PIFF 2013 - Movie reviews in short..

Submitted by मी मुक्ता.. on 17 January, 2013 - 07:01

दर वर्षीप्रमाणे या वर्षीही आलेला स्पेशल वीक. थंडीसोबत लागणारे वेध आणि येणारं स्पेशल फिलींग. रोज सकाळी उठून उत्साहाने हव्याहव्याश्या काळोखात शिरायचं जिथे एक पूर्णतं अनोळखी जग माझ्यासाठी उभं असायचं.. दर वर्षी वाटतं की हे कधी संपूच नये आणि मग तरी ते एक दिवस संपतं.. ह्म्म.. असो..

नेहमीप्रमाणेच या वर्षीचे काही प्रयोग फसले काही यशस्वी झाले. त्या सगळ्याच म्हणजे या वर्षीच्या पिफमध्ये पाहिलेल्या चित्रपटांचा हा थोडक्यात रीव्हू..

Kamr Palm (kaf elqamar) - Egypt

चित्रपटाचं रेटींग खूप चांगलं होतं ते बघून म्हटलं महोत्सवाची सुरुवात यानेच करावी पर बात कुछ जमी नही. आपल्याकडे बॉलीवूडमध्ये असले खूप सिनेमे बघितल्यामुळे असेल. दिग्दर्शकाने कथा थोडी घुमवून सांगितल्यामुळे चित्रपट बघितला जातो कारण कथेमध्ये काहीच नवीन नाहीये. विधवा आई (आमिर), तिची ५ मुलं (मुलगे) एका खेड्यात रहात असतात. त्यांच्या वडिलांचं स्वप्न असतं की घर बांधावं. मग आईची फारशी इच्छा नसतानाही मुलांना शहरात पैसे कमवायला जायची परवानगी देते आणि मोठ्या भावावर सगळ्यांना एकत्र ठेवायची जबाबदारी. मग एक एक भाई का बिछडना और माँ के अंतिम समय मे पास आना.. भारी अभिनय आणि मांडणी पण मस्ट वॉच नाही.

The last step (Pele Akher) - Iran

गेल्या वर्षी सेपरेशन आणि या वर्षी लास्ट स्टेप बघून इरानी चित्रपटांविषयी आणि खासकरुन इरानी दिग्दर्शकांच्या बुद्धीमत्तेविषयी कौतुक वाटायला लागलं आहे.. सुंदर चित्रपट. कथा, मांडणी, अभिनय.. सगळंच सुंदर. ज्या पद्धतीने कथा उलगडत जाते ते पहाणे तर फारच सुंदर. इथे कथेविषयी काहीही सांगुन मजा नको घालवायला.. मस्ट वॉच.

The tortoise, an incarnation (Kurmavatara) - India

या चित्रपटाविषयी काय बोलावं.? बोलू तेवढं कमीच. गांधी कोणाला किती आणि कसे समजले हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण खरा प्रश्न आहे तो गांधी आचरणात आणण्याचा. वेगवेगळ्या विरोधाभासांनी भरलेल्या या काळात गांधीवादही कसा सोयीस्करपणे वापरला जातो त्यावर मार्मिक भाष्य करणारा हा चित्रपट. गांधींना TRP मध्ये मो़जणे, गांधी झालेल्या माणसाचे त्याच गेट अप मधले सामान्य वागणे. नक्की बघावा असा चित्रपट..

The delay ( LaDemora) - Uruguay, Mexico, France

ठिक ठाक चित्रपट. साधीशीच कथा. तशीच मांडणी. उत्पन्न फारसे नसलेल्या एका मध्यमवयीन बाईवर ३ मुलांची आणि अल्झायमर्स झालेल्या म्हातार्‍या वडिलांची जबाबदारी. रोजच्या त्रासाला कंटाळून वडिलांना वृद्धाश्रमात सोडायला जाते पण तिथे निराधार नसल्यामुळे घेत नाहीत. बहिण वडिलांची जबाबदारी घ्यायला तयार नसते. आणि विचारांच्या अशाच गोंधळात ती त्यांना अनोळखी रस्त्यावर सोडून येते. मग त्यांचं हट्टाने तिथेच तिची वाट पाहत थांबणं आणि तिनेही अस्वस्थ होऊन त्यांना न्यायला परत जाणं.. Thats all the movie is about.

Rose ( Roza) - Poland

दुसर्‍या महायुद्धाच्या काळातला चित्रपट. महायुद्ध काळातील sexual atrocities and mental harassment चं चित्रण अंगावर शहारे आणणारं. इतकी वर्षे उलटून पण ती जखम कायम का भळभळत राहते हे नव्याने जाणवतं असे चित्रपट बघताना. ऱोझ चा संघर्ष जितका वेदनादायक तितकाच खिळवून ठेवणाराही. वॉर फिल्म्स आवडत असतील तर मस्ट वॉच.

Material (Material) - South Africa

जड जड सिनेमे बघून झाल्यावर मूड हलका करणारा चित्रपट अनपेक्षितपणे मिळाला. The movie gives some genuine laughter. The stand up comedy used is just awesome. फार ड्रामा नाही. क्लायमॅक्स मध्येही काही नौटंकी नाही असा सरळ साधा फॅमिली मूव्ही. Too many references of bollywood, so its feels funny. कधी फॉर अ चेंज काही वेगळ्या प्रकारची कॉमेडी आणि हलका फुलका चित्रपट पहायचा असेल तर नक्की पहा..

The Parade (Parade) - Serbia

समलिंगी व्यक्ती समाजात खुल्या मनाने स्विकारल्या जाणार्‍या संघर्षाच्या काळातील सर्बिया इथला हा चित्रपट. विषय गंभीर असला तरी हलक्या फुलक्या सादरीकरणामुळे चित्रपट जड होत नाही. स्ट्रेट लोकांचा मुळातच समलिंगींकडे बघण्याचा वेगळा दृष्टीकोन आणि एका घटनेच्या निमित्ताने (परेडच्या निमित्ताने) घडलेल्या सहवासाने त्यात होत गेलेला बदल हा कालखंड खूप सुरेख मांडलाय. फक्त असं वाटलं की सगळी कथा कदाचित साधारण १०० मिनिटात बसू शकली असती ती उगीच १२० मिनिटांची केलीये.

Barbara (Barbara) - Germany

दुसर्‍या महायुद्धानंतरच्या काळातील जर्मनीत घडलेली कथा. सुरेख अभिनय, सुंदर कथा. सुरेख मांडणी. बार्बरा च्या अभिनयाला विशेष दाद द्यावी लागेल. शेवटपर्यंतची तिच्या निर्णयातली अनिश्चितता आणि मनातली अस्वस्थता खूपच छान व्यक्त केलीये तिने. प्रत्येक प्रसंगात बार्बरा आणि आंद्रे यांची एकमेकांसोबतची कामाच्या वेळेची ट्युनिंग आणि वैयक्तिक पातळीवरचे संबंध या दोन्ही अवस्था खूपच चांगल्या मांडल्या आहेत. खूप चांगला चित्रपट.

Noor (Noor) - Pakistan

ट्रांसजेंडर व्यक्तींची होरपळ मांडणारा अजून एक चित्रपट. हा पूर्ण बघता नाही आला. पण बघताना सतत 'बोल' ची आठवण येत राहिली. आणि त्याचं दिग्दर्शन याच्यापेक्षा चांगलं होतं असं वाटलं. असो.. पूर्ण न पाहिल्यामुळे फार लिहिणं शक्य नाही.

बालक-पालक,

खूप महत्वाच्या विषयावरचा चांगला चित्रपट. याविषयी फार लिहित नाही. ऑलरेडी सगळीकडेच खूप चर्चा चालू आहे.. Happy

Frozen Silende (Silencio en la nieve) - Spain

खूप सार्‍या अप्रतिम वॉर फिल्म्स पाहण्याचा अनुभव असल्यामुळे की काय पण हा चित्रपट अगदीच सुमार वाटला. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात जर्मन सैनिकांमध्येच घडणार्‍या खूनांची रहस्यकथा आहे. But it neither feels mystery nor a war film. युद्धकाळातलं वातावरण वाटत नाही. म्हणजे पुरेसं वाटत नाही. आणि रहस्यकथा चालू आहे हा परिणाम पण मध्येच नाहीसा होऊन परत कधीतरी परत आल्यासारखा वाटतो. जर्मन सैनिकांमध्ये एका अधिकार्‍याच्या हुकूमावरुन त्यांच्यातल्याच एका सैनिकाच्या बायकोचा बलात्कार केला जातो आणि त्यात गुंतलेल्या ४ सैनिकांना तिचा नवरा मारत असतो. आणि हा मारेकरी कोण हे शोधण्याचे काम एका माजी पोलिस आधिकारी असलेल्या सैनिकावर पडतं. त्याच्या शोधाची ही कथा. Not so good.

Something in the air ( Apra s mai) - France

It is a really good script but director just wasted it. The people you have understanding (or at least idea) of the peculiar political situation and emotional trauma the europian youth was going through in 70's, could understand the script well. Unnecessary detailing ruined the pace of story. कम्युनिस्ट विचारांनी भारवलेला कॉलेजचा तरुण ते एक स्थिर जीवन जगू लागलेला माणूस हे एका विद्यार्थ्याचं रुपांतर अजून खूप चांगलं मांडता आलं असतं. त्या नायकामध्ये काळानुसार होत जाणारे बदल स्क्रीन वर कुठे दिसतच नाहीत. एक ठराविक कालखंड दाखवायचा असतो अशा वेळी वेशभूषाकारांच्या कौशल्याला बराच वाव असतो. पण यात कुठे त्याचा वापर झालेला दिसत नाही. तरीपण कथेसाठी बघावा असा चित्रपट..

The fifth season of the year (Piata pora roku) - Poland

खूप गोड चित्रपट. हा चित्रपट बघताना गेल्या वर्षीच्या Las acasia ची आठवण झाली. पण ही कथा कितीतरी जास्त सुंदर आहे आणि तशीच मांडलीये. आपल्या नवर्‍याच्या अस्थी समुद्रात वाहण्यासाठी घेऊन चाललेली म्हातारी आणि तिच्यासोबत तिच्याच वयाचा ड्रायव्हर. दोन पूर्णतः भिन्न क्लासमधले लोकं. त्यांच्या सवयींमधला, वागण्या बोलण्यातला फरक पण एकाच पिढीचे असल्यामुळे येणारे काहीसे साधर्म्य याची त्यांची त्यांनाच होत जाणारी जाणिव, हा प्रवास त्यांच्यासाठी आणि प्रेक्षकांसाठीही खूप खास बनवते. अप्रतिम अभिनय. सुंदर चित्रपट..

Araf - Somewhere in between - Turkey

दोन तासाच्या चित्रपटात सगळे मिळून अर्धा तासाचे संवाद आहेत.. बाकी वेळ काही होतच नाही. होतच नाही.. होतच नाही. मी वाट बघत बसलेले की कधी काही होईल चित्रपटात. पण शेवटपर्यंत काही खास होत नाही. नाही म्हणायला नायिकेच्या अ‍ॅबॉर्शन चा प्रसंग अंगावर शहारे आणणारा आहे. पण बाकी चांगलं किंवा वाईट काहीच नाही. एक तरुण मुलगी एका मध्यमवयीन ट्रकवाल्याच्या प्रेमात पडते. तिला प्रेग्नंट करुन तो गायब होतो. तिच्यावर प्रेम करणार्‍या मुलाचा प्रेमभंग. तिचं अ‍ॅबॉर्शन आणि मग तिचं त्या मुलाबरोबर लग्न अशी कथा आहे. कधीच बघितला नाही हा चित्रपट तरी काही बिघडणार नाही. अगदीच सुमार.

Everybody in our family (Toata lumea din famlia noastra) - Romania

एका साध्या कथेवरचा अप्रतिम चित्रपट. एका क्षणासाठीही लक्ष विचलित होणार नाही अशी खिळवून टाकणारी मांडणी आणि अप्रतिम अभिनय. एका घटस्फोटीत जोडप्यातील नवरा, आपल्या मुलीला सुट्टीसाठी घेऊन यायल्या तिच्या आईकडे जातो. Somehow the situation turns violent. आणि मग काय काय घडतं त्याची ही कथा. त्या लहान मुलीसकट सगळ्यांचा अप्रतिम अभिनय.. मस्ट वॉच.

Post tenebras lux - Mexico

Frankly speaking, मला या चित्रपटातलं फारसं काही कळलं नाही. या चित्रपटाला अ‍ॅवॉर्ड वगैरे आहेत म्हणे.. Sad असो.. चित्रपटातली सिनरी फक्त खूप खूप खूप भारीए होती. प्रमाणाबाहेर सुंदर.. आणि चित्रपटातला शेवटचा प्रसंग काहीच्या काही. डोक्यावरचा केस हाताने उपटावा तसा तो माणूस स्वतःच्या मानेपासून डोकं उपटतो आणि मरतो.. yuuuuuk... आत्महत्या करायचे बाकी काही मार्ग नाही मिळाले का. अशा कल्पना सुचत तरी कशा असतील..? :-|

Rust and bone (De rouille et d'os) - France

माशांच्या हल्ल्यांत आपले पाय गमावुन बसलेली डॉल्फिन प्रशिक्षक आणि illegal बॉक्सिंग करणारा नायक यांच्यातलं नातं आणि त्याच वेळी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर या नात्याचा पडलेला परिणाम याची ही कथा. खूप छान चित्रपट. सुरेख अभिनय. का कोण जाणे पण शेवटी 21 grams ची आठवण झाली. मस्ट वॉच..

Hella W - Finland

पुन्हा एकदा WW2 चा काळ. पण ही Hella W ची सत्यकथा आहे. फिनलंड मधली एक यशस्वी व्यावसायिक, राजकारणी, कवयित्री आणि नाटककार.. चित्रपटात वातावरणनिर्मिती खूपच छान केलीये. पार्श्वसंगीत खूप खास. बाकी अभिनय आणि कथा यासाठी मस्ट वॉच आहेच. (सत्यकथा तशाही बर्‍याच प्रमाणात युनिक असतात.)

Laurence anyways - France

PIFF चा शेवट एका चांगल्या सिनेमाने झाल्याचं समाधान मिळालं हा सिनेमा पाहून. 168 min seems too long for any cinema but for the story spanning over 10 years, it was necessary. लॉरेन्स आणि त्याची बायको फ्रेड.. अनेक वर्षे सोबत राहिल्यावर आणि खूप चांगली केमिस्ट्री असतानादेखिल, लॉरेन्स एक दिवस फ्रेड ला सांगतो की त्याला स्त्री व्हायचंय. आणि त्याला हे गेली अनेक वर्षे वाटतय. या नंतरचा १० वर्षांचा काळ या चित्रपटात मांडलाय.. त्याचं आणि फ्रेड चं नातं, त्याचं आणि त्याच्या आईचं नातं, समाजातले संघर्ष अशा अनेक धाग्यांविषयी आहे हा चित्रपट. फ्रेडने त्याच्या बाजूने उभं राहणं आणि त्याच वेळी त्याला नाकारणं, दोघांच्याही मनात एकमेकांविषयी प्रेम कायम रहाणं पण तरीही आपालल्या अस्तित्वासाठी चाललेली धडपड खूप छान मांडलीये. मस्ट वॉच..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त! Happy
यांतले 'द लास्ट स्टेप', 'कुर्मावतार', 'नूर' हे मी बघितले. बाकीची यादी वेगळी होती.

नीधप,
Happy you are always welcome..

बिनू,
पिफच्या बाहेर कुठे बघता येतील हे नाही सांगता येणार मला तरी.. Sad कदाचित काही नेट वर डाऊनलोड साठी उपलब्ध होतील पण त्याला वेळ लागेल कारण यातले सगळेच अगदी न्यू रीलिज आहेत..

साजिरा,
तसं असेल तर फारच छान.. मग तुम्हीही तुमचे रीव्हूज लिहा.. म्हणजे कोणते चांगले मूव्हीज पहायचे राहिलेत हे कळेल.. Happy

मी मुक्ता,

'अराफ'मध्ये केवढं काय काय घडत असतं. 'घडणं' म्हणजे नक्की काय? सतत कोणीतरी, काहीतरी बोलतंय, करतंय, म्हणजेच घडणं? 'अराफ'ची प्रत्येक चौकट विलक्षण बोलकी आहे. त्या मुलामुलीचं एकाकीपण केवढं अंगावर येतं!! Happy हेच 'द डिले'च्या बाबतीतही. हे दोन्ही चित्रपट मला अतिशय आवडले. असो. Happy

'अराफ'च्या नायिकेला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं पारितोषिक जाहीर झालं आहे. 'द डिले'च्या दिग्दर्शकाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचं. 'बार्बरा' हा सर्वोत्कृष्ट चित्रपट.

चिनूक्स,
अग्रीड.. Happy सारखं काहीतरी घडायलाच पाहिजे असं नाही. पण मला प्रत्येकच चौकट बोलकी नाही वाटली. एकाकीपणा दाखवण्यासाठी किंवा त्याची तीव्रता जाणवण्यासाठी सीन मोठे असले पाहिजेत असं काही नाही. अभिनयाचं पारितोषिक मिळालं हे योग्यच आहे म्हणा. पण बार्बरा किंवा रोझ च्या अभिनेत्रीही काही कमी नव्हत्या हे सगळेच मान्य करतील..

असो, मला चित्रपटांमधलं फार काही कळतं अशातला भाग नाही त्यामुळे कदाचित प्रत्येक चौकटीचा संवाद कळण्याइतकी क्षमता अजून डेव्हेलप व्हायची असेल ही पण शक्यता आहेच.. Happy

तुम्ही चित्रपट पाहिल्यानंतर दिग्दर्शिकेशी बोललात की आधी? आधी बोलला असाल तर त्या संवादाचा काही परिणाम झाला का चित्रपट बघताना आणि नंतर बोलला असाल तर त्या संवादाने आधी निसटलेले काही धागे नव्याने उलगडले का? हे जाणून घ्यायला आवडेल..

डीले च्या बाबतील म्हणाल तर "येस्स.. मला नाही वाटलं खूप भारी. याच्यामागे पण काही कारणं आहेत. जेव्हा कथा खूपच प्रेडिक्टेबल असते तेव्हा ती एक्सेलंट नाही वाटत. डिले जसाजसा पुढे जात गेला तसं तसं मला अ‍ॅक्च्युअली इमॅजिन होत होतं की पुढे काय होणार आहे आणि ते तसंच झालं,, कदाचित त्यामुळे कमी परिणाम झाला असावा. मला मान्य आहे की कथा साधीशी असली तरी दिग्दर्शक ती कशी मांडतो हे खूपच बघण्यासारखं असतं. आणि मग कधी कधी असं होतं की जे आहे ते खूप छान आहे पण त्यात नवीन काही नाही म्हणून काही पॉइंटस् कमी होतात, which is not actually correct but cant help.. Sad

धन्यवाद शैलजा.. Happy

मी मुक्ता,
'अराफ'च्या दिग्दर्शिकेशी मी नंतर बोललो. 'द डिले'मधल्या काही प्रसंगांची अनिवार्यता, क्लोजअप्सचा वापर यांबद्दल नखातेसर भरभरून बोलत होते.

चिनूक्स,
Happy पण माझा प्रश्न तर बाजूलाच राहिला. त्यांच्याशी बोलल्यामुळे काही गोष्टी नव्याने उलगडल्या का असं विचारलं मी.. असो.. डिले संदर्भात झालेली चर्चा संक्षिप्त स्वरुपात लिहिता आली तर वाचायला आवडेल.. Happy