सिव्हिल इंजिनीअरिंग : मदत हवी आहे

Submitted by बाप्पू on 22 February, 2018 - 08:15

माझ्या भावाने M.E (Civil- Construction Management) केले आहे . त्याचबरोबर त्याने सिविल क्षेत्राशी संबधीत काही सर्टिफिकेशन पण केली आहेत. आता सध्या तो जॉब सर्च करत आहे.
परंतु ज्याप्रकारे आम्हा IT वाल्यांना naukri, shine, monstor आणि इतर करिअर साईट्स चा फायदा होतो तसा त्याला होताना दिसत नाहीये.
खूप प्रयत्न करून सुद्धा त्याला कंपन्यांचे किंवा रिक्रुटर्स चे फोन किंवा ई-मेल येत नाहीत. जे येतात ते मार्केटिंग आणि सेलिंग चे असतात.

त्याला मध्यंतरी बेंगलोर मधून ऑफर आली होती पण घराच्या काही अडचणी मुळे सध्या तो पुणे सोडू शकत नाहीये.
त्याचा हा strugle पाहवत नाहीये. तो एक हुशार मुलगा असून मला खात्री आहे कि जर संधी मिळाली तर त्याचे तो सोने करेल. पण त्याला स्वतःला सिद्ध करण्याची संधी च मिळाली नाही तर त्याच्या टॅलेंट चा काय उपयोग.
मी स्वतः गेले ८-९ वर्षे IT क्षेत्रात काम करत असल्याने त्याला मी हि जास्त मदत करू शकत नाहीये.

कोणी मायबोलीकर या मध्ये मला मदत करू शकेल का. जर कोणी मायबोलीकर सिविल क्षेत्राशी संबंधित असेल तर कृपया मला तुमचा EMAIL ID किंवा PHONE नंबर व्यनि करू शकाल का?

सध्या त्याने काम करून मला पैसे आणून द्यावेत असा माझा हेतू नाहीये. त्याला खूप चांगला पगार त्याला मिळावा अशी हि अपेक्षा नाहीये. पण स्वतःला आता विद्यार्थी दशेतून बाहेर काढून आपले व्यावसायिक जीवन सुरु करावे हीच एक भाऊ म्हणून अपेक्षा आहे.
"रिकामे मन हे सैतानाचे घर " असे कोणीतरी म्हणलेले आहे त्यामुळे त्याने आता आणखी दिवस वाया न घालवता आता आपल्या आयुष्यातील पुढील टप्पा गाठावा असे मोनोमन वाटते.

त्याला यामध्ये मी moral support शिवाय काहीहि करू शकत नाहीये. कारण माझे आणि त्याचे क्षेत्र पूर्ण पणे वेगळे आहे. इथे कोणी सिव्हिल इंजिनीअरिंग क्षेत्राशी निगडित जे मायबोलीकर आहेत ते काही मदत करू शकतील का ???

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुणे सोडायचे नाही या मानसिकतेत असाल तर सल्ला देण्याचा प्रश्नच मिटला. ह्याला गरजू म्हणता येणार नाही.