भोकsरूss

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago
Time to
read
1’

शेवाळी रंगाचं,
शेंबड्या अंगाचं,
मराठी ढंगाचं,
माझं भोकरूss

लोणची जायाचं,
पुरवून खायाचं,
सांभाळा रातीचं,
माझं भोकरूss

कैरीशी मैत्रीचं,
चवीच्या खात्रीचं,
तों.पा.सो, रुपाचं,
माझं भोकरूss

मुरल्या वाणाचं,
भेव गंss पाण्याचं,
रक्षण दाद्र्याचं
माझं भोकरूss

प्रेरणा: http://www.maayboli.com/node/43403 आणि http://www.maayboli.com/node/42775

विषय: 

हे खरं विडंबन!
सह्ही आहे.

मस्तं भोकर्याच्या लोणच्याची दादरा बांधलेली चिनीमातीची बरणी डोळ्यासमोर आली.

Wink

आधी लेखिकेचं नाव पाहिलं.
मग जुना चांदोबा (मासिक नव्हे फोटो Proud ) आठवला. Biggrin
मगच कविता सेक्शन उघडण्याची हिमंत झाली.
भारीये... Happy
मग मुळ स्त्रोत शोधला. Proud

मृण इज बॅक Lol

दोघादोघांनी कंप्लेट केलीये वरती. श्रेय देत नाही हां तुम्ही, हे बरे नव्हे! Proud

कैरी अन भोकराचे लोणचे - शेवाळी रंगाचे कसे होईल?
भोकरे मिळत नसतील तर मेक्सिकन ऑलिव्ह्स चालतील का Wink

भेव गंss पाण्याचं,
रक्षण दाद्र्याचं - हे एकदम भारी आहे Rofl

Pages