१५-२० वर्षांपूर्वी बहुतेक मराठी मंडळात "कार्यक्रमाला जायच्या अगोदर कळवायचं" असलं काही नव्हतं. त्यामुळे जेवणाची व्यवस्था (आणि इतरही व्यवस्था) करणार्या कार्यकर्त्यांची बोंब व्हायची. कारण नक्की किती लोक येणार हे अंदाजपंचे ठरायचं. त्यावर उपाय म्हणून काही मराठी मंडळानी आरएसव्हीपी (R.S.V.P) करण्याची सोय, आणि जे आरएसव्हीपी करतील त्यांनाच जेवण मिळेल असे धोरण अंमलात आणायला सुरुवात केली. पण अचानक जेवणासाठी येऊन टपकायची सवय पिढ्यांनपिढ्या जोपासलेल्या मराठी माणसाला हे थोडं जड गेलं.







