नोकरीच्या शोधात

Submitted by राज1 on 7 March, 2018 - 01:01

मी एका कंपनीत computer operator म्हणून २१ वर्षे काम करत होतो. माझ्या operation साठी मला ४ महिने सुट्टी घ्यावी लागली त्यामुळे हा computer operator जॉब सोडवा लागला. नवीन computer operator जॉब च्या शोधात आहे. कोणाला नवीन computer operator जॉब बद्दल माहिती असल्यास कृपया सांगा. माझे वय ४९, पुणे येथे राहात आहे

Group content visibility: 
Use group defaults

जाहिरात विभागात काही पुण्यातील नोकरीच्या जाहिराती आहेत, त्या पाहिल्यात का?
तुमचीही जाहिरात तिथे देता येईल.
इथेही फक्त computer operator लिहीण्यापेक्षा, नेमके कुठले सॉफ्टवेअर / डेटाबेस / सिस्टीम यावर काम केले आहे / कशा प्रकारचा अनुभव आहे त्याचाही उल्लेख केला तर योग्य ठरेल.
computer operator व्यतिरिक्त काही काम / कौशल्य अवगत असेल तर तेही लिहील्यास त्यासंबंधी कोणी संपर्क करेल.

तुमच्या अडचणीतून मार्ग मिळेल, शुभेच्छा.

हे किती शक्य / अशक्य आहे / होते, तुम्हीच ठरवू शकाल...पण २१ वर्षे काम केल्यावर ४ महिने सुटी मिळाली असती, भले बिनपगारी. नोकरी सोडायला नको होती. आता कंपनीच्या मालकांशी / व्यवस्थापनाशी बोलून, त्यांना विनंती करून पुन्हा तिथेच रूजु होता येईल का पहा. आतापर्यंतच्या तुमच्या कामाच्या दर्जाबाबतीत तुमचे वरिष्ठ चांगला अभिप्राय देतील तर हे जमेलही.

कारवी यान्च्याशी सहमत... थोडे सविस्तर लिहा. Computer operator.... खुप मोठे क्षेत्र असल्याने काहीच अन्दाज बान्धता येत नाही.

तुम्हाला मिळालेला वेळ हे नवे कौशल्य शिकण्याची मोठी सन्धी आहे. त्या दृष्टीने विचार करा. तुमच्या २१ वर्षान्च्या अनुभवातुन तुमच्याकडे काही transferable skills असतीलच त्यान्चा वापर करुन नोकरी साठी प्रयत्न करा.

मुख्य म्हणजे सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. शुभेच्छा.

मुंबई व पुणे इथे आयटीआय मशिनिस्ट, ऑफिस एक्सएल वापरता येणारा किंवा डिप्लोमा/डिग्री होल्डर उमेदवार पाहिजे. फ्रेशर असेल तर उत्तम.
oveesystems@gmail.com

योगिता, उदय व तर्राट प्रतिसादा बद्दल धन्यवाद
हॉस्पिटल मध्ये असल्यामुळे उत्तर देण्यासाठी उशीर झाला.
मी एक्सएल वर interior कामाची बिल करण, Microsoft Office word वर letter करण, इमेल बघून त्याला reply देण, Power Point वर Presentation करण ही काम २१ वर्षे करतोय, वेगळ Skill नाही. त्या ऑफिस मध्ये वेगळ शिकण्या सारखं काहीच न्ह्वत.
योगिता, त्या कंपनीत पुन्हा गेलोतर कामावर पुन्हा घेतीलही, पगार पण मिळेल, त्या कामाचा कंटाळा आला होता. ऑफिसच्या Driver एवढाच माझा पगार. हे विचित्र वाटेल पण job सोडायला लागला ते बऱ झालं. पण हा प्रश्न आहेचं हया वयात जॉब कुठे मिळणार

@ राजेंद्र
ही काम २१ वर्षे करतोय, वेगळ Skill नाही. त्या ऑफिस मध्ये वेगळ शिकण्या सारखं काहीच न्ह्वत.
त्या कामाचा कंटाळा आला होता. ऑफिसच्या Driver एवढाच माझा पगार. >>>> हे समजायला + त्यातून बाहेर पडायचा निर्णय घ्यायला थोडा उशीर केलात..... कदाचित तुमच्या जबाबदार्‍यांनी तुम्हाला थांबवले याआधी.

ही काम २१ वर्षे करतोय, वेगळ Skill नाही. >>> हे नवीन / अनोळखी ठिकाणी मुलाखतीत तुमच्या विरोधात जाणारा मुद्दा ठरू शकेल. याचे स्पष्टीकरणही विचारतील. कारण तरूण उमेदवार १०० गोष्टी शिकून तुमच्या सोबत स्पर्धेत असतील. मग तुम्हाला का घ्यावे असे स्पष्ट विचारतील.

त्या कंपनीत पुन्हा गेलोतर कामावर पुन्हा घेतीलही, पगार पण मिळेल, त्या कामाचा कंटाळा आला होता >>>>>
मान्य आहे पण ठराविक मासिक उत्पन्नाची शाश्वती तरी राहील? जर अन्य कुटुंबिय तुमच्यावर अवलंबून असतील तर हे गरजेचे आहे. कंटाळा टाळण्यासाठी तिथेच अन्य कामात रस घेऊन, नवे काही शिकून करता येईल. रूटीन कामात बदल म्हणून.

नोकरी शोध, अर्ज, मुलाखत, नवे नेमणूकपत्र मिळणे हे टप्पे पार पडेपर्यंत आहे तेच चालू ठेवा. रिकामे दिवसही फार काळ बरे नाही वाटत कामाची सवय असणार्‍याला.

वय आणि मर्यादित कौशल्ये लक्षात घेता, नवीन नोकरीचे कामही त्याच स्वरूपाचे / चाकोरीचे मिळाले तर फक्त जागा बदलेल. पगार / काम तसेच राहील जवळपास.
हातात नोकरी असताना दुसरी शोधली तर जॉब मार्केटमध्ये किंमत मिळते. घरी बसून नोकरी शोधली तर आपण बेकार / गरजू / दगडाखाली हात असलेले आहोत हे समोरचा ओळखतो. तो बेकार शिक्का स्वतःवर घेऊ नका ही विनंती.
ट्रॅपीझ खेळात दुसरा झुला जवळ / आवाक्यात आल्याशिवाय पहिला सोडत नाहीत, आहे त्यावरच झोके घ्यावे लागतात तेसुद्धा स्टाईलने.

तर्राट जोकरनी सुचविलेल्या जागी अर्ज / सम्पर्क करून बघा.

शुभेच्छा.

मिळेल नक्की.शुभेच्छा.
अवांतरः मधल्या वेळात लॉ कॉलेज ला पेटंट किंवा सायबर लॉ किंवा तुमच्या फिल्ड शी थोडे संबंधित आणि तुमच्या इंटरेस्ट चा शॉर्ट कोर्स करता येईल का?

@ कारवी, वस्तूस्थितीची जाणिव करून दिलीत.

@ राजेन्द्र, धीर सोडू नका, माबोकरांनी नमुद्द केलेल्या मार्गाचा विचार करा. नक्की मार्ग निघेल, सांगता येत नाही कोणीतरी मदतीचा सक्षम हात देवून तुम्हाला या अवस्थेमधून बाहेर काढेल.

योगिता, प्रतिसाद योग्य वाटला.
आहे त्याच नौकरीत टिकून राहण्याची खूप मोठी चूक मी केली, दुसरी नौकरी शोधून तिथे मी जायला पाहिजे होत.
ऑफिसमध्ये एक्सएल वर interior कामाची बिल करण, Microsoft Office word वर letter, Power Point वर Presentation एवढीच काम चालतात, Account साठी Tally च software वापरतात पण Account मध्ये मला इंटरेस्ट नाही.
माझ्या मित्राने मला कल चाचणी (Aptitude Test) चा सल्ला काही वर्षांपूर्वी दिला होता, पण काही कारणामुळे जाता आलं नाही.

राजेंद्र... हताश होऊ नका. माझ्यामते तरी तुम्ही हातातली सोडून दुसरी शोधायचं ठरवलंय ते योग्य आहे. Pressure असल्याशिवाय माणूस पूर्ण प्रयत्न करत नाही.
काय झाले, काय करू शकलो असतो, वेळ निघून गेली हे विचार बाजूला ठेवा आणि पूर्ण प्रयत्न सुरू करा !
लवकर मिळेल नोकरी.. शुभेच्छा !

च्रप्स,
दुसरा काही option नसल्याने नाईलाजाने आज पहिल्याच कंपनीत join झालो. मायबोलीवर मला माझ्या पुढच्या आयुष्या बद्दल कोणी सल्ला देऊ शकेल.

राजेंद्र, वर दिलेले सगळे सल्ले पुढील आयुष्यासाठीच आहेत. त्यातला कुठला तुम्हाला रुचतो व जमतो हे तुमचे तुम्हाला ठरवावे लागणार.

कुणी तयार मार्ग दिला हातात व तुम्ही त्यावरून चालायला सुरुवात केलीं असे होत नसते. मार्ग दाखवणारे खूप मिळतात, तुम्ही हात पुढे केलात तर तो धरून थोडा वेळ कुणी तुम्हाला चालवू सुद्धा शकेल पण पुढे तुमचे तुम्हालाच चालावे लागणार. वर दिलेल्यापैकी काहीतरी सुरवात करून पाहा. पुढचा रस्ता तुमचा तुम्हालाच सापडेल.