ते दोघे...

Submitted by मी मुक्ता.. on 2 April, 2013 - 03:24

ते दोघे खू..प्प काळाने भेटतात..
अमका तमका, अमकी तमकीच्या गप्पा होतात..
जुन्या कविता, जुनेच किस्से..
मग काय काय नवीन चाललयं याची उजळणी करतात..
नव्या कविता, नवे किस्से...
बोलता बोलता, 'everything changes'
आणि 'some things never change' या जुन्याच वादालाही पोचतात..
विषय कुठे चाललाय हे कळून मग शांत होतात...

ते दोघे खूप काळाने भेटतात..
समोरचा नक्की किती बदललाय,
हे शब्दांशब्दांतून चाचपडत राहतात..
आपण कितीही बदललो तरी आपल्या आतल्या,
कधीच न बदलणार्‍या कशापर्यंत तरी उतरतात..
मग ओरखडे इतक्या आतही उमटल्याचं पाहून खिन्नपण होतात...

ते दोघे खूप काळाने भेटतात..
एकमेकांच्या हातावर कोरलेल्या रेषा अजून तशाच आहेत,
हे माहिती असलेलं सत्य अनुभवण्यासाठी..
एकमेकांच्या मनात रंगवलेल्या प्रतिमांचे,
नवे संदर्भ सांगण्यासाठी..
सोबत नसतानाही एकमेकांत सापडलेल्या एकमेकांच्या खुणा
एकमेकांसोबत वाटून घेण्यासाठी...

ते दोघे खूप काळाने भेटतात..
रोजच भेटत असल्यासारखे..
ते दोघे खू....प काळाने भेटतात..
पुन्हा खू......प काळ न भेटण्यासाठी...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त !

तिलकधारी आला आहे.

ते दोघे खू..प्प काळाने भेटतात..<<<

कवीसंमेलनात खू आणि प्प या अक्षरांचा उच्चार करताना मधे नुसताच ओठांचा चंबू करून श्रोत्यांकडे बघत बसणार का?

तिलकधारीला काव्य भावेना.

तिलकधारी,

कवीसंमेलनात खू आणि प्प या अक्षरांचा उच्चार करताना मधे नुसताच ओठांचा चंबू करून श्रोत्यांकडे बघत बसणार का?>> नाही हो.. खूsssssssssssssssssप असं म्हणणार. ख+ऊऊऊऊऊऊ+प्प असं.. बघा इमॅजिन होतय का? And I am sure श्रोते will like it.. Wink I am rather good on stage you see.. Proud

तिलकधारीला काव्य भावेना.>> होता है, होता है.. ऐसाभी होता है... Happy

मुक्ता:
वरील संवादाला धरून लिहीत आहे.
मला वाटते कविता शब्दातून बोलतेच.
तेव्हा चिन्हांचा वापर शक्यतो टाळावाच.
तसेही कविता सादरीकरण ह्या कविताबाह्य गोष्टी आहेत.

“मला वाटते कविता शब्दातून बोलतेच.
तेव्हा चिन्हांचा वापर शक्यतो टाळावाच.” >>>> कविता शब्दातून बोलते हे खरे असले तरी विरामचिन्हे शक्यतो टाळावीत हे मत तितकेसे पटत नाही. आशय पोहोचवायला शब्द अपूरे पडतात म्हणून विरामचिन्हे वापरली जातात असे कोणी मत मांडत असेल तर मी त्या मताशी सहमत नाही. शब्दांप्रमाणेच विरामचिन्हे हा लिखित भाषेचा महत्वाचा भाग आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल अनास्था असता कामा नये असे वाटते. निरर्थक किंवा अनावश्यक चिन्हे नसावीतच, याबाबत पूर्ण सहमत. परंतु, विरामचिन्हे शब्दांना अधिक खुलवत असतील, आशय दृढ करत असतील तर जरूर वापरावीत असे मला वाटते.

मायबोलीतील एक ज्येष्ठ कवयित्री क्रांति साडेकर यांनी विरामचिन्हे जीवनाशी कशी निगडित असतात यावर एक कविता लिहिल्याचे स्मरते.

विरामचिन्हे, शब्दाला/शब्दसमूहाला विशिष्ट अर्थ प्राप्त करून देतात किंवा अर्थ बदलूही शकतात याची ही गद्यातील काही उदाहरणे :

(१-१) काय बोललास ?
(१-२) काय बोललास !

(२-१) गावाला चाललास का ?
(२-२) गावाला चाललास, का ?

(३-१) मी तुझा नवरा, तू माझी बायको; आपण सिनेमाला जाऊ.
(३-२) मी, तुझा नवरा, तू, माझी बायको; आपण सिनेमाला जाऊ.

तिसर्या उदाहरणातील वाक्ये, मी माझ्या लहानपणी ऐकलेली आहेत.
एका प्रसिद्ध साहित्यिकाचा (आचार्य अत्रे) विनोद म्हणून सांगितली जात.
(ही वाक्ये त्यांचीच होती की नाही हे मात्र निश्चित ठाऊक नाही.)