लोकसहभागातून विविध नव्या कल्पना लढवून निधी संकलन हे ‘मैत्री’ चे वैशिष्ट्य आहे. "रद्दीतून सद्दी" म्हणजे रद्दी जमा करून ती विकून त्यातून मेळघाटसाठी निधी जमवणे. गेल्या बारा वर्षांमध्ये ‘मैत्री’ ने २० लाखाहून अधिक पैसे यातून उभे केले आहेत.
माझी एक ओळखीतली फॅमिली इथे भारतात परतत आहे, त्यातील स्त्रीला बरच सामान कमीच करायचे आहे.
तर त्यात आधी खालील वस्तु आहेत,
खरे तर तिला कोणा अतिशय गरजूला गेले तर बरे असे वाटतय , त्यातही भारतीय गरजूला ... कारण वस्तु त्यांनाच बहुधा उप्योगी पडतील..
ज्या गोष्टी भारतीय प्रकाराच्या नाहियेत, त्या ती अमेरीकेतच सालवेशनला देइल.
तसेही भारतात येवून तिला , मिनिमलिस्ट जगायचे आहे.
आपल्या सामाजिक उपक्रमाचे हे ८वे वर्ष. या उपक्रमांतर्गत चांगले काम करणाऱ्या; गरजू व नोंदणीकृत सेवाभावी संस्थांची नावे, त्यांबद्दलची माहिती आणि त्या संस्थेची सध्या काय गरज आहे याची एक यादी करुन, त्या माहितीची शहानिशा करून यादीतील संस्थांना मदत करण्यासाठी आपण मायबोली.कॉम, मिसळपाव.कॉम तसेच फ़ेसबुकच्या माध्यमातून एक जाहीर आवाहन केले.
एका धावकाचे ‘मैत्री’ खातीर आवाहन
मी बराच काळ कामाच्या निमित्ताने एका गावी फार स्थिर असा राहू शकलो नव्हतो. त्यामुळे मला माझे छंद जोपासायला नीट सलग असा कालावधी मिळालाच नाही. त्याकारणाने माझे छंद एक ना धड भाराभर चिंध्या अशा प्रकारचे आहेत / होते. पण गेले काही वर्षे पुण्यात रहायला आल्यापासून जीवनाला जरा स्थिरता आली आणि मग साधारण एकाच सुमारास चालू झाले, मैत्री (नावाची एक संस्था जी मेळघाटात काम करते तिच्या) करता स्वयंसेवक म्हणून काम करणे आणि माझे धावणे.
सामाजिक उपक्रमाचे हे आपले आठवे वर्ष. हा उपक्रम तसा मायबोलीकरांना नवा नाही. मायबोलीकरांच्या साथीने गेली ७ वर्षे स्वयंसेवक हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडत आले आहेत. समाजासाठी कार्य करणार्या संस्थांना सामाजिक उपक्रमाद्वारे मदत मिळवून देण्यास आपण प्राधान्य देतो.
या उपक्रमात दरवर्षी ज्यांना सरकारकडून फारशी मदत मिळत नाही (वा मिळतच नाही) किंवा संस्था मुख्यत्वे फक्त देणगीदारांवर चालते अशा गरजू संस्थांना प्रामुख्याने वस्तुरुपात मदत करण्यावर आपला भर असतो. यावर्षी निवडलेल्या संस्थांना गरज असलेल्या गोष्टींची यादी मागवण्यात आली आहे.
मुम्बई मधे अपंग व्यक्तीसाठी काम करणारी संस्तानची नावे संपर्क क्रमांक अणि त्यांचे कार्य या बद्दल माला माहिती हावी आहे. तर जर कोणाकडे माहिती असेल तर कृपया करून माला दयावी.
तुम्हाला अभिमान वाटेल, भारतातली पहिली आजीबाईंची शाळा भरतेय महाराष्ट्रातल्या एका खेड्यात...
या शाळेत नाव दाखल करायचं असेल तर तुमचं वय किमान ६० वर्षं असायला हवं बरं का... ही भारतातली पहिलीच आजीबाईंसाठीची शाळा आहे. ही शाळा पुण्यासारख्या मोठ्या शहरात नाही, तर आहे एका लहानशा खेडेगावात. या नावाचं गावही तुम्ही कधी ऐकलं नसेल. हे आहे आपल्या ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यातलं फांगणे नावाचं गाव. गेल्या वर्षी ८ मार्च २०१६ ला म्हणजेच जागतिक महिला दिनी या शाळेचं उद्घाटन झालंय आणि महिन्याभरात या शाळेला एक वर्ष पूर्णही होईल.
काही दिवसांपूर्वी लोकलट्रेनने प्रवास करीत असताना एका स्टेशनवर ५-६ अंधव्यक्ती, गाडी सुटता सुटता माझ्या डब्यात चढले. मी त्यांच्या शेजारीच ऊभा असल्याने मला त्यांचे आपापसातील बोलणे ऐकू येत होते. आपण सर्वसामान्य जेव्हा एकत्र प्रवास करतो, तेव्हा आपल्या बोलण्यात आपल्या पोराबाळांचे, ऑफिसचे, राजकारणाचे वगैरे विषय येत असतात. तर त्या अंधव्यक्तींच्या बोलण्यात कोणते विषय होते? तर कोणता डबा कुठे येतो. डब्यात चढताना पकडायचा मोठा दांडा कुठल्या डब्याचा कुठे असतो. कुठल्या स्टेशनचा प्लॅटफॉर्म फार वर आहे. कुठला फार खाली आहे. कोणता डबा पुलाच्या अगदी जवळ येतो.