माझी जमीन कसण्या घेऊन प्रोफ गेले!

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago
Time to
read
1’

'जमीनी सुरक्षीत नाहीत' अशी सर्वत्र बोंबाबोंब आहे. त्यामुळे जमिनीचा नाद सोडून गाळा डायरेक्ट इथून उचलला आहे.

माझी जमीन कसण्या घेऊन प्रोफ गेले!
सैपाक* मीच केला, जेवून प्रोफ गेले!

'प्याले हलाहलाचे रिचवेन मीच' म्हणुनी....
कोन्याक हाय माझी सेवून प्रोफ गेले!

'माझ्या घरी बरा मी' ठसक्यात सांगताना....
दारात वाकुल्यांना दावून प्रोफ गेले!

'पाडेन काव्यचकल्या, सोर्‍या तुटो बेहेत्तर'....
झेंडा बगावतीचा रोवून प्रोफ गेले!

मृण धन्यवाद देई विचक्या न टाकल्याचे....
मातब्बरांस इथल्या भोवून प्रोफ गेले!

* 'आर्ती'च्या चालीवर वाचावे.
** प्राध्यापकांनी (हे चुकूनमाकून वाचलंच तर) उदार मनानं माफ करावं ही विनंती.

विषय: 
शब्दखुणा: 

Rofl

कोन्याक नावाचं एक पेय आहे रि

मुळ रचना अजुन वाचली नाहिये, पण नावं एका खाली एक होती.. त्यावरुन ही मस्त जमली असणार हे जाणवलं

जियो मृण! Lol भन्नाट जमलीये.

परागः 'आर्ती' ला बहुधा प्रोफेसरांच्या नुक्त्याच आलेल्या कुठल्यातरी गझलेचा रेफरन्स आहे. Happy

जमीनी सुरक्षीत नाहीत अशी सर्वत्र बोंबाबोंब आहे<<<

मृण धन्यवाद देई <<<

प्राध्यापकांनी (हे चुकूनमाकून वाचलंच तर)<<<

Lol

बेहेत्तरमध्ये वृत्त भंगवणे हेही उचललेत वाटते?

भन्नाट. असं लिहायला जमायला हवं.
उत्सवमूर्तींचं फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे, सगळ्याना पटाटा संदर्भ लागले Proud

कोन्याक हाय माझी...... काय म्हणतात ते हासिल शेर Lol

प्याले हलाहलाचे रिचवेन मीच' म्हणुनी....
कोन्याक हाय माझी सेवून प्रोफ गेले!<<< हा शेर त्यातल्या त्यात जरा बरा वाटला.

इतर शेर तसे सुमारच आहेत!!!!

Lol क्लासिक मृ!

तुझी उपाधी काय आहे? ती लिहायची राहिली शेवटी, बोल्ड अक्षरांत! आणि आमच्या अभिरूची, समज इत्यादींचे माप आठवणीने काढ तुझ्या प्रतिसादांच्या प्रतिसादात Happy

आमच्या अभिरूची, समज इत्यादींचे माप आठवणीने काढ तुझ्या प्रतिसादांच्या प्रतिसादात
>>>
जे वाह वाह म्हणतायेत त्यांच माप कसं काढणार? Uhoh

त्यापेक्षा एकदा येऊन 'वाहवा' असं लिहुन जा.

भारीच Rofl
आता तुमच्यावर येणार अलामत की बलामत काय असते ती
अलाबला टाळण्यासाठी कोन्याक सोडून जे काही उरले असेल ते तातडीने गट्टम करा,
म्हणजे मग तुम्ही कोणत्याच जमिनीवर नसाल आणि
नंतर समजा समुद्रात तुमचे विमान उतरले तर ही जमिनीवरची कसरत पण करायची गरज पडणार नाही.
पण जर का वेगळ्या एखाद्या जमिनीवर उतरलात तर काही खरे नाही (सर्वांचेच) Lol

Pages