बहर गझलेचा उचलला, अन् हझल झाली!

Submitted by चैत रे चैत on 3 December, 2012 - 13:58

सतीश देवपूरकरांच्या गझलेतले काव्य आम्ही रिचवले, अन् हझल झाली...

हझल

बहर गझलेचा उचलला, अन् हझल झाली!
अर्थ शेरांचा बिघडला, अन् हझल झाली!!

केवढ्या सहजीच आली चाल हाताशी;
काफिया नुसता मिळवला, अन् हझल झाली!

चिंतनाची बात नाही, मौत प्रतिभेची!
कळफलक नुसता बडवला, अन् हझल झाली!!

दाद देण्या येत नाही कोणिही दर्दी!
मीच मग डंका पिटवला, अन् हझल झाली!!

ते गझलसम्राट अन् मी एक हा कवडा!
प्रत्येक शेरा फाडला, अन् हझल झाली!!

खर्चिली मी खेचण्यासाठीच ही शाई
कंडरोगा त्या शमवला, अन् हझल झाली!

अडकली कोठेच नाही आमुची गाडी.......
काव्यरस फुकटी मिळवला, अन् हझल झाली!

काय 'चैत्या' ही तुझी का रीत लिहिण्याची?
चोर तू ऐसा जाहला, अन् हझल झाली!!

-------प्रा. हझला भरपूरकर
दररोजी (हझला) पाडूया महाविद्यालय.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विडंबन वृत्तातही करा. बाकी बकवास बास करा. देवपूरकरांच्या काही सिरियस गझला किती दर्जेदार आहेत याचा विचार न करता निव्वळ त्यांच्या प्रकाशनाच्या संख्येवर जाऊ नका.

(बाकी प्रोफेसर साहेबांनीही 'अर्क' गझलाच प्रकाशित करायला हव्यात).

चैत रे चैत - सॉरी! पण हे विडंबन अगदीच हास्यास्पद झाले आहे.

>>देवपूरकरांच्या काही सिरियस गझला किती दर्जेदार आहेत याचा विचार न करता निव्वळ त्यांच्या प्रकाशनाच्या संख्येवर जाऊ नका.

अहो बेफ़िकीर, एवढे रागावता कशाला? प्रोफेसरांच्या बर्‍याच गझला आहेत आणि त्यांपैकी अनेक चांगल्या आहेत हे आम्हाला ठाऊक आहे. त्या तशा आहेत म्हणूनच वाचल्या जातात; आणि ज्या वाचल्या जातात त्यांचेच तर विडंबन केले जाते, नाही का? अहो, मूळ गझलच जर वाचली गेली नाही तर विडंबनाकडे कोणी ढुंकून तरी पाहील का?
केशवकुमारांनी ज्या कवितांचे विडंबन केले त्या वाईट होत्या का? पण विडंबन केलेच ना? अर्थात, त्यांच्या विडंबनांची सर आमच्या विडंबनांना येत नाही हे नम्रपणे मान्य करतो. आम्ही 'कवडा' आहोत हे आम्ही ह्या हझलेत मान्य केले आहेच!

>> (बाकी प्रोफेसर साहेबांनीही 'अर्क' गझलाच प्रकाशित करायला हव्यात).

सहमत.

>>चैत रे चैत - सॉरी! पण हे विडंबन अगदीच हास्यास्पद झाले आहे.

अहो, सॉरी कशाला? पसंत अपनी अपनी. Happy

आपला प्रतिसाद पाहून आम्हाला अतीव आनंद झाला आणि आमची 'दाद देण्या येत नाही कोणिही दर्दी!' ही तक्रार अनाठायी वाटायला लागली.

जाताजाता - आपला वृत्ताबद्दल असलेला आक्षेप नीटसा कळला नाही. (पहिल्या द्विपदीत आता बदल केला आहे. बहुतेक त्याबद्दलच असेल असे वाटते. चूभूद्याघ्या)

चैत रे चैत पहिलेच लेखन प्रकाशित करत आहात अभिनंदन व पुलेशु

हझल (?) मलाही नाही आवडली कारण एकच हझल ही मुळात एक गझल असते( निदान आकृतीबन्ध पाळायलाच हवा!!) . तुमच्या रचनेत जमीनच नाही आहे अनेक शेरात काफियाच नाही आहे . मूळ गझलेत 'ला' हे काफियाचे शेवटचे अक्षर व त्या आधीच्या अक्षरावर अ ही अलामत येते.

असे करू शकता ............

योग्य(??) "पर्यायी" सुचवला अन् हझल झाली
अर्थ गझलेचा बिघडला अन् हझल झाली

धन्स
पुलेशु

वैभवराव,

मार्गदर्शनाबद्दल आपले मनापासून आभार. गझलेबद्दल माझे ज्ञान हे बिग्रीतलेच. तुम्ही सांगितल्याप्रमाणे काफिया आणि अलामत सांभाळायचा प्रयत्न केला आहे. मूळ गझलेत बदल देखील केले आहेत.

आमच्या पदार्पणात बेफ़िकीररावांनी एकदम तोफच डागली की आमच्यावर; नाही म्हटले तरी थोडेसे बावचळलोच.

आपला आक्षेप कळला, अन् हझल झाली
अर्थ 'जमिनी'चा उमगला, अन् हझल झाली