Submitted by आशिका on 4 September, 2025 - 02:41
ज्यासाठी सगळा अट्टाहास केला होता तो 'पुनर्मिलनाचा' क्षण समीप येऊन ठाकला.... कर्तव्यपूर्तीचे समाधान, पराक्रमाची विजयगाथा, सत्धर्माचं राज्य सारं काही मिळालं.
सर्वत्र विजयोत्सव जल्लोशात साजरा होत होता. दोघांच्या जयजयकाराने आसमंत दुमदुमत होता...... हो, तिच्याही जयजयकाराने.....नुकतीच तिने 'सत्वपरीक्षा' यशस्वीरित्या पार पाडली होती ना !
त्या परीक्षेने तिला देवी बनवून मखरात सजवले. तोच आदर्श मानून तिच्या कित्येक लेकी, सुनांनाही निमुटपणे तीच वाट चालावी लागली....पुढची कित्येक वर्षे......
तो धिम्या गतीने पावले उचलत तिच्या समोर ठाकला....
मात्र
परीक्षेच्या वेळी तिच्या केवळ स्पर्शाने शांत झालेल्या अग्निज्वाला आता खदखदता अंगार बनून तिच्या नजरेत धगधगत होत्या.....
ती नजरच त्याला म्हणाली.....
" मला वाटले नव्हते, तू कधी असा वागशील!”
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
पोचली.
पोचली.
छान आहे. अत्यंत स्फोटक
छान आहे. अत्यंत स्फोटक विषयाला हात घातला आहे.
आशिका, शशक आवडली.
आशिका, शशक आवडली.
तिला अग्निपरीक्षा द्यायला
तिला अग्निपरीक्षा द्यायला लावणारा , गरोदरपणी वनात सोडून देणारा तो, मला कधीच ‘देव’माणूस वाटत नाही.
शशक अतिशय आवडली!
शशक अतिशय आवडली!
सुरेख
सुरेख
आवडली.
आवडली.
आवडली
आवडली
आवडली
आवडली
मस्तच
मस्तच
छान शशक .आवडली
छान शशक .आवडली
मस्त.. चपखल (की चपलख?) बसली
मस्त.. चपखल (की चपलख?) बसली आहे..
शर्मिला,
तिला अग्निपरीक्षा द्यायला लावणारा , गरोदरपणी वनात सोडून देणारा तो, मला कधीच ‘देव’माणूस वाटत नाही.
>>>
इतकी आदर्श व्यक्ती जर काही विचारपूर्वक वेगळे वागत असेल तर .. काहीतरी असेल ना त्यामागे असे वाटते.
म्हणजे, रामायण खरी घटना असेल तर यामागे काही रहस्य असेल.. निव्वळ कथा असेल तर लेखकाला काही वेगळे सांगायचे असेल.. त्यामुळे थेट टोकाचा विचार करू नये असे वाटते.
पण येस, द्रौपदी वेळी मात्र पांडव नालायक वागले असेच मला वाटते.
SharmilaR
SharmilaR
PLEASE Do not reply.
सुंदर! आवडली.
सुंदर! आवडली.
आशिका, खूपच सुंदर
आशिका, खूपच सुंदर