राजमाची
Submitted by राज जैन on 6 June, 2012 - 03:31
२००५...जुलै महिना... कर्नाळा अभयारण्याजवळ माझा आणि शामिकाचा बाईकवरून पडून अपघात झालेला. जोरदार पडूनही तिचे फक्त मुक्यामारावर निभावले होते. एस.टी. वाल्याच्या चुकीचे बक्षीस म्हणून मला उजव्या हाताला एक प्लास्टर बक्षीस... महिनाभर विश्रांती घेतल्यावर ऑगस्टमधला हा ट्रेक. मी, अभिजित, हर्षद आणि आशिष असे चौघेजण कर्जत येथील वदप गावावरुन पुढे ढाक गावाजवळ असलेल्या ढाक-भैरीला आणि तिकडून पुढे कुंढेश्वरमार्गे राजमाचीला गेलो होतो. मोजून २ दिवस आधीच माझ्या उजव्या हाताचे प्लास्टर निघाले होते.