स्तवन

निःशब्द प्रार्थना

Submitted by पुरंदरे शशांक on 21 September, 2019 - 14:06

निःशब्द प्रार्थना

हात जोडले नसे का
मूर्ति नसे का गोमटी
अंतरात वसे उर्मी
हरि आहेच सांगाती

मागायाचे सर्वज्ञाला
हे तो उफराटी गोठी
शब्दी मावेना प्रार्थना
नको गीत हरी साठी

देखे नयनामधून
बोले वाणी चालवून
कसे स्तवन करावे
मौन हेचि तेथ खूण

तोचि आधार एकला
श्वास चालवी सकळ
जाणवता क्षणभरी
होय प्रार्थना सफळ...

Subscribe to RSS - स्तवन