आज शिवजयंती. १९ फेब्रुवारी २०२६. वर्दळीपासून थोडा दूर व मोजकेच दुर्ग प्रेमी व पर्यटक जात असलेल्या लोणावळ्याजवळील राजमाची दुर्ग पाहण्यास निघालो. मुंबईला जाताना जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर खंडाळ्याचा घाट सुरु होताना राजमाची पॉर्इंट आहे. येथून समोर नजर टाकल्यावर एकाला एक लागून दिसणारी शिखरे म्हणजेच हा राजमाची किल्ला. लोणावळ्यापासून खंडाळाच्या दिशेने जाताना (उजव्या हाताल) कुणे नामा या गावाचा फाटा लागतो. हाच रस्ता पुढे राजमाचीला जाण्याचा मार्ग आहे.
२००५...जुलै महिना... कर्नाळा अभयारण्याजवळ माझा आणि शामिकाचा बाईकवरून पडून अपघात झालेला. जोरदार पडूनही तिचे फक्त मुक्यामारावर निभावले होते. एस.टी. वाल्याच्या चुकीचे बक्षीस म्हणून मला उजव्या हाताला एक प्लास्टर बक्षीस...
महिनाभर विश्रांती घेतल्यावर ऑगस्टमधला हा ट्रेक. मी, अभिजित, हर्षद आणि आशिष असे चौघेजण कर्जत येथील वदप गावावरुन पुढे ढाक गावाजवळ असलेल्या ढाक-भैरीला आणि तिकडून पुढे कुंढेश्वरमार्गे राजमाचीला गेलो होतो. मोजून २ दिवस आधीच माझ्या उजव्या हाताचे प्लास्टर निघाले होते.
गेल्यावर्षी तुफान पावसात दिवेआगर, श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर अशी बाईक ट्रिप केली होती. तेंव्हाचे काही फोटो...
१.

२.