खानदेशी

भरली ढेमसे - भरवा टिंडे (फोटोसह)

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

ढेमसे अर्धा किलो
दोन मध्यम आकाराचे कांदे सोलून पातळ उभे चिरून
सुकं खोबरं अर्धी वाटी
लसूण पाकळ्या आठ दहा
तिळ पाव वाटी
खसखस एक चमचा
बडीशेप एक चमचा
आमचूर पावडर एक चमचा
लाल तिखट, हळद, गरम मसाला, मिठ अंदाजाने स्वादानुसार आवडीप्रमाणे.
फोडणीसाठी तेल, हिंग, जिरे, मोहरी

क्रमवार पाककृती: 

ढेमसे स्वच्छ धुऊन पुसुन घ्यावीत.
मग देठाजवळ गोलाकार कापून देठ काढुन टाकावा व आतिल बिया व गर पोखरुन बाहेर काढुन टाकावा.

कढईत एक चमचा तेल टाकून त्यावर पातळ उभा चिरलेला कांदा खमंग परतून घ्यावा. मग लसूण, सुके किसलेले खोबरे, तिळ, खसखस, बडीशेप हे सगळे एक एक करून खमंग भाजून घ्यावेत.
मग हे कांदा खोबरे व इतर भाजलेल्या वस्तूंचं मिश्रण थोडं गार करून घ्यावं. मिश्रण थंड झाल्यावर त्यात लाल तिखट, हळद, गरम मसाला, मिठ, आमचूर पावडर घालून मिक्सर वर बारिक वाटून घ्यावं.

तयार वाटप पोखरलेल्या ढेमश्यांमध्ये दाबून गच्च भरुन घ्यावं.
कढईत तेल तापउन जिरे, मोहरी, हिंगाची फोडणी करून हि भरलेली ढेमसे त्यात टाकावीत. कढीवर झाकण ठेउन मंद आचेवर शिजु द्यावीत. सारण भरून जर थोडे शिल्लक असेल तर तेही वरुन टाकले तरी चालते. पण भाजी शिजताना त्यात पाणी घालू नये. मधे मधे हलक्या हाताने हलवावी म्हणजे ढेमसे जळणार नाहीत. भाजी शिजल्यावर वरून कोथींबीर घालून खायला तयार. फुलके, तांदळाच्या भाकरी किंवा नुसतीही खायला भन्नाट लागतात.

वाढणी/प्रमाण: 
२-३ जणांसाठी
अधिक टिपा: 

आपल्या ह्या पारंपारीक पद्धतीत बडिशेप आणि आमचूर पावडर घातल्याने मस्त स्वाद येतो. स्मित
नॉर्थ कडे ह्यात बारीक चिरलेला कांदा + पनिर किंवा खवा कुसकरुन + मसाले असे स्ट्फिंग करतात.

माहितीचा स्रोत: 
खानदेशी भाज्या

.

लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

.

क्रमवार पाककृती: 

.

वाढणी/प्रमाण: 
खाणार्‍यावर आवलंबून
माहितीचा स्रोत: 
.

.

लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

.

क्रमवार पाककृती: 

.

.

लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

.

क्रमवार पाककृती: 

.

.

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

.

क्रमवार पाककृती: 

.

.

लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

.

क्रमवार पाककृती: 

.

कोरडी मूगाची डाळ

लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी मूग डाळ (पिवळी)
१ मध्यम कांदा
३-४ लसुण पाकळ्या
२-३ हिरवी मिरच्या
१ च.च. काळा मसाला
१-१.५ वाटी आधणाचे पाणी
चवीपुरते मीठ
फोडणी करता तेल, मोहरी, जीरे, हळद
वरुन घालण्यासाठी कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

मूग डाळ धुऊन १५-२० मिनीट भिजत ठेवावी. कांदा नेहमीप्रमाणे चौकोनी चिरून घ्यावा. लसुण आणि हिरवी चिरुन घ्यावी. कढइत नेहमी पेक्शा थोडे जास्त तेलात जीरे, मोहरीचे फोडणी करावी. त्यात लसुण, हिरवी मिरची घालुन परतावे. लसुण सोनेरि रंगावर आला की त्यात चिरलेला कांदा घालुन परतावे. कांदा मऊ झाला कि हळद घालुन त्यावर भिजवलेली मुग डाळ घालून २ मिन परतावे.
कढइत आधणाचे पाणी आणि चवीपुरते मीठ घालून वरुन झाकण ठेवावे. डाळ मध्यम आचेवर पाणी पुर्णपणे आटे तोवर शिजवावी. डाळ शिजल्यावर वरुन काळा मसाला आणि भरपूर कोथिंबीर घालून वाढावे.

वाढणी/प्रमाण: 
२-३ जण
अधिक टिपा: 

१. ही डाळ करताना पाण्याचे योग्य प्रमाण जमणे फार मह्त्वाचे आहे, नाहितर पार गचका होतो डाळीचा.
मी करताना आधि अर्धेच पाणि घालते आणि नंतर लागेल तसे पाणि टाकत जाते. डाळ चांगली शिजलेली तर हवी पण गचका नको व्हायला.
२. ही डाळ वरून कच्चे तेल, बरोबर ज्वारिची भाकरी/फुलके, ताकाची कढी, आंब्याचे लोणचे आणि कोबिची पचडी म्हणजे अगदी.... आहाहा.......

माहितीचा स्रोत: 
आई, पारंपरिक खांदेशी प्रकार.

चिकन करी

लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चिकन - पाव किलो, बोन्ससकट आणि हलाल मिट असेल तर उत्तम.
कांदा - ३ मध्यम आकाराचे, बारीक चिरुन.
लसणाच्या पाकळ्या - ८-१०.
आलं - १/२ इंच.
सुकं खोबरं - ३ मोठे चमचे.
प्रत्येकी २/३ लवंगा, काळी मिरी
१/२ इंच दालचिनीचा तुकडा.
गरम मसाला - २ चमचे.
लाल तिखट - २ चमचे.
काजुची पेस्ट - २ चमचे.
जीरे, तेल, हळद, मीठ - अंदाजाने लागेल तसं.
कोथिंबीर - आवडीनुसार.

ऐच्छिक जिन्नस:
टोमॅटो - १ लहान, अगदी बारीक चिरुन.

क्रमवार पाककृती: 

वाटण :-
१. पॅनमध्ये अगदी थोडं तेल घालुन लवंगा, काळी मिरी, दालचिनीचा तुकडा टाकुन परतुन घ्या.
२. त्याच पॅनमध्ये आधीचा खडा मसाला न काढता कापलेल्या कांदयाच्या २/३ कांदा परतुन घ्यावा.
३. कांदा ब्राऊन कलरचा झाला की त्यात सुकं खोबरं, ४-५ लसणीच्या पाकळ्या, आलं बारीक तुकडे करुन सगळं ब्राऊन कलरचं होई पर्यंत परतुन घ्या.
४. हे सगळ गार झालं की लागेल तसं पाणी टाकुन मिक्सरमधुन खुप बारीक वाटण करुन घ्या.

मुख्य कृती :-
१. चिकन स्वच्छ धुवुन घ्यावं.
२. कुकरमध्ये २ चमचे तेल टाकुन ते गरम झाल्यावर जीरं टाकावं. त्यात ४-५ लसणीच्या पाकळ्या खुप बारीक चिरुन घालाव्यात.
३. लसुण थोडा परतला की कापलेल्या कांद्याच्या अर्धा कांदा टाकुन परतावं.
४. टोमॅटो हवा असेल तर कांदा परतला गेला की त्यात घालुन परतावं.
५. थोडी हळद, १/२ चमचा लाल तिखट घालुन मिनिट्भर परतावं.
६. मग त्यात धुतलेलं चिकन घालुन ते मिनिट्भर परतावं. त्यात अगदी थोडं मीठ घाला.
७. कुकरचं झाकण लावुन ३ शिट्ट्या होवु द्याव्या. कुकर गार झाल्यावर चिकन शिजलेलं असेल आणि त्यात सुप पण तयार झालं असेल.
८. आता कढईमध्ये २-३ मोठे डाव तेल घालुन गरम झाल्यावर जीरे घाला.
९. नंतर वाटण घाला. हे वाटण तेलात खुप चांगलं परतुन घ्या. साधारण १२-१५ मिनिटं तरी परता. मग त्यात काजुची पेस्ट, लाल तिखट, गरम मसाला, हळद घालुन अजुन १-२ मिनिटं परतुन घ्या.
१०. ह्यात कुकर मधलं चिकन आणि सुप घाला. करी किती घट्ट किंवा पातळ हवी त्याप्रमाणात पाणी घाला.
११. चवी प्रमाणे मीठ घाला, एक उकळी आली की चवीप्रमाणे कोथिंबीर घाला.
१२. उकळी आल्यावर अजुन १०-१२ मिनिटं मंद आचेवर उकळु घ्या.

मी केलेल्या करीचा फोटो.
Chicken.JPG

वाढणी/प्रमाण: 
अंदाजे २-३ लोकांसाठी होईल.
अधिक टिपा: 

१. माझ्या कुकरमध्ये जनरली ३ शिट्ट्यांमध्ये चिकन शिजतं.
२. चिकनचं सुप खुप टेस्टी होतं, लहान मुलांना द्यायला खुप चांगलं.
३. तिखट आणि गरम मसाल्याचं प्रमाण आवडीप्रमाणे बदलु शकता. मी शक्यतो कमी तिखट आणि कमी मसालेदार करते.

माहितीचा स्रोत: 
आई

.

लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

.

क्रमवार पाककृती: 

.

खानदेशी खिचडी

लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

खिचडीसाठी:
३वाट्या तांदुळ - हा जाडच असावा. एकवेळ कोलम चालतो...पण बासमती...अजिबात नाही.
१वाटी दाळ- तुरीचीच असावी.
फोडणीला:
कांदा २ मध्यम आकाराचे बारीक चिरुन,
लसुण (जरा वेगळी हवी असल्यास फक्त लसुण ठेचुन घ्यावा),
बाकी हिंग, हळद, वगैरे सर्व, लाल तिखट, मसाल्याची हवी असल्यास काळा मसाला पावडर- १ छोटा चमचा
आणि हो....खिचडी कुकरला लावण्यापेक्षा पातेल्यात करावी (स्टीलचे नाही),छान मोकळी होते.

क्रमवार पाककृती: 

फोडणी देण्याआधी तुरीची दाळ बोटचेपी शिजवुन घ्यावी, त्यात पाणीही थोडे राहु द्यावे तेच पूर्ण खिचडी शिजायला कामात येते. (कूकरमधे होत नाही)
तेलात जिरेमोहरीची फोडणी देउन कांदे, लसुण, शेंगदाणे, हळद, हिंग, मीठ, लाल तिखट टाकावे. कांदा छान नरम झाला की आधी तांदुळ धुउन फोडणीत टाकावे..छान परतुन घ्यावे ..इतके की पातेल्याला चिकटतात. मग वरुन तुरीची दाळ +तीचेच पाणी वरुन ओतावे. सर्व एकत्र निट कालवुन मिश्रणाच्या एक बोटभर पाणी वर राहील इतके पाणी हवे. आता गॅस जोरात करुन झाकण न ठेवता पाणी थोडे आटु द्यावे (आम्ही ही अर्धवट कच्ची पक्की खिचडी +तिचे पाणी असेही ताटलीत घेउन खायचो). खिचडी थोडी आसट असतांना चिरलेली कोथिंबिर त्यात व्यवस्थित कालवुन वरुन घट्ट झाकण लावावे. पाच मिनिटात खिचडी शिजते...(या खिचडीच्या खरड साठी आमच्याकडे भांडणे होतात). आता गॅसवरच खाली तवा ठेउन पातेले त्यावर ठेवावे.गॅस मंद असावा म्हणजे खालची खरडही नंतर व्यवस्थित निघते.

वाढणी/प्रमाण: 
४-५ लोकांना पुरायला हरकत नसावी :)
माहितीचा स्रोत: 
स्वतः