छळ मांडला ( एलदुगोला समर्पित) - विडंबन

Submitted by रीया on 17 August, 2012 - 13:56

गुरू ठाकूरची क्षमा मागून... खेळ मांडला...

संदर्भ : http://www.maayboli.com/node/35791 Proud

तुझ्या काळेवाडी कोणी सान थोर न्हाई
साद प्रेक्षकमाऊलींची तुझ्या कानी जाई
तरी देवा संपनाही सिरियल कशापायी
हरवली कथा त्यात काही लॉजिक नाही

चवताळून खरडतो बाफ मायबापा
माबोवरी धागा पेटला
छळ मांडला ...... छळ मांडला... छळ मांडला

माई आजी, ज्ञाना सवे ती कुहू नि प्रभुटला
राजवाडे कंपनीने छळ मांडला
सोडूनी कामधाम हिंडे वल्लभ आणि दिग्या काका
माझ्याच टिव्हीने माझा छळ मांडला…

हरवली अमेरिका अशी आधार कुणाचा न्हाई
तुटलेल्या हृदयाने घना लॅपटॉप फॉर्मॅटींग करी
बळ दे बघायाला, संयमाची ढाल दे
इनवितो फॅनक्लब मुक्ताला रे न्याय दे
आणूनी अबीरला तू लांबवली मालिका
तरी नाही अंत घावला....छळ मांडला....

-प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रिया: Biggrin Biggrin Biggrin

मालिका बघायची कधीच थांबवली पण त्यानिमित्ताने माबोकरांच्या प्रतिभेला अगदी बहार येत असते हे काही कमी नाही................. Proud

आई शप्पथ.... हे काय प्रकरण आहे ... एलदुगो इतकी छळते का लोकांना??? वाचलो ब्वा... इथे नाही दिसत असलं काही Happy

रीया, नो वरीज. एलदुगोच शुट संपलय. सिरियल पण संपेल आता. Happy
मी ती सिरियल फॉलो करत नसल्याने तुझ्या सगळ्याच भावना पोहोचल्या नाहीत. Proud

मस्त...

मी कुठलीच 'मालिका (मराठी, हिन्दी, इंग्रजी) ' आज पर्यन्त पहील्या भागा नंतर धडपणे बघितलेली नाही (ते काम बायकोकडे सोपवलंय)... त्यामुळे 'मालिका बघणार्‍यां'चा 'छळ' कसा काय होतो?, त्याची कल्पना येत नाही... तरी देखिल गाजलेल्या गाण्याचं (त्याच मिटर मधे) व्यवस्थीत संदर्भ देऊन केलेलं 'विडंबन' आवडलं...
Happy

रीया

मला तर शंका येतेय तुला मालिका पहायला वेळ कसा काय मिळाला असेल Proud
कदाचित इथल्या बाफबद्दलच्या भावना असतील. गॉड क्नोज !! मी पण कुठलीच मालिका फॉलो करत नसल्याने भापोल्या नाहीत. मात्र धागा पेटला वगैरे माबोवरचे जुने वाक्प्रचार तू शिताफीने वापरू लागली आहेस हे पाहून गहिवरून आलं. Wink

शुभेच्छा !!

सगळ्यांना धन्स Happy

उदय बघावी लागेत रेssssssssss (माई आजीचा टोन इमॅजिन कर इथे Wink )
निखिल तर काय! अगदी अगदी ! Proud
शागं, वेका, कौतुकदादा, विवेकदादा,किरण मालिका पहाण्याची गरजच नाही मुळी, एकदा तो धागा जाऊन वाचून या (थोडासा वाचला तरी चालेल ) लगेच माझ्या भावना पोहचतील Proud

कौतुकदादा : त्यांनी रिमेक काढला सिरिअलचा तर याविचाराने पण वरीमध्ये आहे मी Proud

विवेकदादा Happy मिटर वैगेरेचा विचारच केला नव्हता Happy
पण तरी बसली याचा जास्त आनंद आहे Happy

किरण : झाले की मी आता पक्की माबोकर म्हणजे Proud

आई ग ! कस ग सुचतं तुला इतके मस्त लिहायला...... बाकी सध्या कोणत्याच सिरीयली बघत नाही तरी माबोवर एलदुगोचा धागा नेहमी पहिल्या पानावर झळकायचा, मला वाटले होते की प्रेषकांना खिळवुन ठेवणारे काहीतरी बघायला मिळत असेल तर तुझ्या विडंबनावरुन काहीतरी वेगळेच संकेत मिळत आहेत Proud Lol

रीया Proud

आणखी काही मालिकांबद्दल येऊ दे. अशा मालिका लिहीणारे लोक्स, क्रमशः कादंब-या लिहीणारे लोक्स यांच्या मेंदुत सतत कारस्थानं शिजत असावीत असा मला संशय आहे. त्याशिवाय इतक्या कलाटण्या, लोकांना अपेक्षित असलेल्या कथानकापेक्षा भलतीच वळणे घेत जाण्यामागे सैतानी मेंदूच असू शकतो Biggrin

( इथं एक दोन ड्युआय काढले तर लोकांना कधी कळवतो असं होऊन जातं.. Proud )

हाहाहाहाहाहाहा!
उदय बघावी लागेत रेssssssssss (माई आजीचा टोन इमॅजिन कर इथे )>>>>>>>>
केला केला! रिया...............कळली बरं अगतिकता!

Pages