कला

संवाद : BMM २०२६: उत्तररंग सह-अध्यक्षा (co-chair) - श्रीमती उषा आडगावकर

Submitted by सुखदा देवधर on 17 July, 2026 - 13:30

नमस्कार मंडळी!

बीएमएम २०२६ (BMM 2026 - बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०२६) मधे ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण 'उत्तररंग' आयोजित केला आहे. त्यामध्ये उत्तम चर्चासत्र, व्याख्याने आहेतच. पण मला उत्सुकता आहे ती त्यातल्या अंताक्षरीची. या अंताक्षरीचा सगळा बेत आखलाय आपल्या उषा काकूंनी.

विषय: 

ठसे वापरून शुभेच्छापत्र - विजयालक्ष्मी - मनिम्याऊ

Submitted by मनिम्याऊ_मृण्मयी on 26 September, 2026 - 02:03

मायबोली गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस. घाई झाली फारच.
ठसे वापरायचे होते.. काही सुचेना.. मग हाताचेच ठसे मारून मंडला मोर बनवले.

स्वतःलाच Happy birthday.. येतोय ना लवकरच..

गेले करायचे राहून - माझेमन

Submitted by माझेमन on 25 September, 2026 - 01:59

करायला हव्यात अश्या गोष्टी कराव्याच लागतात ना सगळ्यांना. त्यामुळे उरतात त्या स्वान्तसुखाय गोष्टी. त्यातही अचानक समोर आलेल्या गोष्टी करताना आनंद मिळत असेल तर माणूस फारसा विचारही करत नाही की अजून काय करता आलं असतं. (आयुष्य हे असंच असतं लिहायचा जबरदस्त मोह टाळतेय इथे.) तसंच माझंही. १-२ गोष्टी आहेत ज्या मी केल्या पाहिजेत पण त्या करणं सर्वस्वी माझ्याच हातात असल्याने कधीतरी, गळ्याशी आल्यावर का होईना करेन.

पण बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी ज्या आज केल्या तरी काही उपयोग नाही, त्या राहून गेल्या हे खरं.

विषय: 

गेले करायचे राहून

Submitted by mrsbarve on 25 September, 2026 - 00:51

गेले करायचे राहून ऐवजी गेले करायचे राहून - अजून पर्यंत तरी ! असा काही तरी विषय हवा होता कारण नाहीतर , उगीच म्हातारं झाल्यासारखंच वाटतं .
किंव्हा कुढत बसल्यासारखं वाटतं बुवा. आणि आपल्याला जे ऍक्चुअली हवे असतें ते मिळवण्यासाठी आपण वेळ काढतोच आणि कष्ट घेऊन करतोच.असं मला नेहमी वाटतं .
पण कधी कधी कष्टाची तयारी असून किंवा वेळ देऊन हि एखादी गोष्ट करणे साध्य करणे जमत नाही मी म्हंटले तसे अजून पर्यंत तरी - ते म्हणजे छान गाणं म्हणायला शिकणे!

विषय: 

शुभेच्छापत्र - रिदीत गोडबोले - रीया

Submitted by रीया on 22 September, 2026 - 08:17

पाल्याचे नाव - रिदीत गोडबोले
वय - ७ वर्ष
ठसे कामात वापरलेल्या वस्तु - अर्धा बटाटा , गाजर, रंग

थिम - नेचर

रिदीतचा आज हॅपी मूड होता त्यामुळे तो मूड दर्शवणारे चित्र काढायचे त्याने ठरवले. त्याच्या भाषेत - आयेम वाईबिंग सो धीस औरा!

विषय: 

शुभेच्छापत्र - निहीत गोडबोले - रीया

Submitted by रीया on 22 September, 2026 - 08:03

पाल्याचे नाव - निहित गोडबोले
वय वर्ष - २

निहितला ठसे काम फार आवडते. त्यामुळे संयोजक मामा/ मावशी आणि आजोबांना खुप वेळा थँक्स. आईला ५ मिनिटे विश्रांती मिळाली.

दादाची मदत - बटाटा आणि गाजर कापुन देणे, रंग ताटात ओतुन देणे, कागद दुमडून देणे

दादाने सांगितलं म्हणुन निहित आणि दादा सुरवंट काढले

d2adf8ae-d133-4bad-88a1-66116a418e42_0.jpeg

विषय: 

लहान व मोठ्यांसाठी कला उपक्रमः ठसे वापरून शुभेच्छापत्र

Submitted by संयोजक on 12 September, 2026 - 12:57

लहान व मोठ्यांसाठी कला उपक्रम: ठसे वापरून शुभेच्छापत्र

आठवतंय का, एक काळ असा होता की आपण एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी शुभेच्छापत्रे पाठवत होतो.
आता या मोबाईलच्या आणि डिजिटल युगात आपण सगळ्या शुभेच्छा ऑनलाइनच देतो.
मोबाईलवर मेसेज लिहिला, एकदोन ईमोजी टाकले की झाले काम. शुभेच्छापत्रे देणे-घेणे पार विसरूनच गेलो आहोत का आपण?

स्वतः हाताने बनवलेली शुभेच्छापत्रे, त्यातली चित्रे, संदेश समोरच्याला आपल्या मनातल्या खऱ्या भावना सांगून जातात.
आपल्यापैकी अनेकांनी अशी जुनी शुभेच्छापत्रे अगदी सांभाळून ठेवली असतील, यातच सगळे आले.

विषय: 

पाणी वाचवा - स्नान न करता शरीर व आत्मा शुद्ध ठेवा.

Submitted by Madan Hunkare on 8 September, 2026 - 08:54

भारतात १५० कोटी नागरिक लोक स्नान करून अब्जावधी लिटर पाणी दूषित करून वाया घालवत आहेत.
पाण्याने स्नान न करताही शरीर शुद्ध राहते आणि दुर्गंधी येत नाही. प्राचीन काळी ऋषी मुनी वायूस्नान करत असत.
ही कला शिकून घेतली तर जलप्रदूषण होणार नाही, पाण्याची नासाडी टळेल.

विषय: 
शब्दखुणा: 

सादर करीत आहोत...

Submitted by अपूर्व जांभेकर on 7 September, 2026 - 03:19

"तुम्ही...आ...आत्ता?"....दुपारी साडेबारा-पाऊण च्या सुमारास, नचिकेतच्या बाबांना दारात अनपेक्षितपणे पाहून नचिकेतची आई चपापलीच. ती नुकतीच न्हाऊन बाथरूम मधून बाहेर आली होती. ओल्या गच्च केसांवर पंचा बांधला होता...सावळा गोलाकार चेहरा....मध्यम बांधा...बुटकीशी आकृती आणि चाळीशी ओलांडून स्थिरावलेलं एकंदरीतच सर्वसाधारण वय व व्यक्तिमत्व. "का? माझ्याच घरी, दुपारी यायला बंदी आहे कि काय मला?" दारात उभे असलेले नचिकेतचे बाबा घराच्या आत निरखून डोकावत खरखरीत सुरात म्हटले .

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

"फासे "

Submitted by @अज्ञात म्हणे on 14 August, 2026 - 06:39

​आयुष्याचे कसे निराळे फासे हे फिरले,
ज्या बघूनी आनंद कळे, तेच हसे विरले!

​होत असतील जखमा मज तुझ्या चाहुलींच्या
दिसू दे ती रोज ईश्वरा, अनेक अपघात कर रे!

​अताशा इच्छा खूप होते मंदिरात जाण्याची,
बघितले बाहेर तुला, अन् अवसानच सरले!

​आयुष्याचा एक एक सर्ग पालटत गेला जसा,
जगुनी न जगल्याचे असे, भास व्हाया लागले!

​अन् एका जन्मी मला जरा तू तुझे डोळे दान कर,
बघू दे की अहंपणाचे किती डोहाळे राहिले!

-दक्ष .

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - कला