न्याय

Submitted by दत्तात्रय साळुंके on 30 January, 2025 - 00:06

ख-याचं भांडण खोट्याशी होतं, तेव्हा
खरं समजावण्याची पराकाष्ठा करतं
ख-याकडं भक्कम पुरावा कुठंय
म्हणून खोटं काही मानत नसतं

एक काळा कोटवाला खोट्याला कडेवर घेतो
मीच खरा कायद्याचा रक्षक ठणकावून सांगतो
खरं गुडघे टेकत न्यायाची याचना करतं
पण न्याय आंधळा असतो

भकास, उदास,वाकलेलं, क्षीण सत्य ताटकळत कोर्टाच्या अंगणात
“मेरी बारी आयेगी” असं मनाला बजावत
संवेदनाहीन, निर्ढावलेल्या कायद्याच्या नजरा
निराश, हताश, उपाशीपोटी सत्य सायंकाळी घरात

सरतात, दिवस, महिने, वर्ष चिंतेत, सत्य वयस्कर होतं
फाटतात खिसे धुर्त वकीलांच्या आश्वासनात

निर्णायक क्षणाचा दिवस उगवतो
सत्य खुरडत कोर्टात पोहचते
न्याय देवतेला नमन करून बसते
कुणीही बसायच नाही एक रुक्ष, आंधळा आवाज
वाकलेल्या पायावर उतारवयीन आशा, टवकारलेले बहिरे कान

गंजले ओठ थरथरतात
परंपरागत हाच रिवाज
“जिसकी लाठी उसकी भैस”

© दत्तात्रय साळुंके
३०-१-२०२५

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार दसा.
खूप कालावधी नंतर एक घणाघाती कविता घेऊन आलात.
गरीब लोकाना जगण्याचा अधिकार नाही. हे विदारक सत्य, विचार करायला भाग पाडणारी कविता.

वॉव!!! इन्टरनॅशनल लेव्हलची अप्रतिम कविता आहे. मी सत्य सांगते आहे. उपमा/उपमेय/उपमान. सर्व मस्त आहे.

सामो,
ममो,
केशवजी,
कुमार सर

अनेकानेक धन्यवाद...

सामो कौतुक पोहचलं... खूप आभार,
केकू...कथा सुंदर आहे... धन्यवाद