एक दिड मुठ सोलाणे, १ मोठा कांदा, ७-८ लसणाच्या (मध्यम आकाराच्या) पाकळ्या, इंचभर आल्याचा तुकडा, २ चमचे धण्याची पुड, २-३ चमचे काळा मसाला, २ चमचे तिखट, २ मोठे चमचे खोबर्याचा कीस, हळद, मीठ, हिंग, पाव वाटी कोथिंबीर, तेल.
वाटण : कांदा उभा चिरुन थेंबभर तेलावर काळा होईपर्यंत तव्यावर /फ्रायपॅनमध्ये भाजून घ्यावा. कांदा चांगला भाजला की त्याच तव्यावर खोबर्याचा कीस भाजून घ्यावा. भाजलेला कांदा, खोबरं, आलं-लसूण, कोथिंबीर मिक्सरमधून वाटून घावे.
सोलाणे पण त्याच तव्यावर किंचीतश्या तेलात छान भाजून घ्यावेत. भाजलेले सोलाणे खलबत्त्यात ओबडधोबड वाटून घ्यावे.
कढईमध्ये तेल गरम करून त्यात वाटण तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे. नंतर त्यात हिंग, हळद आणि इतर मसाल्याचे जिन्नस घालावेत. हा मसाला छान परतला गेला की त्यात ओबडधोबड वाटलेले सोलाणे घालून परतावे. गरजेप्रमाणे पाणी घालून पातळ करावे. चवीप्रमाणे मीठ घालून एक उकळी आणावी.
ही आमटी बाजरीच्या भाकरींबरोबर खायला छान लागते.
अशीच ओल्या वाटाण्यांची, तुरीच्या दाण्यांची पण आमटी करतात.



) तर ह्या कृतीसाठी लागणारे घटक पदार्थ :
पण त्याची चव घेतल्यावर ती कढीच आहे ही खात्री पटली!
जर तुम्हाला कढी इतकी दाट नको असेल तर पाण्याचे प्रमाण वाढवा किंवा बेसनाचे प्रमाण कमी करा. पण मूळ कृतीतील कढी घट्टसरच आहे.
