सखी

कविता -'सखी '

Submitted by Dr.ShubhanginiM... on 27 April, 2023 - 04:12

"सखी"

उड्या मारत चिऊताई अंगणात आली .
अन म्हणाली ,
उरले नाही मला घरदार .
जागा शोधुन मी दमले फार.

झाडं नाहीत की जंगल नाही .
घर बांधायची काही सोयच नाही .

छोटीशीच जागा शोधली प्रयत्नाने ,
त्यावरही कब्जा केला त्या 'काळ्या ' कावळ्याने .

कधी मिळते ,
पण गावापासून फार दूर असते.
दाणापाणी जमवून आणताना जीवाला फार दमवते .

कधी बांधकामाच्या साईटवर मिळतो एखादा कोपरा .
मात्र ,मजूर उचलून फेकतात घराला, समजून कचरा .

शब्दखुणा: 

असा सूर लागे जसा श्वास घेतो

Submitted by पुरंदरे शशांक on 6 February, 2023 - 04:50

असा सूर लागे जसा श्वास घेतो

असा सूर लागे जसा श्वास घेतो कळेना तरी दैवी की लाभला
सदा अंतरींच्या जशा सप्त तारा विशेषे तिन्ही सप्तका लागल्या

मना मोहवी, दुःखही मोह घाली असे सूर स्वर्गीय कोंदाटले
लडी रेशमाच्या वरी कर्णद्वारी ह्रदी येत ते सौख्य सामावले

अभिसारिका ती कधी विद्ध होई सखा पाहुनी लाली गालावरी
कधी साद घाली जरी ईश्वराला तरी दाह भावे इथे अंतरी

असे भाव सारे सुरा गुंफुनिया रसिका मनी सौख्यदा जाहले
पियूषा परी ते सदा निर्मळाचे शशी सूर्य तारे तसे नांदले

सखी

Submitted by जे.डी._भुसारे@y... on 30 December, 2014 - 05:32

॰ सखी ॰

तू ठुमकत येताना,
हिरवा बांधही गर्द होतो.
तुझ्या नगमोडी चालीने,
मी ही आनखीनच मर्द होतो.

तु शेतातून चालतेस तेंव्हा,
शेतातली पिकेही डोलतात.
अंबराईतले पोपटही मग,
एकमेकांना हळूच बोलतात.

पाठीमागून तू चालत होतीस,
तुझी बांगडी जराशी वाजली.
तू पटकन वळून पाहीले तर,
झाडावर कबुतरांची जोडीही लाजली.

नदी काठी तू नजरेला नजर भिडवली,
तेंव्हा डोळ्यातून अश्रू गालावर ढळले.
तुला नजरेच्या भाषेतून काय सांगायचयं,
ते माझ्या आधी नदीलाही कळले.

परवा बालकवींच्या कवितेतल्या सारखा,
ऊन असतानाच धो धो पाऊस आला.
तुझ्या आणि माझ्या शेतासह,
सर्व शिवार ओलाचिंब झाला.

शब्दखुणा: 

अजूनही त्याच्या आठवणी

Submitted by विजय२००६ on 7 August, 2011 - 00:33

गेला श्रावण मला खूप सुखावून गेला
कारण माझ्याही नकळत
‘ तो ‘ माझ्या आयुष्यात आला.

तो आला माझ्या आयुष्यात
तेव्हा कळलं
यालाच प्रेम म्हणतात.

मग मी वहातच गेले
प्रवाहासारखी खळाळून गात गेले

मी विचारलं त्याला, ” आपण कोण आहोत ?”
तो म्हणाला, ” आत्मा एक असलेली
वेगवेगळ्या ठिकाणी धडधडणारी दोन हृदयं.”

मग आम्ही दोन हृदयांना एक करण्यासाठी धडपडलो
वेळ पडली तेव्हा प्रवाहाच्या विरुद्धही पोहत गेलो.

मग लाभला आयुष्याला एक नवा सूर
कधी आनंदाचा पूर
कधी विरहाची हुरहूर

चिवचिवणारे पक्षी, आभाळातली नक्षी
वाटलं निसर्ग आपल्या प्रेमाला साक्षी……..
……………..
………………

गुलमोहर: 

वाढदिवसाची भेट

Submitted by प्रज्ञा९ on 29 April, 2011 - 16:24

सखी,

तुझा वाढदिवस जवळ आलाय. खरंतर वाढदिवस म्हणून काही विशेष सेलिब्रेशन केल्याचं नाहीच आठवत. माझ्या वाढदिवशी तू माझ्या घरी यायचं, तोवर मी नवीन ड्रेस घालून तयार रहायचं, मग आपण दोघी आजोबांकडे जाऊन त्यांना नमस्कार करून तसंच पुढे समुद्रावर जायचं. तिथे भेळ घ्यायची, आणि जरा वेगळं काही म्हणून एखादं आइस्क्रीम! झाला वाढदिवस!

आणि तुझा वाढदिवस तर बरेचदा पुण्यातच व्हायचा. म्हणजे तू पुण्यनगरीत, नि मी रत्नागिरीत. मी पेपर झाले म्हणून सुटीच्या उद्योगात, तर तू एक मोठी परीक्षा संपली तरी टि.म.वि. च्या संस्कृतच्या परीक्षेत गर्क!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सखी

Submitted by भैरवी on 25 February, 2011 - 09:20

न मागताच देतो जिला आपण
कान धरण्याचा हक्क
कान धरला जरी तिनें
तिच मनातलं स्थान पक्क
ती असते मनाच्या जवळं
मागत नाही फुकाचा मान
अवचित येतो तिचा फोन
अन आपला दिवस जातो छान
तिच्याशी वागताना आपण मोकळ्याचाकळ्या
करतं नाही फारसा विचार
तिच्याशी वागताना लागु नसतात
कुठ्ल्याच आचारसंहितेतले आचार
क्वचित कधीतरी ती ही
रागावते अन रूसून बसते
पण होताच पुन्हा नजरानजर
सारं विसरुन हळुच हसते
खरतरं आपल्या आईच्या पोटी जन्मलेली

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सखी गं

Submitted by तुषार जोशी on 28 January, 2011 - 22:26

तुझे काळे काळे रूप
मला आवडते खूप
तुझ्या रंगात साठली गुंगी गूढ
सखी गं सखी गं सखी गं

तुझ्या रूपाचा प्रभाव
जाणवतो चारी ठाव
काळ्या सावळ्या रंगास किती ओढ
सखी गं सखी गं सखी गं

तुझे असणे केवळ
करी जगणे प्रेमळ
तुझे नसताना आयुष्य अगोड
सखी गं सखी गं सखी गं

तुझे बोलणे लाघवी
रोमारोमात पालवी
तुझे लाजणे जिवास लावी वेड
सखी गं सखी गं सखी गं

(सावळ्या मुलीची गाणी / तुषार जोशी, नागपूर)

गुलमोहर: 
Subscribe to RSS - सखी