टुकारघोडे! (हझल)

Submitted by अभय आर्वीकर on 10 March, 2012 - 09:16

टुकारघोडे! (हझल)

 उगाच पिळतोस रे मिशा तू, कडमडणे हा विकार आहे
तिच्या खुट्याला तुझ्याप्रमाणे टुकारघोडे हजार आहे

कशी बघा चालते कचेरी, अशी जशी की दुकानदारी
अनाथ सोडून कायद्याला, विधानमंडळ फ़रार आहे

बघा जरा हो बघा जरासे कसा भामटा फ़ुगून गेला
मुरूम-गिट्टी अमाप खातो, तरी न देतो डकार आहे

गमावतो ना कधीच संधी हपापलेला विचित्र प्राणी
डसून लचकेच तोडण्याचा ठरून त्याला ’पगार’ आहे

कुठून आणू नवीन गजरा, दुकान शोधू कुठे नव्याने?
सरून पर्याय सर्व गेले, जुनीच देणी उधार आहे

नकोस मित्रा मला जळू तू, अता न सामान्य राहिलो मी
कितीतरी जाड पुस्तकांचे लिखाण माझे तयार आहे

अम्हांस नाही कुठेच सत्ता, कुठेच नाही "अभय" पदांचे
लबाडवंशात जन्म ज्यांचा, तमाम त्यांचा पुढार आहे

                                                    - गंगाधर मुटे
--------------------------------------------------

गुलमोहर: 

ठिकठाक!!

फ़िरोजघरचे गिधाड-कुत्रे, नेमून येथे हुशार आहे>>> वृत्तात गडबड आहे

>>"तमाम सारे " एकाच अर्थाचे दोन शब्द आहेत, हो ना
होय, पण द्विरूक्तीमुळे योग्य परिणाम साधला जातो. उदा. सर्व सर्व विसरू दे, गुंतवू नको पुन्हा

"तिच्याच घरचे लबाडकोल्हे, तमाम सारे हुशार आहे".... ह्या ओळीत "तमाम सारे " या द्विरूक्तीमुळे "सर्व सर्व विसरू दे, गुंतवू नको पुन्हा " या ओळी इतका योग्य परिणाम साधला आहे .... या तुमच्या मताचा आदर आहे महेश राव .. धन्यवाद !!!

एकूण एक, सर्वच्या सर्व, तमाम, बंद्या, नावकूल, नावनाव, सप्पा, पुर्‍या, इतक्याही, संपूर्ण, सगळ्याच आणि समस्त प्रतिसादकांचे अतिप्रचंड आभार! Happy

महेश,
धन्यवाद ...!

<<"तिच्याच घरचे लबाडकोल्हे, तमाम सारे हुशार आहे">>

हा शेर बदलला आहे.

हीच हझल मी सातव्या अ.भा.गझल संमेलन, आष्टगावच्या मुशायर्‍यात सादर केली होती. Happy

फार छान...आवडली

सामाजिक अस्वास्थ्य आणि सरकारी अनास्थे बद्दल व्यक्त होणारी वेदना पोहोचते आहे.............

गजल सागर प्रतिष्ठान तर्फे मोर्शी तालुक्यातील आष्टगाव (जि. अमरावती) येथे उभारलेल्या सुरेश भट गजलनगरीत दि. ९ आणि १० फेब्रुवारी २०१३ रोजी सातव्या अखिल भारतीय गजल संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
या संमेलनात संपन्न झालेल्या गझल मुशायर्‍यात मी हीच हजल सादर केली होती.

त्याची चित्रफ़ित येथे पाहता येईल.

आणि वृत्तांत येथे