सेवाभावी संस्था

आजीबाईंची शाळा

Submitted by सेन्साय on 15 February, 2017 - 22:09

तुम्हाला अभिमान वाटेल, भारतातली पहिली आजीबाईंची शाळा भरतेय महाराष्ट्रातल्या एका खेड्यात...
या शाळेत नाव दाखल करायचं असेल तर तुमचं वय किमान ६० वर्षं असायला हवं बरं का... ही भारतातली पहिलीच आजीबाईंसाठीची शाळा आहे. ही शाळा पुण्यासारख्या मोठ्या शहरात नाही, तर आहे एका लहानशा खेडेगावात. या नावाचं गावही तुम्ही कधी ऐकलं नसेल. हे आहे आपल्या ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यातलं फांगणे नावाचं गाव. गेल्या वर्षी ८ मार्च २०१६ ला म्हणजेच जागतिक महिला दिनी या शाळेचं उद्घाटन झालंय आणि महिन्याभरात या शाळेला एक वर्ष पूर्णही होईल.

सामाजिक उपक्रम २०१७ - स्वयंसेवक हवेत

Submitted by गायत्री१३ on 20 January, 2017 - 08:59

चला डोकावूया - भाग १. 'अंध व्यक्तींच्या जीवनात!'

Submitted by सचिन काळे on 17 January, 2017 - 21:59

काही दिवसांपूर्वी लोकलट्रेनने प्रवास करीत असताना एका स्टेशनवर ५-६ अंधव्यक्ती, गाडी सुटता सुटता माझ्या डब्यात चढले. मी त्यांच्या शेजारीच ऊभा असल्याने मला त्यांचे आपापसातील बोलणे ऐकू येत होते. आपण सर्वसामान्य जेव्हा एकत्र प्रवास करतो, तेव्हा आपल्या बोलण्यात आपल्या पोराबाळांचे, ऑफिसचे, राजकारणाचे वगैरे विषय येत असतात. तर त्या अंधव्यक्तींच्या बोलण्यात कोणते विषय होते? तर कोणता डबा कुठे येतो. डब्यात चढताना पकडायचा मोठा दांडा कुठल्या डब्याचा कुठे असतो. कुठल्या स्टेशनचा प्लॅटफॉर्म फार वर आहे. कुठला फार खाली आहे. कोणता डबा पुलाच्या अगदी जवळ येतो.

शब्दखुणा: 

मेळघाट मैत्री - आनंद मेळावा २०१६

Submitted by हर्पेन on 17 December, 2016 - 05:59

मेळघाट मैत्री - आनंदमेळावा २०१६

मला गेले तीन वर्षे मेळघाटात जायला जमवता आले नव्हते. त्यामुळे मी यावर्षी अगदी ठरवलेच होते की आपण जाउन यायचे आणि अखेर तसे जमवलेच. Happy मेळघाटातल्या ज्या शाळांमध्ये आपले काम चालते त्या सर्व मुलांकरता गेली ३-४ वर्षे दिवाळीनंतर एक आनंद मेळावा भरवला जातो. यावर्षी मला त्यात सहभागी होण्याचा योग होता.

इफ्तार पार्ट्यांचं आयोजन करणारे नेतेमंडळी दिवाळी फराळाचं आयोजन करताना का दिसत नाहीत?

Submitted by निखिल झिंगाडे on 31 October, 2016 - 00:57

ते न्हवं आपली एक शंका
.
.
.
.
.
.
स्पर्धा लावून मोठमोठ्या इफ्तार पार्ट्यांचं आयोजन करणारे नेतेमंडळी दिवाळी फराळाचं आयोजन करताना का दिसत नाहीत?

आपणा सर्वांना काय वाटते?
खूप सार्या लोकाना कळत देखील नाही की दिवाळी म्हणजे नेमके काय.....

नेकी कर फेसबुक पे डाल

Submitted by विद्या भुतकर on 25 October, 2016 - 18:59

थोड्या दिवसांपूर्वी एक पोस्ट टाकली होती, पणत्या रंगवून विकण्याचा प्रयोग करणार होते म्हणून. http://www.maayboli.com/node/60405 पणत्या विकण्याचा प्रयोग करण्यामागे दिलेल्या अनेक कारणांमध्ये अजून एक कारण होतं. ते पूर्ण झाल्यावरच बोलायचं म्हणून थांबले होते. पणत्या रंगवण्यात आनंद मिळत होताच तरी त्या विकून त्याच्यातून मिळणाऱ्या पैशांची तुलना नकळत माझ्या नोकरींशीही होत होती. खरंच त्यात इतका वेळ घालवावा का हे कळत नव्हतं. त्यांची क्वालिटी चांगली असली तरीही लोक त्यासाठी जास्त पैसे द्यायला तयार होतील का हाही विचार येत होता मनात.

सायकॉलॉजिकल काउंसेलर्स

Submitted by मी अमि on 26 September, 2016 - 08:25

दादर माटुंगा बांद्रा माहिम या परिसरातील समुपदेशकांबद्दल माहिती हवी आहे. जवळच्या नात्यातील एका व्यक्तीला डिप्रेशन सिंड्रोम्स दिसत आहेत. कृपया कोणाला एखाद्या चांगल्या समुपदेशकाबद्दल माहिती असल्यास सांगा. धन्यवाद.

शालाबाह्य मुलांचा प्रश्न - तिथंही आणि इथंही!

Submitted by मंदार शिंदे on 25 September, 2016 - 08:24

दि. २ मार्च २०१६ रोजी 'पाकिस्तान ऑब्झर्व्हर'नं शालाबाह्य मुलांसंदर्भात एक बातमी प्रसिद्ध केलीय. झोब जिल्ह्यातल्या सुमारे पंधरा हजार शालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी घरोघरी जाऊन प्रयत्न करण्याची घोषणा झोब जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी हबिबूर रेहमान मंडोखेल यांनी केल्याचं या बातमीत म्हटलंय. याच बातमीनुसार, पाकिस्तानात दोन ते तीन कोटी मुलं शाळेपासून वंचित आहेत. आतापर्यंतच्या सर्वच सरकारांनी शिक्षणाकडं केलेल्या लाजिरवाण्या व अक्षम्य दुर्लक्षामुळं ही परिस्थिती ओढवल्याचं या बातमीत म्हटलंय.

प्रांत/गाव: 

'मोर देखने जंगल में' - संपूर्ण चित्रपट

Submitted by admin on 8 September, 2016 - 00:26

भारतातल्या ग्रामीण भागात राहणार्‍यांना रोजगार मिळावा, त्यांना स्वयंपूर्ण होता यावं, या हेतूनं डॉ. मणिभाई देसाई यांनी 'बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाऊंडेशन'ची स्थापना केली. आज ही संस्था शेती, नैसर्गिक संपत्तीचं व्यवस्थापन, पशुधनाचं व्यवस्थापन आणि संवर्धन, जलव्यवस्थापन अशा अनेक पर्यायांच्या मदतीनं रोजगार-निर्मिती करते.

'बायफ' भारतातल्या सोळा राज्यांमध्ये कार्यरत असून सुमारे एक लाख खेड्यांमधल्या पन्नास लाखांहून अधिक भूमिहीन आणि परिघाबाहेर जगणार्‍या कुटुंबांना या संस्थेनं मदतीचा हात दिला आहे.

Pages

Subscribe to RSS - सेवाभावी संस्था