तिसर्यांदा मूषकानं आत-बाहेर केल्यावर, गौरी हातातलं टाकून उठली. कधी कधी मूषकानं मयुराला फारच त्रास दिला तर तो मागे लागतो त्याच्या.... पण मयुर तसा सहसा त्याच्या वाट्याला जात नाही. आपल्या वाहकासारखा तोसुद्धा थोडा गंभीरच.
आतून तालात पावलं टाकल्याचा आवाज आला. गौरीनं हळूच आत डोकावून बघितलं तर... बाल-गणेशाचं एका पायावर तोल सावरीत तांडव मुद्रा घेणं चाललं होतं. उत्तरीय घामाने अंगाला चिकटलं होतं, चेहरा लाल झाला होता, मस्तकावरची कुरळ घामानं ओली होऊन चेहर्याला महिरपून होती. महत्प्रयासाने आपल्या तुंदिल तनुचा भार गौर पावलांवर तोलीत, गणेशा नृत्याचे अविष्कार करीत होता...
आठवणीची रिळं भाग १ - काळ क्युएस्क्युटीचा
तुम्ही क्यु एस क्यु टी, एम पि के, एच ए एच के (हे जरा हिचकी दिल्यासारखं वाटतं ना?) डि डी एल जे च्या काळातले आहात? असाल तर "ये एच ए एच के क्या है भाई?" असा प्रश्न तुम्हाला पडणारच नाही आणि असा प्रश्न पडला असेल तर तुम्ही नक्की त्या काळातले नाही किंवा तुमचा गजनी तरी झालाय असं समजायला हरकत नाही.
भाद्रपद महिना म्हणजे गणेशोत्सवाचा जल्लोष! या दिवसांत बाजारपेठांतील गल्ली अन गल्ली मंगलमय रूप धारण करते. जिकडे तिकडे अत्तर, उदबत्त्यांचा सुगंध, फळांच्या गाड्यांवर फळांच्या सुबक राशी, फुलमार्केटमध्ये सजावटीची फुले, कंठ्या नी दूर्वा, सुगंधी फुलांनी मार्केट इतके मंगलमय झालेले असते की तिथून पाय पुढे निघत नाहीत. काही सजावटीची दुकाने तोरण, माळांनी घरा-घरांतील गणेशाचे स्वागत करायला सज्ज झालेली असतात. हलवायांच्या दुकानांत मोदकांच्या सुबक राशी रचल्या जातात. सीडींची दुकाने गणेश भक्तीच्या गीतांनी सुरेल झालेली असतात. गणपतीच्या आगमनापूर्वीचे दोन दिवस तर बाजारपेठ तुडुंब भरलेली असते.
सर्वसाधारण मुंबईतील कोकणस्थ म्हणत असतात, तसा आमचा गणपती गावाला. आमचे मूळ गाव राजापूर. म्हणजे आमच्या घराण्याचा मूळ गणपती तिथेच असतो. मला मात्र इतक्या वर्षात कधीही तिथे जाता आले नाही. पूर्वीदेखील गणपतीला एस्टीच्या जादा गाड्या सोडत असत. आताही असतात, आता तर रेल्वेच्या जादा गाड्या पण असतात. पूर्वी लोक गणपतीच्या सजावटीचे सामान घेऊन कोकणात जात असत. खूपदा गावचे घर बंदच असे. मग तिथे जाऊन साफसफाई करावी लागे. आता निदान कोकणातील घरात लोक राहतात.
गणेशचतुर्थीच्या आधी काही दिवस मात्र, मुंबई गोवा हायवे नुसता भरून वाहत असतो. एस्टीबरोबरच आता खाजगी गाड्याही भरपूर दिसतात.
ॐ नमो जी आद्या। वेद प्रतिपाद्या। जय जय स्वसंवेद्या। आत्मरूपा ॥
मराठी मातीच्या आणि मराठी माणसाच्या मनात असलेले गणपती बाप्पाचे प्रेम, श्रद्धा, भक्ती खरी बहरून येते ती गणेशोत्सवाच्या काळात! जागोजागी गणेशभक्तांचे मेळे, मंडपांत विराजमान गणपती बाप्पा मोरयाच्या आगमनार्थ रचलेले सोहाळे, रोषणाई - सजावटी - मंगल आरत्या, पठणांसह घरांघरांतून उत्साह, मांगल्य व आनंदाला आलेले उधाण... खास महाराष्ट्रात प्रचंड मोठ्या प्रमाणात साजरा होणारा असा हा उत्सव! ढोल, ताशे, झांजांच्या गजरात वाजत-गाजत येणार्या गणरायांच्या आगमनाची प्रत्येक घरातून सारे वर्ष आतुरतेने वाट पाहिली जाते.
गणपती यायला फक्त एकच महिना बाकी होता पण आम्हा कार्यकर्त्यांच्या कामाची सुरुवात तेव्हाच होते. रीतसर शेजारच्या सरवरला कोपच्यात घेऊन मीच अध्यक्ष होणार हे 'समजावून' सांगून पुढची दोन वर्षे त्याला देऊन टाकली. पण गोष्ट ती नाही, तर गोष्ट आहे... प्रेमाची, म्हणजे प्रेमा नावाच्या मुलीची नाही तर इंग्रजीत क्रश ज्याला म्हणतात त्या प्रेमाची! तसं माझं अनेक मुलींवर प्रेम बसलं (आता प्रेम उभं टाकलं हे म्हणता येत नाही म्हणून नाहीतर ते ही म्हटलं असतं) पण त्यातल्या त्यात हे आगळंवेगळं, गणपती प्रेम. आणि म्हणून सांगण्याचा उपद्व्याप.
पहिल्यांदा घरात गणपती बसवायचा हट्ट धरला तेव्हा आम्ही भावंडं सात-आठ वर्षांची असू. त्या आधी का कुणास ठाऊक, पण आमच्या घरात गणपती बसवण्याची प्रथा नव्हती. दादांनी या गोष्टीला आधी नाही म्हणून पाहिलं. त्यामागचं कारणही तसंच होतं.
एखादा दिवस असा उगवतो की त्या दिवशी घडणार्या सगळ्याच गोष्टींना एक विशिष्ट संदर्भ असतो. योगायोगच तो.. पण होतं खरं असं.
त्या दिवशी ऑफिसात आले. रीतसर स्थानापन्न वगैरे होऊन कॉम्प्युटर चालू केला. इन्बॉक्सात पडलेल्या खंडीभर मेलींपैकी त्या एका मेलीने माझे लक्ष वेधून घेतले... 'दिनूचे बिल'. काहीतरी लख्खकन् मनात चमकून गेले. इतर कामाच्या मेलींकडे दुर्लक्ष करून सगळ्यात आधी तीच मेल उघडली.