महाराष्ट्र मंडळ

संवेदनशील संगीतकार

Submitted by सुमुक्ता on 18 August, 2014 - 06:19

सुप्रसिद्ध संगीतकार श्री कौशल इनामदार ह्यांचा अमेरिकेचा दौरा चालू असताना माझ्या बऱ्याच मित्रमैत्रिणींनी त्यांच्या "कौशलकट्टा" ह्या कार्यक्रमाचे कौतुक केले. मला आठवले ते मराठी मंडळ अॅबर्डीन च्या दिवाळी कार्यक्रमामध्ये मध्ये त्यांनी दाखविलेली "कौशलकट्टा"ची झलक. श्री कौशल इनामदार काही कामानिमित्त इंग्लंड मध्ये येणार असल्याचे कळले आणि मराठी मंडळ अॅबर्डीनच्या कार्यकारिणी समितीने लगेचच त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना अॅबर्डीन, स्कॉटलंड येथे दिवाळीचा कार्यक्रम करण्याची विनंती केली. मराठी मंडळ अॅबर्डीन तसं लहानच, ७५-१०० मराठी लोकांचं.

ब्रु.म.मं २०१५: सारेगम स्पर्धा

Submitted by BMM2015 on 12 August, 2014 - 15:28

नमस्कार मंडळी

बृहन्महाराष्ट्र मंडळाचा 17 वा अधिवेशन सोहळा यंदा लॉस एंजलिस मधे 3-5 जुलै 2015 ला संपन्न होणार आहे

जुळून येती रेशीमगाठी - २

Submitted by बन्या on 11 July, 2014 - 04:14

तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा Happy

http://www.maayboli.com/node/46778?page=66

तक्रार

Submitted by रमा. on 31 March, 2014 - 23:38

आटपाटनगरात फिरून फिरून पेंगलेला
निंबोणीच्या झाडामागे चांदोबा भागलेला
पेज भरवत आई दाखवते बाळाला
हळूच एक टिचकी मारते गालाला
त्या तिथे कोपर्‍यात रुसून बसली ताई
सगळं फक्त बाळाला, मला काई नाई??
टपोर्‍या डोळ्यातून येतं टपटप पाणी
ऐकव तू फक्त त्यालाच ती गाणी
येऊच दे बाबाला मी सांगते त्याला नाव,
आमचा सुद्धा आहे म्हंटलं वेगळासा गाव..

BMM2015: बोधचिन्ह आणि घोषवाक्य स्पर्धा (logo and slogan competition)

Submitted by BMM2015 on 16 December, 2013 - 11:22

मंडळी,

कुठल्याही संस्थेचे बोधचिन्ह आणि घोषवाक्य म्हणजे संस्थेचा अभिमान, तिचा इतिहास आणि कर्तुत्व जगासमोर थोडक्यात मांडायची संधी. पुढच्या पिढीला संदेश आणि दिशा द्यायची संधी.

Dan Brown च्या दा विन्ची कोड पासून शिवाजी महाराजांच्या छत्रपती मुद्रेपर्यंत आणि रेड क्रॉस च्या चिन्हापासून हिटलरच्या स्वस्तिकापर्यंत आतापर्यंत आपण अनेक बोधचिन्हे पाहिली.
जय जवान जय किसान, गर्जा जयजयकार क्रांतीचा या घोषवाक्यांनी आपण देशभक्ती साठी प्रेरित झालो आणि सागरा प्राण तळमळला सारख्या काव्यांनी आपण हळवे झालो.

शब्दखुणा: 

माझ्या मनातील अधिवेशन

Submitted by वैभव on 22 November, 2013 - 14:33

प्रॉव्हीडन्स मधील आपले अधिवेशन तर उत्तमच झाले. काही गोष्टी आपल्याला आवडल्या, काही गोष्टी थोड्या वेगळ्या करता आल्या असत्या, काही गोष्टी अधिक करता आल्या असत्या.
आपल्या मनातले अधिवेशन आणि आलेला अनुभव प्रत्येक वेळा निराळाच असतो. आम्हा एल ए करांना आपले मनोगत जाणून घ्यायचंय. त्यासाठीच एक निबंध स्पर्धा आयोजित करत आहोत, विषय आहे "माझ्या मनातील अधिवेशन".
सुमारे १००० शब्द मर्यादेत (इंग्लिश किंवा मराठी मध्ये) आपले विचार आमच्या कडे १५ डिसेंबर'१३ पर्यंत खालील पत्त्यावर ईमेल करा.
spardha at bmm2015 dot org

पहिल्या तीन निबंधांना योग्य पारितोषिक देण्यात येईल.

शब्दखुणा: 

न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअर मधे महाराष्ट्राचा महोत्सव

Submitted by अजय on 24 September, 2013 - 00:44

या रविवारी (दि. २२ सप्टेंबर) न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरमधे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून प्रायोजीत, दिपोत्सव साजरा झाला. जगातल्या सगळ्यात गजबजलेल्या या चौकात या दिवशी महाराष्ट्राची संस्कृती झगमगली. लावणीपासून गोविंदापर्यंत आणि मेंदी पासून ताज्या भज्यांच्या खमंग वासापर्यंत मराठी संस्कृतीनं, तिथे जमलेल्या साडेतीन लाख देशी विदेशी पाहुण्यांना आपलंसं केलं. या कार्यक्रमात सहभागी झालेले बृहन्महाराष्ट्रमंडळाचे विश्वस्त श्री आशिष चौघुले यांच्याकडून यांच्याकडून मराठी माणसाला अभिमान वाटावी आणि कायम स्मरणात रहावी अशी ही प्रकाशचित्रे

Pages

Subscribe to RSS - महाराष्ट्र मंडळ