ओवन

आणि हिटलर हसला ... (५७५)

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 December, 2017 - 14:27

फेसबूक पेटून उठले होते. जंगली मराठी ग्रूपवर नवीन टॉपिक आला होता. दारू जुनीच. बाटली नवीन. विषय गोरक्षकावरून सुरू होऊन तालिबान, ईस्लाम, आतंकवाद, ते ईंदिरा गांधीना सोबत घेत, महात्मा गांधी असा येऊन पोहोचला होता. अहिंसो परमो धर्म: .. अशक्य आहे हे. टोटल हिंसा किंवा टोटल अहिंसा. मधलं काहीतरी जमायला हवे. पण कोणंच ऐकायला तयार नव्हते. वर्षानुवर्षे तेच मुद्दे. सोहमच्या डोक्याचा भुगा झाला होता. असह्य होऊन तो उठला आणि किचनमध्ये जाऊन कॉफी उकळवायला ठेवली. कॉफीसोबत त्याच्या आवडत्या कूकीज घ्यायला म्हणून फडताळावरच्या डब्याला हात घातला. पण वीजेचा झटका बसल्यागत हात मागे आला.

विषय: 
Subscribe to RSS - ओवन