किती बदललंय शिकागो !

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago
Time to
read
<1’

१९ वर्षांपूर्वी पहिल्यांदा अमेरिकेत पाऊल ठेवलं ते शिकागोमधे. पण आल्या आल्या एका टुमदार उपनगरात (शाँबर्ग) रहायला गेलो त्यामुळे प्रत्यक्ष शिकागो शहर पहायचा योग जवळ जवळ महिन्यांनी आला.
तेंव्हा प्रथम भेटित मला शिकागोमधे खूप असुरक्षीत वाटलं. तो पर्यंत डाऊनटाऊन हा प्रकार अनुभवला नव्हता. विकेंडला त्या उंच उंच इमारती पाहून, आजूबाजूची शांतता आणि माणसांची कमतरता यातून काहीतरी आता घडणार असं वाटायचं. त्यात रस्त्यावर फिरणारे होमलेस कृष्णवर्णिय पाहिले की आता त्यातला कुणितरी आपल्या अंगावर धावून , बंदूक काढून पैसे मागणार अशी भिती वाटायची. त्यात एकदा दारू पिऊन तर्र झालेल्या माणसाने मागे लागून चेंज द्या असाही एक प्रकार घडला. भारतात पाहिलेले इंग्रजी चित्रपट, त्यातले सनसनाटी प्रसंग डोक्यात ताजे होते. आणि शिकागो म्हणजे असुरक्षीतता असं पक्क मनात बसलं.

गेल्या वर्षी , अमेरिकेत १८ वर्षे काढल्यावर परत शिकागोला एका कामासाठी गेलो होतो. डाऊनटाऊनमधेच उतरलो होतो. संध्याकाळी/रात्री कुठेही फिरताना भिती वाटली नव्हती. एकही कृष्णवर्णिय दिसल्याचं आठवत नाहीये. कारण आता मुद्दाम वर्ण लक्षात ठेवून माणसांकडे पाहिलं जात नाही. मला एकही होमलेस दिसला नाही का मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला शिकलो हे माहिती नाही. एका रात्री बारमधून हॉटेलवर जाताना माझ्या बरोबरचा सहकारी दारू पिऊन कसा तर्र झाला होता आणि रस्त्यातल्या एका माणसाला चेंज मागत होता हे आठवल्यावर हसू फुटतंय. शिकागोशी निगडित चित्रपट आठवले पण त्यातले सगळे प्रसंग मनात कुतुहल निर्माण करणारे , काहितरी नवीन सांगणारे होते. थोडक्यात मी अगदी जिवाचं शिकागो केलं. कुठेही भिती वाटली नाही.

गेल्या १८ वर्षात, शिकागो किती बदललंय नाही !! Happy

“When I was a boy of 14, my father was so ignorant I could hardly stand to have the old man around. But when I got to be 21, I was astonished at how much he had learned in seven years.” —Mark Twain

विषय: 
प्रकार: 

नियर वेस्ट साईडला गेल्यावर आजही भिती वाटेल. तसेच मिडवे एअरपोर्टच्या काही भागात रात्री नक्कीच दचकायला होईल. आणि भरपुर होमलेस ह्या भागात भिक मागताना दिसतील. Happy

मिडवेला तर दिवसाही भिती वाटते. पहिलाच अनुभव विचित्र होता. हायवे ला लागायच्या आधिच्या रेड लाइटला थांबलेले असताना सरळ एकाने गाडीची पुढची काच पुसायच नाटक सुरु केल. बराच फेस केला की ज्यामुळे समोरच काही दिसनार नाही. आता ग्रीन लाइट झाला आणि मागचे लोक लागले हॉर्न वाजवायला. घाबरुन गेले. शेवटी खिडकीची काच केली खाली एक नोट जाण्याइतपत. फेकली नोट, वायपर सुरु केला आणि निघाले.
ऑफिस मधल्या कलिगला सांगितला हा प्रसंग. तो म्हणाला हे लोक असच करतात. पुढच्या वेळेस कोणी कार जवळ येताना दिसल कि सरळ पाणी मारून वायपर सुरु कर.

गेल्या १८ वर्षात, शिकागो किती बदललंय नाही !! >> १८ वर्षांच माहीत नाही पण गेल्या ३-४ वर्षात तरी नक्कीच बदललय.

आई-वडिलांना घेऊन डाउनटाउन पहायला गेलो होतो आणि वीकेंडला स्वस्त आहे म्हणुन मोनोरे स्ट्रीटला पार्क केले. पण त्यांचा रुल आहे की डॅशबोर्डवर पावती लावणे जेणेकरुन ती दिसेल आणि गाडी टो होणार नाही. पण हे लक्षात आले नाही आणि पे करुन तसेच डी.टी. बघायला गेलो.

नेव्ही पीअर फायरवर्क्स बघुन रात्री १०:३० च्या दरम्यान आलो तर काय गाडी टो केलेली. मग टो कंपनीला नंबर लाउन तिथपर्यंत टॅक्सीने गेलो. तो टॅक्सी प्रवास फारच भयानक होता (३-४ माईल्स फक्त). शामु ड्रायव्हरने होमलेस कृष्णवर्णिय एरियातुन गाडी नेली तेंव्हा फारच भिती वाटलेली, पण सुदैवाने काही वाईट अनुभव आला नाही. टो वाल्यांनी १६०$ चा चुना लावला फक्त ते सोडुन.

Happy
मी २००१ एक साली अमेरिकेत मिडवेस्ट मध्ये आलो. नंतर ३ वर्षांनी नोकरी निमीत्त न्यु यॉर्क ला पहिल्यांदा आलो तेव्हा अक्षरशः अंगावर आलं होतं ते शहर माझ्या. एकतर आधीच नोकरीची गणगण डोक्यात चालू असल्यामुळे प्रचंड असुरक्षितता वाटत होती.
न्यु जर्सीत कॉलेज मधल्या एका मित्राकडे वास्तव्य होतं काही आठवडे. तो जर्सी मध्ये एडिसन, पार्सिप्पनी वगैरे ला फिरायला म्हणून घेऊन गेला. पार्सिप्पनीत त्याच्या मैत्रिणीकडे आम्ही एका पार्टीला सुद्धा गेलो. मी सध्या पार्सिप्पनी मध्ये नोकरी करतो (इथे येऊन ही आता ४ वर्ष होत आली) आणि अजूनही मला मी त्यावेळेस नेमका कुठल्या भागात आलो होतो ते आजिबात आठवत नाही.
मी तर म्हणेन ह्या असुरक्षितते पायी मी न्यु यॉर्क मधली जवळ जवळ ३ वर्ष काहीच एनजॉय केली नाहीत. आता आत जसं जीवाचं न्यु जर्सी केलं तसच एकदा पुन्हा कॉलेजच्या ठिकाणी जाऊन जीवाचं मिडवेस्ट करायची सुद्धा खुप इच्छा आहे. ३ वर्ष तिथे राहून एकदाही ते शहर सोडून आजू बाजूच्या शहरांत सुद्धा गेलो नाही कधी. Happy

कोणतं शहर अंगावर आलं? न्यू यॉर्क?
पण हे शिकागो आहे ना? Happy
न्यू जर्सी पण ? काय गोंधळ चाललाय ? Happy

तीन वर्षे कुठे? न्यू यॉर्क का शिकागो?{ मिडवेस्ट म्हणजे मी शिकागो गृहीत धरतिये:)}
का दोन्ही कडे पण तीन तीन वर्षे राहून एंजॉय नाही केलं ?
असूदे, ऐसे बडे बडे शहरो मे ऐसी छोटी छोटी ..... you know the rest Happy