानं आताच काढली तर त्याना तरी जाता येईल. पण आयत्यावेळेस कोण जाईल. कारण या Inaugural Ball साठी ड्रेस कोड आहे त्यामुळे सगळा पोषाख करून जायची तयारी हवी. बाहेरगावची व्यक्ती असेल तर प्रवासखर्चाची तयारी हवी.

मी राजधानीच्या जवळपास राहणार्‍या अनेक मित्रांना फोन लावले. त्यातले काही मायबोलीकरही आहेत. पण कुणाशीच वेळेत संपर्क झाला नाही. एका मायबोलीकरणीचा फोन आला पण त्याच्या काहीच मिनिटं अगोदर "No tickets available" असं ती वेबसाईट मला सांगू लागली होती.

हळहळ, हळहळ, हळहळ !!! मला तिकिटं मिळाली नाहीत याची हळहळ. मी कुणाला देऊ शकलो नाही याची पण हळहळ !

Dear Ajay,

President Barack Obama will be sworn in for his second term as the 44th President of the United States of America on Monday, January 21, 2013.

The Presidential Inaugural Committee is pleased to offer you the opportunity to attend the Inaugural festivities. This email contains the information you’ll need to join us here in Washington, DC for the official Inaugural events. This email contains specific information for your access to Inaugural tickets.

Below, please find a link, your account number and account password for our secure ticketing website. You can access your tickets and input your address and billing information from the link.

Tickets that are being shipped will arrive via UPS once you complete your transaction. Therefore, it is extremely important that your shipping address is correct.

Please click the following link to login to Ticketmaster's secure website:

Login to Ticketmaster

Your account number is : XXXXXXXX (खात्याचा क्रमांक अदृष्य केला आहे)

Your password is: XXXXXXXXXX

We urge you to accept your tickets and complete your order via the ticketing website as soon as possible.

Do not distribute your account number and password or forward this email, as either may invalidate your tickets and your ability to attend any official Inaugural events.

For further information on official Inaugural events, please visit our website at: http://www.2013pic.org.

We look forward to celebrating four more years with you in Washington, DC.

Sincerely,

David Cusack
Executive Director
Presidential Inaugural Committee

All sales final. No refunds or exchanges. Further, if any event for which tickets are purchased is cancelled, rendered impossible to hold or otherwise becomes commercially impracticable to hold by reason of inclement weather, fire, flood, acts of God, strikes against third parties, civil disorder, terrorism or acts of war, governmental directive or law, rule, ordinance or regulation, or any other reason beyond the control of the Presidential Inaugural Committee 2013 (“PIC”), then the PIC shall not be liable for any refund or any other loss or damage suffered by any purchaser of tickets for the event or holder of tickets to the event. If any purchaser of tickets to an event or any holder of tickets to an event is unable to attend, view or otherwise participate in any event as a result of crowds, delays, inclement weather, access limitations, entrance lines or any other reason whatsoever, the PIC shall not be liable for any refund or any other loss or damage suffered by such ticket purchaser or ticket holder. The PIC (and its designated appointees, employees and volunteers) reserves the right, in its sole and absolute discretion, to deny event access and/or entrance to any ticket holder and the PIC shall not be liable for any refund or any other loss or damage suffered by such ticket holder.

Donations or gifts to the Presidential Inaugural Committee 2013 are not tax deductible.

This email was sent by:
2013 Presidential Inauguration Committee
330 C Street SW, Room G-0203
Washington, District of Columbia 20270

प्रकार: 
शब्दखुणा: 

भाग्यात असेल तर पुन्हा मिळतील >>>
पण ह्याच सोहळ्याचे तिकिट मिळायला ओबामांना परत निवडून यावे लागेल. Happy आणि अजयना न जाणे किती वर्ष अजून थांबावे लागेल?

बादवे, आपल्या रजनी चे नाव घेऊन ओबामांना भेटा की. रजनी को सब जानते है Proud

अर्र! Happy
लालूला द्यायची ना! (तिथे हिलरी असणार आहे असं सांगायचं - तिने लग्गेच घेतली असती! :P)

Sad अजय! पण बेटर लक नेक्स्ट टाईम !
पुढच्या वेळेला जर हिलरीबाई निवडून आल्या( ? ) तर एका तिकीटात तीन तीन प्रेसीडेंट ! हिलरीबाई, क्लिंटन आणि यंदा मिस झालेले ओबामा पण! (कदाचित, मावळते प्रेसी. म्हणून!)

ओ:! गेली खरी एक सुसंधी. पण हरकत नाही. कदाचित ओबामा तुम्हाला स्वत:हून आमंत्रण पाठवून भेटीला बोलावण्याचा योग असेल.

<<पुढच्या वेळेला जर हिलरीबाई निवडून आल्या( ? ) तर एका तिकीटात तीन तीन प्रेसीडेंट ! हिलरीबाई, क्लिंटन आणि यंदा मिस झालेले ओबामा पण! (कदाचित, मावळते प्रेसी. म्हणून!)>>+१

शिर्षक वाचून अजय नी पण गझल लिहिली वाटतं म्हणत वाचायला आले Happy

शिर्षक वाचून अजय नी पण गझल लिहिली वाटतं म्हणत वाचायला आले
>>
Rofl
गझला वाचायला स्वतःहून जाता म्हणजे तुम्हाला दंडवतच घातला पाहिजे Proud Light 1

पण ह्याच सोहळ्याचे तिकिट मिळायला ओबामांना परत निवडून यावे लागेल. >. ते शक्य नाही. तिथं २वेळाच हे पद मिळतं.

अजय, असं काहितरी करा की ओबामा तिकीट काढून तुम्हाला भेटायला येइल Wink