कॅनडा चा PR किंवा वर्क परमिट पुण्यातून मिळवायचे असल्यास काय करावे??

Submitted by नटुकाकी on 9 March, 2018 - 02:15

कॅनडा चा PR किंवा वर्क परमिट पुण्यातून मिळवायचे असल्यास काय करावे??या आधी असा काही धागा असल्यास कृपया त्याची लिंक मिळेल काय??नवरा आणि बायको दोघेही IT मध्ये.. स्वतःचा स्वतः करावा का एजंट किंवा कन्सल्टंट ची मदत घ्यावी?? मला ते A V इमिग्रेशन किंवा ciel ,oasis असे कन्सल्टंट चे ई-मेल येत असतात.. पण असे कितपत रिलायबाल आहे माहीत नाही...पुण्यात कोणी खात्रीशीर मदत करणारं आहे का??किती खर्च येतो??का आधी जॉब शोधून स्पॉन्सरर मिळवावा आणि मगच जावे म्हणजे PR किंवा वर्क परमिटचा खर्च वाचेल.. नंतर जॉब लागून त्यांनी कापून घेतला सॅलरीतुन तर ओके आहे पण जॉब हातात नसताना नुसता आधी व्हिसा करायचा आणि मग जॉब तिकडे जाउन शोधायचा आणि नाही मिळाला तर पैसे वाया आणि वेळ ही...

Group content visibility: 
Use group defaults

तुम्हाला नक्की काय हवे आहे ते आधी ठरवा. PR कशासाठी ?
(अ) भारतात राहुन कॅनडामधे जॉब मिळवायचा, मग इथे आल्यावर सभोवतालचा अभ्यास करुन देश लोक आवडले तर पुढचे PR चे सोपस्कार करायचे.
(ब) भारतात राहुन PR घ्यायचा, इथे यायचे, जॉब शोधायचे. मग पुढचे सोपस्कार.
दोन्ही मार्ग सोपे आहेत/ नाहीत पण हे सर्वस्वी तुमच्यावर अवलम्बुन आहे.

तुमच्या जागी मी असेल तर प्रथम कॅनडा देशाचा अभ्यास करेल. CIC वेबवरुन काय पर्याय उपलब्द आहेत त्याचा अभ्यास करेल. तुमच्याकडे खुप पैसे असतील, आणि वेळ कमी असेल तर एजन्ट गाढायचा. त्याने १० पट पैसे जातील पण तो तुमचे सर्व काम करेल. पैसे वाचवाणे हा उद्देश असेल तर वेळ काढायचा, माहिती मिळवायची आणि स्वत: निर्णय घ्यायचे.

उदय चांगली माहिती शेअर केलीत पण तुमच्यासारख्या जाणकार माबोकराकडून डिटेल माहिती अपेक्षित आहे. स्वतंत्र लेख लिहु शकलात तर आनंदच आहे.

मला बऱ्यापैकी माहिती मिसळपाव या वेबसाईट वर मिळाली... https://www.misalpav.com/node/40259 या लिंकवर बरीच माहिती उपलब्ध आहे..विशेष करून ट्रेड मार्क यांच्या प्रतिसादमध्ये सगळया गोष्टी कव्हर केल्यात...