मैत्री उपक्रम माहिती आणि आवाहन - २०२२

Submitted by हर्पेन on 2 June, 2022 - 07:44

मैत्री उपक्रम माहिती आणि आवाहन - २०२२

खूपच उशीर झालाय हा धागा सुरु करायला. पण इंग्रजीत म्हणतात तसे 'बेटर लेट दॅन नेव्हर'
“मैत्री” च्या कामाला ह्या वर्षी २५ वर्ष होत आहेत.

जुन्या जाणत्या सभासदांना माहीत असेल पण नवीन सभासदांकरता म्हणून परत एकदा लिहितोय

'मैत्री' ही पुण्यातील स्वयंसेवी संस्था मेळघाटातील अगदी दूरच्या गावांमधे आरोग्य , शिक्षण व शेती याकरता काम करते. स्वयंसेवेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे सरकारी मदत न घेता 'मैत्री'चे काम सुरू आहे.

प्रत्येक माणसाला समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा आणि उर्मी असते यावर 'मैत्री'चा दृढ विश्वास आहे आणि म्हणूनच त्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणे आणि संधी उपलब्ध करून देणे 'मैत्री' आनंदाने करते. शक्यतो मैत्रीच्या उपक्रमांमधे लोकांनी प्रत्यक्ष सहभाग घ्यावा ह्यावर 'मैत्री'चा भर आणि कटाक्ष असतो.

'मैत्री'चे काम मुख्यत्वेकरून अमरावती जिल्ह्यातील मेळघाट भागात चालते. तुम्हाला मेळघाटात जाणे शक्य नसेल तर तिथल्या उपक्रमांची आखणी करणे, पुर्वतयारी करणे ई. कामांकरता पुण्यातून मदत करू शकता.

गेल्या अनेक वर्षापासून 'मैत्री' आपत्कालीन व्यवस्थापन संदर्भाने देखिल सातत्यपुर्ण कामगिरी करते आहे. त्याकरता त्या त्या वेळी प्रत्यक्ष
गरजेच्या ठिकाणी जाण्याबरोबरच तिथे न जाता करण्याजोगी अनेक कामे असतात त्यातही आपण सहभागी होऊ शकता.

'रद्दीतून सद्दी' ह्या उपक्रमा अंतर्गत तुमच्या सोसायटीमध्ये 'रद्दी संकलन' सुरु करून त्याच्या विक्रीतून आलेले पैसे मैत्रीला मदत म्हणून देऊ शकता. सोसायटीत मोठ्या प्रमाणावर जमणार नसेल तर स्वतःच्या आणि आपापल्या नातेवाईक मित्रमंडळी ह्यांच्या घरातली रद्दी विकून आलेले पैसे मैत्रीला मदत म्हणून देऊ शकता.

विविध कंपन्यामध्ये CSR ला पाठविण्यासाठी मेळघाट विषयीचे प्रस्ताव लिहिणे व त्याचा पाठपुरावा करणे या कामी आम्हाला मदत करू शकता. पुण्यातील ऑफिसमध्ये कार्यालयीन कामात काही वेळेला मदत लागते तेव्हा तुम्ही येऊ शकता.

'मैत्री' बाबत इतर लोकांना सांगून स्वयंसेवक व देणगी मिळवून देण्यासाठी आम्हाला मदत करू शकता.

अशा खूप काही कल्पना आणि मार्ग आमच्यापाशी आहेत आणि आम्हाला खात्री आहे की तुमच्याकडे यापेक्षा कितीतरी अधिक कल्पना असतील. चला तर मग, आपण एकत्र मिळून चांगले काहीतरी घडवूया.

Maitri is registered under the Bombay Public Trusts Act, 1950 on 31st July 1999 (E-2898 / Pune). PAN Number: AAATZ0344C, FCRA Registration Number: 083930473.

Office Address
Flat No. 9, Mahadev Smruti,
Near Bal Shikshan Mandir,
Mayur Colony,
Kothrud, Pune 411038

Telephone Numbers
Office: 9309930010

Website : http://www.maitripune.net
E-mail: maitri1997@gmail.com

मैत्रीच्या मेळघाट व इतर कामांसाठी तुम्ही यथाशक्ती आर्थिक मदत करू शकता.
ONLINE DOMESTIC DONATION
Maitri Account Details (avail this facility at no cost)
Bank : H D F C Bank
Branch : Kothrud, Pune
Savings Account Number : 01491450000152
Account Name : Maitri
MICR : 411240009
Details for RTGS / NEFT / IFS Code : HDFC0000149

ONLINE FOREIGN DONATION
Maitri Account Details (avail this facility at no cost)
Bank : H D F C Bank Limited
Branch : Kothrud, Pune, Maharashtra, India.
Savings Account Number : 01491170000017
Account Name : Maitri
MICR Code : 411240009
Swift Code : HDFCINBB

गेली अनेक वर्षे सुरु असलेली “मैत्री” ची मंगळवारची कमला नेहरु उद्यान, पुणे येथे होणारी बैठक करोनाच्या काळात खंडीत झाली होती. मध्यंतरी ही बैठक प्रत्येक मंगळवारी नेहेमीप्रमाणे साडे सहा वाजता पण ऑनलाईन पद्धतीने सुरु ठेवण्यात आली होती. या बैठकीत उपस्थितीत राहणार्‍यांनी मैत्रीला 9309930010 वर तसे कळवावे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

करोना मुळे बंद पडलेली मैत्रीची प्रत्यक्ष बैठक मागच्या मंगळवारी कमला नेहरु उद्यान, पुणे येथे पार पडली.
ह्या बैठकीतही काही मित्र ऑनलाईन प्रकारे सामील झालेले होते.
जवळपास अडीच वर्षानंतर झालेल्या प्रत्यक्ष भेटी मुळे मैत्रीचे मित्र अगदी आनंदात होते.

मैत्रीचा २०२२ सालचा वार्षीक मेळावा २५ जून ला आहे.
त्याकरता आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे.
कार्यक्रम पुण्यात- न्यु इंग्लीश स्कूल, टिळक रोड च्या सभागृहात संध्याकाळी ६ ते ८ असा आहे.
तुम्हाला प्रत्यक्ष येता यावं म्हणून लवकर कळवलंय. मग भेटूया तर.

सर्वांना आग्रहाचे निमंत्रण.
अनेक मायबोलीकरांनी वेळोवेळी 'मैत्र' निभावलं आहे
पुण्यात असला तर स्वतः जरूर या.
नसलात तर नातेवाईक मित्रमंडळी यांना जमतंय का ते बघा.
आपल्याला एकत्र भेटता येण्याची संधी मिळते आहे, लाभ घ्या.

शुभेच्छा देतो.
नेमका परगावी जात असल्यामुळे ही संधी हुकणार याचा खेद होतोय.

ह्या वेळच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत श्री. सुनिल लिमये, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव महाराष्ट्र).

'मैत्री'चे अनेक हितचिंतक, मित्र, कार्यकर्ते, स्वयंसेवक म्हणून काम केलेले, देणगीदार ई. पुण्याबाहेर असतात त्यांना सहभागी होता यावे म्हणून मेळाव्या च्या दिवशी फेसबुक पानावरून थेट प्रक्षेपण करण्याचा मानस आहे. तांत्रिक चाचण्या तपासण्या सुरु आहेत, झाल्यावर इकडे कळवेनच.

https://www.facebook.com/Maitripune

IMG_20220625_183253831_0.jpg

छान झाला कार्यक्रम
खूप किस्से,अनुभव ऐकायला मिळाले

निमंत्रित केल्याबद्दल हर्पेन यांना धन्यवाद

तेजो, तू आली बरोबर लेकीलाही आणलं.
अनपेक्षित आणि सुखद धक्का होता माझ्याकरता
वेळात वेळ काढून आल्याबद्दल धन्यवाद

हिंगोली जिल्ह्यातल्या कुरूंदा गावात (तालुका वसमत) शनिवारी पहाटे, ९ जुलैला झालेल्या ढगफुटीमुळे १००० + लोक स्थलांतरित झाले, जनावरे वाहून गेली, गावातली बरीच मातीची घरे पडली..
इथले पूरग्रस्त सध्या शाळेत रहात आहेत. प्रशासन व परिसरातले लोक त्यांची जेवणाची सोय करत आहेत. आज पाणी ओसरायला सुरूवात झाली आणि लोक घरं साफ करण्याच्या कामाला लागले आहेत.
आपले मित्र शिवाजी गावंडे यांनी तिथल्या परिस्थितीचा आढावा घेऊन कळवल्याप्रमाणे पूरग्रस्तांना चटई, अंथरुण व पांघरुणाची गरज आहे.
प्रत्येक व्यक्तीस १-१ चटई, अंथरुण व पांघरुण द्यायचे झाल्यास रु. २५७/- एवढा खर्च आहे.
आपल्याला एकूण ६०० व्यक्तींपर्यंत ही मदत पोचवायची आहे..
#मैत्री आणि #परिवर्तन भारत चे मित्र कुरूंद गावाकडे मदतकामासाठी जायच्या तयारीत आहेत.
या कामासाठी तुमची साथ हवी आहे.

सहभागी होण्यासाठी ९३०९९ ३००१० या दूरध्वनीवर लिखीत संदेश पाठवा किंवा maitri1997@gmail.com ला ईमेल करा.
अधिक माहितीसाठी भेट द्या: www.maitripune.net
———
जर प्रत्यक्षात काम करायला जाऊ शकत नसाल तर वरील कामासाठी निधी गोळा करायला मदत करा.
For online donations to Maitri:
1. Indian source:
Bank : H D F C Bank
Branch : Kothrud, Pune
Savings Account Number : 01491450000152
Account Name : Maitri
MICR : 411240009
Details for RTGS / NEFT / IFS Code : HDFC0000149ONLINE
Donations to MAITRI are exempt under sec 80(G) of the Income Tax Act.
———
2. Foreign Source:
(Individuals holding foreign passport and/or companies, organisations, trusts, foundations incorporated in a foreign country)
Name of the beneficiary : MAITRI
Bank : State Bank of India. New Delhi Main Branch. 11 Sansad Marg. New Delhi 110001. India
Beneficiary account number : 40166623586
SWIFT Code : SBININBB104
IFSC : SBIN0000691
Purpose code : P1303
https://www.instamojo.com/@maitripuneforex/
(Please mention the purpose code as "P1303" in the payment instruction when the transfer is effected)

चिलाटी गावात कॉलरा सारखे साथरोग होऊ नये म्हणून दि. ३० जुलै २०२२ रोजी गावातील शिक्षक, अंगणवाडी, मदतनीस, आशा वर्कर, मेळघाट मित्र टिम आणि पोलीस पाटिल अशा सर्वांनी मिळून गाव शिवार फेरी काढली होती आणि घरा घराला भेट देण्यात आली.
या दरम्यान गावातील लोकांना घर आणि घराचा परिसर यांची स्वच्छता करायला सांगितले, जेणे करून साचलेल्या पाण्या मुळे मलेरिया सारख्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये.

WhatsApp Image 2022-07-30 at 12.06.42 PM.jpeg