मालवणी

सुकी मच्छी पाककृती- सुकट तिकले - १ (फोटोसहीत)

लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पाव किलो सुकट स्वच्छ करुन भिजवलेली(५ मिनिटे)
(चिकनचे)वाटण- १ १/२ मोठा डाव
आलंलसुण पेस्ट - १/२ मोठा डाव
१ डाव तेल
१ कांदा बारिक चिरलेला
१ चमचा गरम मसाला
१ चमचा तिखट मसाला
१-२ चमचा मालवणि मसाला(तिखट हवे असेल तर)
१ चमचा हळद
मीठ चवी नुसार
कोथिंबीर बारिक चिरलेली (गार्निशसाठी)

क्रमवार पाककृती: 

सुक्या मच्छीच्या वासामुळे खुपशे लोक मांसाहारी असुन देखील सुक्या मच्छीपासुन लांब रहतात. फक्त जरा वास सहन केला तर खरच खुप चवीचे आणि झटपट मांसाहारी जेवण बनु शकते. यासाठी हा सगळा खटाटोप..

आवडला तर जरुर कळवा.. स्मित
-------------------------------------------------------------------------

कढईत तेल तापवुन त्यात प्रथम कांदा खमंग भाजावा. त्यात आलंलसुण पेस्ट, वाटण, मसाले, हळद सगळे चांगले तेल सुटेपर्यंत भाजुन घ्यावे. त्यात भिजवलेली सुकट, मीठ, पाणि टाकुन मंद आचेवर एक वाफ काढावी(रस्साच पण थोडं घट्ट ठेवा). गॅसवरुन खाली उतरले की त्यावर कोथिंबिर पेरावी.

गरमागरमच भाकरी किंवा भातावर वाढावे.

झटपट एकदम चवीचे सुकट तिकले तयार.. स्मित

वाढणी/प्रमाण: 
२ माणसे
अधिक टिपा: 

१) ह्यात कोकम(१-२) पण टाकतात पण आंबटपणामुळे तिखट कमी होते.

कोलंबीच सार

लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ कप साफ केलेली कोलंबी
वाटण्याकरता:
१ १/२ कप टॉमेटोचे तुकडे
१/२ कप नारळ
२ लसणाच्या पाकळ्या (अमेरिकन साईझचा लसूण)
१/३ कप कापलेला कांदा
१ टेबस्पू धणे
४ लाल मिरच्या
१ टिस्पून काश्मिरी मिरची पावडर (रंगा करता)
फोडणीकरता:
१ १/२ टेबल्स्पून तेल, मोहरी, मेथी, हळद, हिंग, ४-५ कढिपत्त्याची पान
चविपुरत मीठ
२ कोकमं

क्रमवार पाककृती: 

वाटण्याकरता दिलेले सर्व जिन्नस थोडस पाणी घालून मिक्सरमधे गंध वाटून घ्या. तेल तापवून अनुक्रमे मेथी, मोहरी, हळद, हिंग फोडणीत घाला. वाटलेला मसाला फोडणीत टाकून १ मिनीट परतून घ्या. १ कप पाणी, चवीपुरत मीठ, कोकम, आणि कढीपत्ता टाकून साराला उकळी येउ द्यात. उकळत्या सारात कोलंबी सोडा. १० मिनिटानी गॅस बंद करा-सार तयार!

वाढणी/प्रमाण: 
४ माणसांना पुरत
अधिक टिपा: 

हे सार खूप पातळ नसत. तेव्हा पाणी बेतान घाला. मस्त लाल रंगाच सार गरम गरम भाताबरोबर छान लागत.

माहितीचा स्रोत: 
मैत्रिण

वांग्याची भजी

लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

भरताच काळ वांग, तिखट मसाला, हळद , मीठ, तांदुळाच पिठ, रवा, तेल

क्रमवार पाककृती: 

भरताच काळ वांग घेवुन त्याच्या गोल चक्त्या पाडायच्या ... जास्त जाड पण नाही पातळ पण नाही ... ते धुवुन ... त्याला तिखट मसाला, हळद , मीठ लावुन थोड्यावेळ ५ -६ मिंनिट ठेवा

नंतर तांदुळाच पिठ, रवा मिक्स करुन थोड तिखट मसाला मिक्स करुन ते त्या चकत्यां ना लावावे..

नंतर ते चकत्या तव्यावर थोड थोड तेल टाकुन .. मंद अग्निवर झाकण थेवुन फ्राय करावी ...एक दोन वेळा अधुन मधुन हळुवार परतावी.. (जसे मासे तळतो तसे)

आणी गरम गरम खावी

अधिक टिपा: 

ही भजी बर्रोबर असताना भाजी ची गरज नाही....

माहितीचा स्रोत: 
आई

कैरी चे सार

लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक मध्यम आकारची कैरी
एक वाटी किसलेले खोबरे
चार मिरच्या, थोडस आल, लसुन
जिरे हिंग कडीपतत्ता

क्रमवार पाककृती: 

एक मध्यम आकारची कैरी एक वाटी किसलेले खोबरे चार मिरच्या, थोडस आल, मिस्कर मध्ये एकत्र वाटाव
हे वाटण थोडे पातळ करावे जितके पातळ हवे तेवढे पणी टाकावे

नंतर फोडनी साठी एका पातेल्यात तेल घेवुन जिरे हिंग कडीपत्याची फोडनि द्यावी. नंतर वरील वाटण गस मंद करुन त्यात टाकावे. व मीठ चवी नुसार टाकावे आनि हळु हळु हलवावे. ते फुटु देत कामा नये किंवा उकळि येता कामा नये

नंतर वरती कोथीबिर टाकुन गरम गरम वाढावी. ह्या बरोबर एकाधी तिखट भाजी असेल तर ते तुम्हाला नक्कीच आवडेल

वाढणी/प्रमाण: 
२ जण

झटपट मटण

लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

पाऊण किलो मटण, मीठ चवीपुरते, व्हिनेगर, मालवणी मसाला (मी मालवणी आहे हा मसाला घरीच बनवला आहे ), आल लसून पेस्ट, कांदा, कढीपत्ता, सुख खोबर.

क्रमवार पाककृती: 

१) मटण साफ करून धुवून घ्यायचं नंतर त्याला दही, आल लसून पेस्ट, मालवणी मसाला (नसेल तर तुमच्याकडे असेल तो वापरावा ), व्हिनेगर, मीठ लाऊन अर्धा तास ठेऊन द्यायचं. नंतर कांदा, सुख खोबर भाजून वाटण कराव.

२) पातेल्यात किवा कुकर मटण शिजवण्यासाठी उपयोग करावा. प्रथम कांदा आणि कडीपत्ता याची फोडणी करावी मग ते मटण फोडणीत घालून ते परतावे नंतर त्याला झाकण ठेवून एक वाफ काढावी. वाफ आल्यानंतर त्यात आपण तयार केलेलं कांद्या खोबऱ्याच वाटण घालाव. त्यानंतर आपल्याला जाड किवा पातळ हव तेवढ पाणी ओताव.

३) वरील कृती झाल्यावर त्यात पुन्हा मीठ टाकावे. कुकरला झाकण लावून तीन ते चार शिट्या कराव्यात. अशा तर्हेने झाल झटापट मटण तयार.

वाढणी/प्रमाण: 
मटण सध्या महाग झाल असल्यामुळे सगळी मासाहारी मंडळी आता कोबडी कडे वळली आहेत. त्यामुळे आता जाड सर बनवून खात नाहीत. वरती सांगितल्या प्रमाणे वाटप टाकत असतानाच किती माणस आहेत त्यावरून पाणी टाकाव.
अधिक टिपा: 

माझा हा पहिलाच प्रयत्न आहे इथे पाककृती टाकण्याचा तरी यात कोणालाही अधिक माहित हवी असल्यास नक्की विचार मी नक्की तुमची मदत करीन. या पाककृती मध्ये तुम्हाला काही आजून टाकाव वाटत असेल तर नक्की सांगा.

माहितीचा स्रोत: 
रविवारी उशिरा उठल्यामुळे आई झटपट अशा प्रकारचे मटण बनवते. काही प्रती मी खाली टाकत आहे

ओल्या काजूंची उसळ

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पाव किलो ओले काजू, २ हिरव्या मिरच्या, १० -१५ काळी मिरी, २ टेस्पू ओलं खोबरं
फोडणी साठी - हिंग, हळद आणि मोहरी
चवीसाठी मीठ आणि साखर
वरुन घालण्यासाठी बारीक चिरुन कोथिंबिर

क्रमवार पाककृती: 

काजू सोलून घ्यावेत.

कढईत तेल तापवून, त्यात हिंग, हळद आणि मोहरी यांची फोडणी करुन, वर काजू घालावेत. अर्धा वाटी पाणी घालून मंद गॅसवर मऊसर शिजू द्यावेत. काजू शिजत असताना, मिरी, हिरव्या मिरच्या व खोबरे एकत्र जाडसर वाटून घ्यावे.

काजू शिजल्यावर त्यात हे वाटण घालून,चवीपुरते मीठ व साखर घालून एकत्र करावे व ५ -१० मिनिटांनी गॅस बंद करावा. उसळ जरा ओलसरच ठेवावी.

सर्वात शेवटी वरुन चिरलेली कोथिंबिर घालावी.

वाढणी/प्रमाण: 
२-३ जण
अधिक टिपा: 

ओले काजू साधारण फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान मिळतात. सुकवलेले ओले काजूही मिळतात, ते वापरायचे असतील तर आदल्या रात्री पाण्यात भिजत घालून, दुसर्‍या दिवशी सोलावेत.

हीच उसळ, हिरव्या मिरची ऐवजी अर्धा चमचा तिखट व गरम मसाला प्रत्येकी, वापरुनही करता येते. बाकी कृती वर दिल्याप्रमाणेच.

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक

तिसर्‍यांचे वडे ( डांगर)

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दीड वाटी सुट्या तिसर्‍या, एक टीस्पून हळद ,मीठ
४-५ लसूण पाकळ्या, अर्धा इंच आले
२ हिरव्या मिरच्या
अर्धा टी स्पून मालवणी गरम मसाला ( नसल्यास गरम मसाला, धणे जिरंपूड अन लालतिखट मिळून अर्धा चमचा )
अर्धा टी स्पून लाल तिखट
पाव वाटी कोथिंबीर बारीक चिरून
पाव वाटी ओले खोबरे
पाव वाटी कांदा बारीक चिरून
तांदळाचे पीठ ,तेल

क्रमवार पाककृती: 

आले लसणाची गोळी वाटून घ्यावी. त्यात हळद, तिखट, मीठ घालून मग सुट्या शिंपल्या त्यात कालवाव्या. कांदा, कोथिंबीर व खोबरे घालून जरा चुरावे. त्यात मावेल एवढे बेसन घालून छोटे, चपटे गोल करून तांदळाच्या पीठात घोळून खोलगट तव्यावर तळावेत.

वाढणी/प्रमाण: 
३-४ जणांसाठी
अधिक टिपा: 

बीअर अथवा सोलकढी बरोबर मस्त लागतात.

तिसर्‍याची एकशिपी

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अंदाजे ५०-६० तिसर्‍या
अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा
दीड वाटी ओले खोबरे
१ टी स्पून धणे
६-७ सुक्या मिरच्या
हळकुंडाचा छोटासा तुकडा ( नसल्यास चमचाभर हळद )
अर्धा टी स्पून काळी मिरी
अर्धी वाटी ओल्या नारळ्याच्या कातळ्या ( पातळ काप, सुक्या खोबर्‍याचे चिवड्यात घालतात तसे )
चिंचेचा घट्ट कोळ पाव वाटी
खोबरेल तेल किंवा गोडे तेल.

क्रमवार पाककृती: 

सगळ्या तिसर्‍या एक शिंपलीच्या करुन घ्याव्या.
थोड्या तेलावर पाव वाटी कांदा परतून घ्यावा. थोडी हळद पूड घालून त्यावर तिसर्‍या, कातळ्या, व थोडे पाणी घालून शिजत ठेवावे.
हळकुंड, मिरी, धणे , मिरच्या थोड्या तेलावर परतून खोबरं व उरलेल्या कांद्याबरोबर वाटून घ्यावे. त्यात चिंचेचा कोळ घालावा.
तिसर्‍या शिजत आल्या की त्यावर मसाला घालावा व थोडे गरम पाणी घालावे. दोन उकळ्या आल्या की एकशिपी तयार.

आवडत असल्यास १ बटाट्याच्या सालासकट चकत्या फोडणीत घालत येतील.

वाढणी/प्रमाण: 
२ जण
अधिक टिपा: 

एकशिपी म्हणजे शिंपल्या कापून एक शिंपली टाकून द्यायची व एकच ठेवायची. ( क्लॅम्स ऑन द हाफ शेल शोधलं तर चित्रं सापडतील)

माहितीचा स्रोत: 
मस्त मालवणी - संगीता मराठे.

मालवणी मसाला

लागणारा वेळ: 
३ दिवस
लागणारे जिन्नस: 

बेडगी मिरची १ किलो
जाडी मिरची १/२ किलो (तिखटपणासाठी)
काश्मिरी मिरची १/४ किलो (लालभडक रंगासाठी)
धणे १/४ किलो
खसखस १/४ किलो
दालचिनी २० ग्रॅम
लवंग २० ग्रॅम
मिरी २० ग्रॅम
सफेद जायपत्री १० ग्रॅम
जायफळ २ नग
हळकुंडे १०० ग्रॅम
जिरे ५० ग्रॅम
शाहजिरे १० ग्रॅम
चक्रफुल १० ग्रॅम
दगडफुल १० ग्रॅम
मसाला वेलची १० ग्रॅम
तमालपत्र १० ग्रॅम
बडिशेप १०० ग्रॅम
खड्याचा हिंग १०० ग्रॅम

क्रमवार पाककृती: 

१. मिरच्यांना दोन-तीन तास उन दाखवावे. मग हाताने देठ तोडुन, साफ करुन अजुन दोन दिवस उन्हात वाळवाव्या. चांगल्या कडक व्हायला पाहिजेत. मिरची हाताने तोडल्यास कटकन तुटली पाहिजे.

२. मिरच्या आणि इतर सर्व साहित्य वेगवेगळे भाजुन घ्यावे. भाजताना आवश्यक तेवढे तेल वापरावे. (१ किंवा १-१/५ चमचा). मिरच्यांना परत एकदा उन दाखवावे. मिरच्या कडकडीत असल्या की मसाला चांगला बारीक कुटला जातो आणि चाळल्यानंतर मागे उरणारा भुस्साही खुपच कमी निघतो.

३. मिरच्या आणि इतर सर्व साहित्य एकत्र मिसळुन थंड झाल्यावर डंकन मध्ये कुटुन आणावे.

४. कोरड्या काचेच्या बरणीत मसाला भरावा. भरताना मध्ये मध्ये हिंगाचे खडे ठेवावेत म्हणजे मसाला खराब होत नाही.

वाढणी/प्रमाण: 
-
अधिक टिपा: 

जानेवारीत नव्या मिरच्या येतात. तेव्हा मसाला करायला घ्यावा. साधारण दोन-तीन दिवस जातात ह्या कामात.

माहितीचा स्रोत: 
आई.