बीएमएम २०२४ स्मरणिका साहित्य आवाहन!

Submitted by छन्दिफन्दि on 2 September, 2023 - 02:56

नमस्कार,

आपल्याला माहीत असेलच की ह्या वेळचे, २०२४चे, BMM अधिवेशन बे एरिया मध्ये होत आहे. या अधिवेशनाची आठवण म्हणून एक विशेषांक काढला जातो, तो म्हणजेच स्मरणिका. यंदाची स्मरणिका नेहेमी सारखी फक्त छापील स्वरूपातच न काढता, ई-बुक आणि ऑडिओ बुक ह्या स्वरूपातही काढली जाणार आहे. त्यामुळे ती जगाच्या कानाकोपऱ्यातून वाचता आणि ऐकता येईल.

मराठी माणसाने साता समुद्रापार येऊन अमेरिकेत रुळताना स्वतःचे मराठीपण आणि परंपराही जपल्या. त्यालाच मध्यवर्ती ठेऊन या वेळच्या स्मरणिकेचा विषय आहे,
"मराठी माणसाला अमेरिकेचा रंग: अमेरिकेला मराठी माणसाचा रंग".

मराठी माणूस म्हणजे गुणवत्ता हे समीकरण तर आपण जाणतोच. तर आमचे अमेरिकेतील सर्व मराठी माणसांना हेच सांगणे आहे की तुम्ही तुमच्यातले कलागुण, चित्रकारिता, लेखन, काव्य तुम्ही आमच्या पर्यंत पोहोचवा. आम्ही स्मरणिकेद्वारे ते इतर अभरुचीसंपन्न मराठी जनांपर्यंत पोहोचवू.

स्मरणिका टीम अनेक स्पर्धा, उपक्रम आखत आहे, प्रत्येक वयोगटासाठी वेगवेगळ्या विषयांवर विविध साहित्य प्रकार मागवत आहे. अधिक माहिती साठी खालील संकेत स्थळाला भेट द्या.
https://bmm2024.org/smaranika#sahitya-pathva

तुमच्या साहित्याचे स्मरणिकेत स्वागतच आहे.

कळावे,
स्मरणिका टीम

बाल विभाग

Smaranika Bal Vibhag Flyer Final.jpg

युवा विभाग

Yuva-Flyer-Latest.png

मजकुर विभाग
last Majkur Sahitya Awahan_light.png

ज्येष्ठ विभाग
Final_JyeshthaVibhag RFC  स्मरणिका गट.png

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कृपया शीर्षकात साहित्य असा बदल कराल का?

या उपक्रमाला शुभेच्छा.

Submitted by उपाशी बोका on 2 September, 2023 - 05:57>>>

केला.

चष्मा न घालता मोबाईल वर काम केलं की अस होत कधी कधी Bw

साहित्य फक्त अमेरिकेत वास्तव्य करणार्यांनी पाठवायचे आहे का?>> हो खर तर तसच आहे. उत्तर अमेरिकेतील मराठी लोकांसाठी आहे.

उत्तर अमेरिकेत राहणारी तुमची मुलं, नातवंडं, मित्र- मैत्रीणी, किंवा नातेवाईक यांच्या पर्यंत ही माहिती जरूर पोहोचवा. धन्यवाद!