गुरुत्वाकर्षण...

Submitted by मी मुक्ता.. on 3 April, 2013 - 02:03

तुझ्यापासून वेगळं झाल्यावर,
या अनंत असीम अवकाशात,
आत्ता कुठे मला मिळू लागलाय,
माझा वेग, माझा केंद्रबिंदू, माझी कक्षा...
आता एक ठरवून घेऊ,
तू तुझ्या केंद्रकाभोवती आणि मी माझ्या केंद्रकाभोवती,
आपापल्या कक्षेत फिरत राहू,
एकमेकांचे मार्ग न छेदता..
तरच माझं भ्रमण पूर्ण होऊ शकेल,
कसंय ना,
तुझं गुरुत्वाकर्षण आहेच इतकं जबरदस्त की,
माझी कक्षा मी जरा जरी सोडली,
तर पुन्हा तुझ्यात कोसळण्याखेरीज,
पर्याय नाही राहणार मला....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख

केंद्र, कक्षा, गुरुत्वाकर्षण इ. प्रतिमांचा छान वापर.
शेवट मस्तच.
----------------------------------------------------------------------------------------

शब्दांची थोsssडीशी काटछाट आणि किंचित पुनर्रचना;
कविता अधिक सफाईदार आणि प्रभावी करू शकेल असे वैम. कृगैन.

सर्व प्रतिसादकांचे आभार.. Happy

उल्हास भिडे,
Happy गैरसमज कसला, नक्की विचार करेन आपल्या प्रतिसादावर.. धन्यवाद..

सुरेख !!

छान

आवडली
टेक्निकल डीटेलीं ग जरा गडबडल्यासारखे वाट्ते आहे पण नक्की कुठे तेही लक्षात नाही येत आहे (वैयक्तिक मत)

आवडली
टेक्निकल डीटेलींग जरा गडबडल्यासारखे वाट्ते आहे पण नक्की कुठे तेही लक्षात नाही येत आहे (वैयक्तिक मत)

योगुली, विक्रांत, मोल,
खूप खूप आभार.. Happy

वैभव,
टेक्निकल डीटेलींग जरा गडबडल्यासारखे वाट्ते आहे पण नक्की कुठे तेही लक्षात नाही येत आहे>> तार्‍यापासून वेगळं होऊन बनलेल्या ग्रहांना त्यांचा वेग, कक्षा, केंद्रक लगेचच मिळतं. त्यात वेळ होत नाही. होणं शक्यही नाही. तिथे वेळ झाला तर एकतर ते कक्षेबाहेर जातात किंवा पुन्हा आत ओढले जातात..
"आत्ता कुठे मला मिळू लागलाय...." या वाक्यात आहे ती तुम्हाला जाणवणारी गडबड.. Happy
पण काव्यनिर्मितीसाठी भौतिकाचे नियम जरा बाजूला ठेवले.. Wink

विजय,
Happy तेवढाच एकमेव पर्याय उरतो तसंही...

होय !
पण म्हणजे की ...<<मी माझ्या केंद्रकाभोवती >>> इथेही जरा अवघड्लो मी <<मी तुझ्याभोवती>>> असे हवे माझ्यामते
पृथ्वी स्वतःभोवतीही फिरतेच तेव्हाही त्या कक्षेस एक केंद्र असतेच मग अशावेळी तारा-ग्रह या गुरुत्वाकर्षणाचा(कवितेचा विषय) संबंध फारसा लागत नाहीये /भरकटतोय

अजून एक ..
<<<<आपापल्या कक्षेत फिरत राहू,
एकमेकांचे मार्ग न छेदता..>>>>>>

इथे तारा- सूर्य पृथ्वीची कक्षा छेदू शकणार नाही हे उघड आहे कारण तो तिच्यालेखी स्थीर आहे पण पृथ्वी तिच्या प्रवासात असे अवकाशबिंदू छेदू शकत असेल का की ज्यावरून सूर्याने आपला प्रवास केला असेल / करणार असेल हा पॉइंट जरा तपासावा लागेल

तुम्ही म्हणताय तशा कक्षा न छेदता असे फिरत राहणे हे संयुगे तयार होताना दोन अणुमधील जे ईलेक्ट्रॉन्स दोनही अणूंची वॅलंसी पूर्ण करतात त्यांच्या बाबत असू शकते की ज्यांच्या कक्षा त्या सूक्ष्मावकाशाच्या भिन्न प्रतलात आहेत (इथेही गुरुत्वाकर्षण असतेच)

अजून एक :<<<<तुझं गुरुत्वाकर्षण आहेच इतकं जबरदस्त की,.........................>>>>
ते आसतानाच इतके जबरदस्त ते असेल तर आधीच ती त्याच्यात कोसळायला हवी होती
जेंव्हा दोन वस्तू एकमेकापासून ठराविक अंतरावर अशा गुरुत्वाकर्शणामुळे थांबतात तेंव्हा त्या दोहोंचे बल समान्तेच्या पातळीवर असते मग अंतस्थ ऊर्जेमुळे त्या जास्तीत जास्त अशा कक्षेत फिरत राहण्यावाचून वेगळे काही करू शकत नाहीत

माझ्या अभ्यासात काही चुका आढळल्यास क्षमस्व
चूक भूल द्यावी घ्यावी

~वैवकु:)

छान...

कविता आवडली!
एक अनाहूत सल्ला, कुणालाही कसलीही स्पष्टीकरणे देत बसू नकोस आणि प्रतिसादावर विचार तर अजिबात करु नकोस (ह्या प्रतिसादावरही!!!), इट्स नॉट वर्थ इट.