मुलाखत

मुलाखत कशी वाटली.

Submitted by अस्मिता. on 28 June, 2023 - 21:16

हा मुलाखतींसाठी काढलेला स्वतंत्र धागा. वेबसिरिज धाग्यावर हे योग्य वाटत नव्हतं म्हणून काढला. मला मुलाखती बघायला अतिशय आवडतं. त्यातल्या गप्पा क्वचित समृद्ध करणाऱ्या काही नवीन विचार देणाऱ्या असू शकतात. तसंच कधी बढाया, थापाही असू शकतात. पण हे सगळंच मला रंजक वाटतं. इथे तुम्हाला आवडलेल्या-न आवडलेल्या, फिल्मी-नॉन फिल्मी, प्रमोशनसाठी असलेल्या किंवा नुसत्याच, गणित, विज्ञान, खेळ, इतिहास, पुरातत्व संशोधन, Astrophysics किंवा इतर कुठल्याही विषयावर आधारित देशी-विदेशी अशा अनेक मुलाखतींवर चर्चा करता येईल. स्वयंपाक व पाककृती संबंधित किंवा तत्सम मुलाखतीवर चर्चा नकोत.

शब्दखुणा: 

ही ’श्री’ ची इच्छा, पुन्हा ’श्री’ गणेशा

Submitted by मोहना on 19 March, 2021 - 20:41

नुकतीच श्री ठाणेदारांची घेतलेली मुलाखत म्हणजे आनंदाचा ठेवा! कितीतरी गोष्टींना वेळेअभावी फक्त स्पर्श करता आला. २००५ साली ही ’श्री’ ची इच्छा हे पुस्तक हातात पडलं तेव्हा विलक्षण भारावून जायला झालं होतं. त्यांच्यासारखाच आपणही काहीतरी भलाथोरला उद्योगधंदा उभारावा असंही वाटून गेलं होतं. वेळेअभावी तो विचार लवकरच बाजूला पडला Happy पण पुस्तक मात्र कायमचं मनातला एक कोपरा अडवून राहिलं.

अभिवाचन, मुलाखत

Submitted by मोहना on 1 October, 2020 - 06:55

माझी संकोच ही कथा मायबोलीकरांना आवडली होती. तिच कथा रत्नागिरी आर्ट सर्कलच्या कश्ती शेखने वाचक - वसा या कार्यक्रमात वाचली. गोष्टीतल्या नायिकेला साजेशीच कश्ती आहे त्यामुळे कथेचं सादरीकरण भावतं. या कथेच्या अभिवाचनानंतर मायबोलीकर नंदिनीने माझी अर्धा तास - लेखकाचा खास यामध्ये मुलाखत घेतली आहे. ती एक तास झाली आहे Happy तिच्याबरोबर कश्ती आणि दिप्ती कानविंदेही या गप्पांमध्ये होत्या.

मुलाखत : चित्रपटकार आशय जावडेकर

Submitted by स्वाती_आंबोळे on 11 April, 2018 - 09:09

ऑक्टोबर २०१६मध्ये ‘शँक्स’ (Shank's) नावाच्या मराठी चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रकाशित झाला. अवघ्या आठवड्याभराच्या कालावधीत जगभरातून हा ट्रेलर पाहणार्‍यांची संख्या होती चार लाख! "महाराष्ट्रीय शाकाहारी पदार्थ सर्व्ह करणार्‍या अमेरिकेतील एका 'शँक्स' नावाच्या रेस्तराँबद्दलचा माहितीपट" असं या चित्रपटाचं स्वरूप ट्रेलरमधून दिसून येत होतं.

विषय: 

कहाणी मराठी ग्रीटींग्सची

Submitted by अश्विनी कंठी on 24 December, 2017 - 23:58

पुण्यात रहाणाऱ्याला डेक्कन जिमखान्यावरचे ‘ग्रीटवेल’ दुकान माहित असणारच. हे पुण्यातले पहिले वहिले फक्त ग्रीटिंग कार्ड्स आणि गिफ्ट आर्टिकल्स विकणारे दुकान! १९७८ मध्ये श्री. दिलीप जाधव आणि त्यांचे जेष्ठ बंधू श्री. नंदकुमार जाधव यांनी ग्रीटवेल सुरु केले. गेली एकोणचाळीस वर्षे या व्यवसायात असणाऱ्या जाधव सरांनी मराठी ग्रीटींग्स बाजारात रुजवण्याकरता अथक प्रयत्न केले आहेत. या विषयी त्यांच्याशी मारलेल्या गप्पा ......

राजीव साने यांची प्रकट मुलाखत

Submitted by प्रकाश घाटपांडे on 23 May, 2016 - 11:27
तारीख/वेळ: 
4 June, 2016 - 08:00 to 10:30
ठिकाण/पत्ता: 
निवारा सभागृह, नवी पेठ, एसेम जोशी फाउंडेशन समोर पुणे

अनेक इझम कोसळत वा भरकटत असताना नव्याने विचारव्यूह बांधण्याचा ध्यास घेणारे आणि कोणत्याही विषयात खोलवर शिरकाव करणारे राजीव साने एक व्यक्तिमत्व राजीव साने यांच्या गल्लत गफलत गहजब या पुस्तकाला नुकताच महारष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाल त्या निमित्त
अजय ब्रहमनाळकार
प्रा. संतोष शेलार
पत्रकार निरंजन आगाशे
हे राजीव साने यांच्याशी दिलखुलास गप्पा मारणार आहेत. ही एक वैचारिक मेजवानीच आहे असे समजायला हरकत नाही.

माहितीचा स्रोत: 
राजीव साने मित्रमंडळ
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

कवीची मुलाखत

Submitted by pkarandikar50 on 26 February, 2016 - 07:38

कवीची मुलाखत

= काय हो, मिळाले का तुम्हाला हवे ते?
केला का न्याय तुमच्यावर, जीवनाने?

*जीवन म्हणजे काय, हवे ते मिळणे?
तो प्रवास खडतर, ते ठेचकाळणे,
ती शोधाशोध, रोज नवी चाहूल लागणे,
त्या पाठशिवणीतच, उडाले अवघे जगणे.

अपराध कधी, कोणता नव्हताच केला,
झाले आरोप तरी, बचावहि नव्हता केला.
मीच माझ्या मला, खूप सुनावल्या शिक्षा,
जीवनाकडून केंव्हा केली न्यायाची अपेक्षा?

=निदानपक्षी, प्रेम तरी असेल मिळाले?
आनंद,समाधान,थोडेसे वाट्याला आले?

*पाहिलात का कधी कोणी कवि सुखांत?
समाधाने डुंबताना, म्हशीसारखा डबक्यांत?
खातो मी गटांगळ्या खोल अंधार्‍या गर्तेंत,

शब्दखुणा: 

कविची मुलाखत

Submitted by pkarandikar50 on 14 February, 2016 - 22:18

कविची मुलाखत

= काय हो, मिळाले का तुम्हाला हवे ते?
केला का न्याय तुमच्यावर, जीवनाने?

*जीवन म्हणजे काय, हवे ते मिळणे?
तो प्रवास खडतर, ते ठेचकाळणे,
ती शोधाशोध, रोज नवी चाहूल लागणे,
त्या पाठशिवणीतच, उडाले अवघे जगणे.

अपराध कधी, कोणता नव्हताच केला,
झाले आरोप तरी, बचावहि नव्हता केला.
मीच माझ्या मला, खूप सुनावल्या शिक्षा,
जीवनाकडून केंव्हा केली न्यायाची अपेक्षा?

=निदानपक्षी, प्रेम तरी असेल मिळाले?
आनंद,समाधान,थोडेसे वाट्याला आले?

*पाहिलात का कधी कोणी कवि सुखांत?
समाधाने डुम्बताना, म्हशीसारखा डबक्यांत?
खातो मी गटांगळ्या खोल अंधार्‍या गर्तेंत,

शब्दखुणा: 

कविची मुलाखत

Submitted by pkarandikar50 on 14 February, 2016 - 22:18

कविची मुलाखत

= काय हो, मिळाले का तुम्हाला हवे ते?
केला का न्याय तुमच्यावर, जीवनाने?

*जीवन म्हणजे काय, हवे ते मिळणे?
तो प्रवास खडतर, ते ठेचकाळणे,
ती शोधाशोध, रोज नवी चाहूल लागणे,
त्या पाठशिवणीतच, उडाले अवघे जगणे.

अपराध कधी, कोणता नव्हताच केला,
झाले आरोप तरी, बचावहि नव्हता केला.
मीच माझ्या मला, खूप सुनावल्या शिक्षा,
जीवनाकडून केंव्हा केली न्यायाची अपेक्षा?

=निदानपक्षी, प्रेम तरी असेल मिळाले?
आनंद,समाधान,थोडेसे वाट्याला आले?

*पाहिलात का कधी कोणी कवि सुखांत?
समाधाने डुम्बताना, म्हशीसारखा डबक्यांत?
खातो मी गटांगळ्या खोल अंधार्‍या गर्तेंत,

शब्दखुणा: 

मुलाखत: पंडित संदीप अवचट

Submitted by अश्विनी कंठी on 16 April, 2015 - 14:08

आयुष्य सुखकर करण्याकरता ज्योतिषशास्त्राद्वारे मार्गदर्शन करणारे एक अग्रगण्य ज्योतिषी म्हणून पंडित संदीप अवचट आपल्याला सगळ्यांना माहितीचे आहेत. ‘पूर्वापार चालत आलेल्या अंधश्रद्धा आणि थोतांड अश्या प्रकारांना संपूर्णपणे फाटा देऊन नव्या युगात विज्ञानवादी दृष्टीकोनातून ज्योतिषाचे महत्व पटवणारे’ ही त्यांची खरी ओळख म्हणता येईल. काही दिवसापूर्वी सानफ्रान्सिस्को बे एरियामध्ये त्यांच्या ‘दिलखुलास राशी’ या कार्यक्रमामुळे त्यांची भेट झाली. या भेटीदरम्यान त्यांच्याशी झालेल्या संवादाची ही एक झलक:

Sandip Awachat.jpg

विषय: 

Pages

Subscribe to RSS - मुलाखत