मराठी

झकास : मराठी चित्रपट

0

हा चित्रपट पाहिल्यानंतर मला अक्षय कुमारच्या " गरम मसाला " चित्रपटाची आठवण झाली . थीम सुद्धा अगदी तीच आहे . बघताना हसून हसून पोट दुखायला लागते . अंकुश चौधरीला अभिनय आणि दिग्दर्शन अतिशय व्यवस्तीत जमले आहे . तर हा छावा एकाचवेळी तीन तीन गर्ल फ्रेंड्स सांभाळत असतो . त्यातली एक सई ताम्हणकर हिचा फोटोग्राफीचा व्यवसाय असतो आणि हा अंकुश तिला गर्ल फ्रेंड बनवून तिची कार फुकटात चालवत असतो . दुसरी गर्ल फ्रेंड पूजा सावंत , तीची जाहिरातीची फर्म असते परत इथे अंकुश तिचा बॉयफ्रेंड बनून कामाला असतो आणि तिसरी असते कोल्हापुरी मिरची अमृता खानविलकर , अंकुश इथे राहायची सोय होते म्हणून तिच्या बरोबर राहत असतो .

वाढदिवस!!!

वर्षातले ३६३ दिवस एकीकडे! आणि *हा दिवस दुसरीकडे!
अशा तुलनेतही ज्याचे पारडे खाली जाईल, तो दिवस म्हणजे वाढदिवस!!

सकाळी बरोब्बर ६.१५ ला जाग आली. मोबाईलला गजर करण्याची गरजच पडली नाही. एका आवर्तनामधे उठलो. पांघरूणाची घडी केली. आवरलं. एक पेला भरून पाणी प्यालं. पुस्तकात वाचल्याप्रमाणे प्राणायाम केला. १२ सूर्यनमस्कार घातले. जॉगिंगला गेलो. साधारण अर्ध्या तासाने परत आलो. मनसोक्त व्यायाम झाल्यामुळे आनंद झाला. दिवसाची सुरुवात अशी छान झाली, म्हणजे दिवसही छानच जाणार! त्यातून आज माझा वाढदिवस! मग काय बोलता?

मोरया- जल्लोष की आक्रोश...!!

0

तूच माझी आई देवा तूच माझा बाप
गोड मानूनी घे सेवा पोटी घाल पाप...
या ओळींसह चित्रपटाची सुरूवात होते आणि सोबतीला सगळ्यांच्या लाडक्या लालबागच्या राजाची मिरवणूक. कोणत्याही शुभकार्याचा आरंभ गणेशाच्या नावाने करावा तशी 'मोरया' चित्रपटाची सुरूवात ही या गाण्याने आणि ज्याच्या दर्शनासाठी लाखो भाविक तासनतास रांगेत उभे राहतात अशा लालबागच्या राजाच्या दर्शनाने होते.

मग गुगलवर मराठीच का नाही?

0

गुगलने गुजराती पासून कन्नड पर्यंत भाषांच्या भाषातराची सोय केली आहे पण त्यातून मराठीला वगळण्यात आले आहे. याविरुद्ध दाद मागण्यासाठी भरत गोठोसकर यांनी एक ऑनलाईन याचिका बनवली आहे. याद्वारे किमान काही आवाज तरी निर्माण होईल अशी आशा आहे.

आपल्या लेखात भरत म्हणतात, 'भारतीय भाषांमध्ये प्रथम हिंदीला २००८ साली या सेवेत समाविष्ट करण्यात आले. या देशातील अन्य भाषांना यासाठी तीन वर्षे वाट पाहावी लागली. आता गुगलने उर्दू, बंगाली, तेलुगू, तमिळ, कन्नड व गुजराती या भाषांनाही सामील करून घेतले आहे. मराठी मात्र वळचणीला टाकली आहे!'

सारेगमप पर्व नव्हे गर्व - २०११

0

'मराठी सा रे ग म प' झी मराठीवर सोम मंगळ रात्री ९.३० वाजता चालू झाले. नविन सुत्रसंचालक - प्रिया बापट (मी फक्त प्रिया बापट ह्यांचा हसमुख चेहरा पहातो कार्यक्रम ऐकत नाहीये! ह्याची जाणकारांनी कृपया नोंद घ्यावी. फिदीफिदी ) व अजय, अतुल ह्या नव्या परिक्षकांसह. हा धागा ह्या स्पर्धेतील गाण्यांबद्दल / व कार्यक्रमाशी संबंधित चर्चा करण्यासाठी...

मराठी कि 'घाटी' ?

नमस्कार
मी मराठी,भारत व भारतीय संस्कुती बद्दल अभीमान बाळगणारा.
व्यवसाया निमीत्त व करमणुकी साठी इन्टरनेट वापरणारा.
आपल्या नेहमी वाचनात येते की समाजातील अनेक माणसे याचा वापर आपले विचार, सुचना प्रर्दशीत करण्यासाठी करत असतात.
मलाही वाटायचे की आपणही आपले वीचार समाजा पर्यंत पोहोचवावेत. सर्वात मोठी अडचण होती मराठी टायपींगची. म्हटले सुरवात तर करुया जमेल हळु हळु. जसे

"केल्याने होत आहेरे आधी केलेची पाहीजे."

नेटकर्‍यांचे साहित्य संमेलन

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या वर्षी दिनांक २५ ते २७ डिसेंबर या काळात ठाणे येथे होत आहे.
या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे या संमेलनात असलेला तरूणांचा सहभाग. ठाणे जिल्ह्यातील अनेक शाळा कॉलेजांमधील विद्यार्थी आणि तरूण साहित्यिक हे संमेलन गाजवतील अशी अपेक्षा आहे. या संमेलनात एक पूर्ण दिवस युवा साहित्य संमेलन असणार आहे. आणि हे संमेलन जोरदार व्हावे यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी चालू आहे. दहाहजारांहून अधिक तरूण मंडळी या संमेलनात सामिल होतील.

त्याचीच एक पूर्वतयारी म्हणून दिनांक १४ नोव्हेंबर रोजी एक नेटकर्‍यांचे साहित्य संमेलन

झिजता-झिजता

वाटोळा दगड बनून
तुझ्या प्रेमात भिजावं
तुझ्या प्रवाही वाहताना
ज्या दगडानं झिजावं

तुझ्या प्रेमापोटी झिजताना
दृढ व्हावी नाती
न कळावे झिजता झिजता
कधी बनलो रेती

पुढे पुढे जाताना
विसरून भेद अन जाती
हे देशा तुजसाठी
वाटे अखेर व्हावे माती

पुन्हा त्या मातीची
घेऊन कुणी आन
झिजावं झिजावं आमरण
तुझी राखण्या शान

हरवलेला भारतीय

प्रत्येक देशाला अस्तित्वासाठी एक समान धागा असावा लागतो.समान धागा असल्याशिवाय 'अनेकत्वातुन एकता" म्हणजे फक्त पोकळ घोषणा आहे. एकच गोष्ट भारतात हरवलेली आहे आणी ती म्हणजे 'भारतीय" असणे. "भारतीय" असणे हे बाकि सर्व गोष्टीच्या मागे पडते. ऊरते ते केवळ हिंदु असणे, मुसलमान असणे,बिहारी असणे, दलीत असणे, ब्राह्मण असणे.