दवंडी २ : मायबोली गणेशोत्सव २०११

Submitted by संयोजक on 18 August, 2011 - 23:29

davandi2_0.jpg

*******************************************************************************************

पेंद्या : काय किस्नद्येवा! आजकाल दिसंना झाले तुमी गायी वळाया! लयी बिजी झाला जनू!

कृष्ण : मग! मला बोलावणं आलंय मायबोलीनगरीत साजर्‍या होणार्‍या गणेशोत्सवासाठी! तयारी करतोय जोरदार!

पेंद्या : बघु बरं... आँ! आरं वा, वा, वा, हे "आवताण... लै वरताण" आहे म्हनायचं की! साक्षात किस्नद्येवाला आवताण धाडलं म्हंजी कायतरी जंगी स्पर्दा व्हनार! बरं पन द्येवा, तुमी काय करनार तितं जाऊन? न्हायी, म्हंजे तितं "तुझ्या गळा... माझ्या गळा..." कराया बलरामदादा नसतील की बाकी गोप-गोपी ... म्हून इचारलं!

कृष्ण : अरे, भरपूर कार्यक्रम आहेत तिथे, पण खास करून हे मायबोलीकर "ज्योतीने तेजाची आरती..." करणार आहेत ना, ती बघायची आहे आम्हाला!

पेंद्या : द्येवा, काय गरीबाची मस्करी करताय व्हय! अवो दिव्याशिवाय नुसत्या ज्योतीनं आरती हुईल का?

कृष्ण : तू माझ्याबरोबर चल कसा मायबोलीनगरीत! इथे बसून नुसते प्रश्न विचारू नकोस मला...

**********************************************************

टीप : कार्यक्रम आणि स्पर्धांचे विषय आणि नियम बघण्याकरता निळ्या शब्दांवर जाऊन टिचकी मारा.
**********************************************************

विसरू नका!
स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांव्यतिरिक्त, बाप्पाकरता तुम्ही स्वतः गायलेली गाणी, श्लोक, आरत्या, भजनं, रेकॉर्ड केलेल्या कॉलनीतल्या गणेशाच्या आरत्या.... आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा.

सगळे तुमच्या घरातल्या बाप्पाच्या दर्शनाकरता आतूर आहेत. त्यामुळे घरच्या गणपतीचे फोटो, आरास, नैवेद्यांची प्रकाशचित्रे आणि कृती आम्हाला जरूर पाठवा. आपल्याला काही खास चित्रं पाठवायची असतील, वेगवेगळ्या अपरिचित गणपतींची ओळख करून द्यायची असेल तर स्वागत आहे.

तुमच्या गावातील, शहरातील, परदेशातील या वर्षीच्या गणपतीबाप्पांचे फोटोही सगळ्यांना बघायला नक्कीच आवडतील.

हे सर्व आम्हाला sanyojak@maayboli.com वर पाठवा.

**********************************************************

दवंडी १ : मायबोली गणेशोत्सव २०११

**********************************************************
आगामी आकर्षण : राजा-प्रधानजी प्रवेश

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार मंडळी, आजच्या गोपाळकाल्याच्या मुहूर्तावर हा "किस्नं-पेंद्या प्रवेश" तुमच्यापुढे सादर करताना आम्हाला आनंद होत आहे.