जन्म मृत्यु दाखला ऑनलाईन कसा मिळवातात?
१९८० पुर्वीचा एक मृत्युचा दाखला कॉर्पोरेशनमधे एका अर्जाबरोबर जोडायचाआहे. तो आमच्याकडे उपलब्ध नाही. तो कसा मिळवतात? ऑनलाईन मिळणार आहे अशी बातमी नुकतीच वाचण्यात आली होती.
१९८० पुर्वीचा एक मृत्युचा दाखला कॉर्पोरेशनमधे एका अर्जाबरोबर जोडायचाआहे. तो आमच्याकडे उपलब्ध नाही. तो कसा मिळवतात? ऑनलाईन मिळणार आहे अशी बातमी नुकतीच वाचण्यात आली होती.
धार्मिक धंदा,...?
भक्तांना मोहात पाडण्या
हवी तितकी हळवी आहे
अंधश्रद्धेनं बळावलेली ही
निव्वळ भुलवा-भुलवी आहे
धर्माच्या नावानं धंदा करणं
हा प्रकार काही नवा नाही
कसं सिध्द कराल की हा
नौटंकी प्रकार कावा नाही
एकामागुन एक प्रकारही
आता समोर येऊ लागले
अन् स्वयंघोषित धर्मगुरू
स्वयंदुषित होऊ लागले
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
व्हाटस्अप इफेक्ट
व्हाटस्अपच्या अति वापराने
कौटुंबिक संबंध चिरू लागले
अन् घटस्फोटांना कारणीभुत
म्हणे व्हाटस्अप ठरू लागले
प्रत्येकाच्या पाहण्याचे दृष्टीकोण
कुठे राइट कुठे लेफ्ट जात आहेत
अन् ज्याच्या त्याच्या वापरानुसार
व्हाटस्अप इफेक्ट होत आहेत
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
काल संध्याकाळी नेहमीप्रमाणे ऑफिसमधून निघाले. थोडा वेळ होता म्हणून नरिमन पॉईंट ते व्हीटी चालत आले. कुर्ला स्टेशनवर उतरून भाजी घेण्यासाठी बॅगमध्ये वॉलेट शोधू लागले तर वॉलेट गायब. मी ट्रेनमध्ये दरवाज्याजवळ उभी राहते आणि बॅगवर कायम लक्ष ठेवून असते त्यामुळे बॅग मधून काढणेही कठीण होते. ऑफिसमध्येच राहून गेले असावे म्हणुन ऑफिसमध्ये फोन केला तर त्यांनी डेस्क वर काहीच नाहीये असे सांगितले. म्हणजे ते ड्रॉवर मध्ये राहिले असावे असा विचार मनात आला. पण कदाचित तिथे नसेल तर , मी बँकेत गेले होते तिथे तर राहिले नसेल ना, त्यानंतर ऑफिस समोरच्या फूड जॉइंटवर इडली खाल्ली होती तिथे विसरले असेन तर...
"बजरंगी भाईजान" ने प्रेरीत होऊन त्याचा मराठी रिमेक बनवायचे एका मराठी चित्रपट निर्मात्याने घोषित केले आहे.
चित्रपटाचे नाव "मारुती भाऊ" असे असेल आणि मुंबईत हरवलेल्या पुणेकर मुलीला एक मुंबईकर कशी मदत करतो हे दाखविले जाईल.
पुण्यात मुलीला सोडताना त्याला ज्या अडचणी येतात, जसे की तुसडेपणाने बोलणारे पुणेकर, पत्ता विचारल्यावर तोंड वाकडं करणारे पुणेकर अशा अनेक अडचणी दाखविल्या जातील.
याशिवाय एक विशेष साहस द्रुष्य असेल ज्यात सिग्नल तोडुन नो एन्ट्री मधे घुसणार्या एका पुणेकराच्या दुचाकी पासुन मारुती भाऊ त्या मुक्या मुलीला वाचवतो.