महाराष्ट्र मंडळ

BMM 2013 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन - उपसंहार

Submitted by असामी on 9 July, 2013 - 09:22

BMM 2013 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशनातील अनुभवांवार आधारीत feedback/सूचनांसाठी धागा.

हा धागा पुढच्या संयोजकांना एकत्र सगळ्या सूचना बघता याव्यात ह्या हेतूने उघडला आहे. तुमच्या इतरत्र विखुरलेल्या सूचना इथे एकत्र केल्या तर सोपे होईल.

मी गेल्या एक दोन दिवसांमधील सूचना पुढच्या पोस्टमधे एकत्र करतोय.

कॉसमॉस बीएमएम २०१३ स्पर्धेचा विजेता टोरांटोचा रवी दातार

Submitted by अजय on 6 July, 2013 - 01:58

कॉसमॉस बीएमएम २०१३ स्पर्धेचा विजेता टोरांटो कॅनडाचा रवी दातार.

दुसरा क्रमांक टोरांटो कॅनडाची समीधा जोगळेकर

तिसरा क्रमांक न्यूजर्सी चा अक्षय अणावकर
finale-2.jpg

अधिवेशन १ला दिवसः ५ जुलै

Submitted by समीर on 5 July, 2013 - 18:17

पहिल्या दिवसाची क्षणचित्रे:
IMG_1331.JPG

१. ढोल्/ताशे/लेझीमच्या जोडीने आलेल्यांचे स्वागत.
२. नाश्त्यासाठी उपमा/दिलपसंद Happy
३. आभाने (अजय/भावना ची मुलगी) गायलेले राष्ट्रगीत. मान्यवरांची भाषणे आणि उद्घाटन सोहळा. हा कार्यक्रम काही इतर कामांमुळे येता जाता पहायला मिळाला.
४. लग्नाच्या पंगतीचं पुणेरी जेवण : अळू, बिरड्या, बटाट्याची भाजी, पुरणपोळी, जिलेबी, मठ्ठा, मसालेभात..
IMG_1320.JPG

"आली घटिका समीप" - बी.एम.एम. १६ व्या अधिवेशनासाठी प्रॉव्हिडन्स नगरी सज्ज - उत्साहाला आणि आनंदाला उधाण

Submitted by अजय on 4 July, 2013 - 13:17

बी.एम.एम.च्या अधिवेशनाला - ५ जुलै रोजी सकाळी- सुरुवात होत आहे. गेली दोन वर्षे बॉस्टनचे बाळ महाले आणि त्यांच्या सहकार्‍यांनी या अधिवेशनाची कसून तयारी केली आहे. अगदी स्वतःच्या घरातला कार्यक्रम असल्याप्रमाणे सर्वांनी मन लावून काम केल्याने, आता या शेवटच्या घटकेला उत्सुकता अगदी ताणली गेली आहे. त्यातच महाराष्ट्रातून महेश मांजरेकर, प्रशांत दामले, पद्मजा फेणाणी-जोगळेकर, संगीतकार अजय-अतुल, सुकन्या कुलकर्णी, राहुल देशपांडे, अजित भुरे, नटरंग-फेम सोनाली कुलकर्णी आणि इतर पन्नासहून अधिक कलाकार इथे येऊन दाखल झाले आहेत. दिलीप वेंगसरकर हेही खास या कार्यक्रमासाठी आले आहेत.

प्रॉव्हिडन्स शहर बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या १६ व्या अधिवेशनासाठी सज्ज

Submitted by अजय on 29 June, 2013 - 21:36

प्रॉव्हिडन्स शहर बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या १६ व्या अधिवेशनासाठी सज्ज झाले आहे. अमेरिकेतल्या एका शहरातल्या स्थानिक शासनाकडून लावलेल्या बॅनरवर " नव्या बांधुया रेशिमगाठी, जपण्या अपुली मायमराठी ! " ही मराठी अक्षरे पाहून काय वाटलं ते शब्दात सांगणे अशक्य आहे. (फोटो : वृंदा ढोले)
banner_in_providence2.jpg

कॉसमॉस बीएमएम सारेगम २०१३ - श्रेयस बेडेकर (ह्यूस्टन, टेक्सास) यांच्याशी गप्पा

Submitted by अजय on 27 June, 2013 - 21:50

सर्वप्रथम आपली या कॉसमॉस बीएमएम सारेगम २०१३ अंतिम फेरीत निवड झाल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन
१ श्रेयस ! तुम्ही मुळचे कुठले ?
मी मुळचा साताऱ्याचा. सांगलीच्या वालचंद कॉलेजमधून इंजिनिअरिंगची पदवी घेतली. मग पुण्यात दोन वर्षे नोकरी करून, पदव्युत्तर शिक्षणासाठी इकडे आलो. इथल्या Texas A&M , College station या युनिव्हर्सिटीमधून MS पूर्ण केलं.
२. तुम्हाला संगीताची गोडी / आवड कशी आणि केव्हा लागली ?

बृ.म.मं २०१३ अधिवेशनानिमित्त पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्याशी संवाद

Submitted by माध्यम_प्रायोजक on 24 June, 2013 - 03:05
’स्वच्छ पाण्यासारखा नितळ-प्रवाही आणि स्फटिकासारखा पारदर्शक’ असा स्वर लाभला आहे, असं कवी शंकर वैद्य ज्यांच्याबद्दल म्हणाले, त्या स्वरचंद्रिका पद्मजा फेणाणी जोगळेकर बॉस्टन इथे होणार्‍या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात आपला कार्यक्रम सादर करणार आहेत.
शब्दखुणा: 

कॉसमॉस बीएमएम सारेगम २०१३ - अक्षय अणावकर (नॉर्थ अर्लिंगटन, न्यू जर्सी) यांच्याशी गप्पा

Submitted by अजय on 17 June, 2013 - 08:12

सर्वप्रथम कॉसमॉस बीएमएम सारेगम २०१३ अंतिम फेरीत निवड झाल्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन
१ अक्षय ! तुम्ही मुळचे कुठले ?
माझा जन्म मुंबईचा. मी तेथेच वाढलो. सध्या मी नॉर्थ अर्लिंगटन (NJ ) येथे राहत असून Cablevision Systems Corporation मध्ये डाटाबेस मार्केटींग म्यानेजर म्हणून काम करत आहे.
२. तुम्हाला संगीताची गोडी / आवड कशी आणि केव्हा लागली ?

कॉसमॉस बीएमएम सारेगम २०१३ - रवि दातार ( टोरांटो, कॅनडा) यांच्याशी गप्पा

Submitted by अजय on 7 June, 2013 - 09:04

१ रवि, तुम्ही मुळचे कुठले ?
मी माझ्या जन्मापासून टोरांटो , कॅनडा येथेच आहे. त्यामुळे मी अस्सल कॅनडा चा आहे.
२. तुम्हाला संगीताची गोडी / आवड कशी आणि केव्हा लागली ?
माझे वडील आणि आजोबा या दोघांना संगीताची अतिशय आवड , तसेच ते दोघेही उत्तम गायक आहेत ravi_datar.JPG त्यामुळे आमच्या घरात संगीताचे वातावरण आहे. आणि या मुळे माझ्यातही संगीताची हि परंपरा भिनली आहे. आणि संगीताचा हा वारसा माझ्या पर्यंत पोचला आहे.
३. संगीताचे शिक्षण तुम्ही किती वर्ष घेत आहात ? आणि कोणत्या प्रकारचे संगीत शिक्षण चालू आहे ?

अधिवेशनासाठी दैनीक तिकिटे आता उपलब्ध आहेत!!

Submitted by अजय on 5 June, 2013 - 13:32

daypass.jpg

नमस्कार मंडळी,

अधिवेशन आता अगदी जवळ म्हणजे एक महिन्यावर येऊन ठेपले आहे.

तुम्ही जर अजूनही अधिवेशनाला येण्याबद्दल "येऊ का नको" अशा द्विधा मनस्थितीत असलात तर मित्रमंडळींना भेटायला, सुग्रास भोजनासाठी, करमणुकीच्या कार्यक्रमांसाठी, खरेदीसाठी, शाळाकॉलेजांच्या प्रवेशांबद्दल माहितीसाठी आणि हवे असल्यास अगदी वर किंवा वधू संशोधनासाठी देखील येण्याचा विचार करा.

Pages

Subscribe to RSS - महाराष्ट्र मंडळ