शशक ३ - संयोजक रॉक्स! गणेशभक्त शॉक्स!! – ऋन्मेऽऽष

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 September, 2025 - 17:49

वर्ष २०२६, गणेशोत्सव – मुंबई!
----------------------------------------

आदल्या वर्षी मायबोलीकर ऋन्मेषने गणपती दर्शनासाठी होणाऱ्या तुफान गर्दी विरोधात मोर्चा उघडल्याने सरकारला जाग आली.

ऋन्मेषला त्याच्या राहत्या घरातून उचलले गेले.

पण समस्येकडे लक्ष वेधणाऱ्या ऋन्मेषकडे समस्येचा तोडगा नव्हता. त्याच्या धाग्यांप्रमाणे त्याच्या कथादेखील अभ्यासू नव्हत्या.

यावर आमचे सल्लापेशालिस्ट मायबोलीकर उपाय सुचवतील अशी शिफारस त्याने केली.

"#माबो_गणेशोत्सव_संयोजक" नावाने एक टीम मुंबईत दाखल झाली.

पोहोचताक्षणीच कामाला लागली.

काही जाचक नियम बनवून ते अध्याहृत केले गेले.

अंमलबजावणी सुरू झाली.

आणि चमत्कार!

दुसऱ्याच दिवशी गर्दी अर्धी झाली.

तिसऱ्या दिवशी नाहीशी झाली.

सेलिब्रिटी गायब झाले.

नव्वदीच्या दशकातील मंगलमयी वातावरण पुन्हा दिसू लागले.

सर्व वृत्तपत्रात एकच हेडलाईन झळकू लागली.

हे माबो गणेशोत्सवाचे संयोजक जरा अतिच करतात नाही?

.

IMG-20250905-WA0000.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान मस्तच, आवडली. मलाही फोटो दिसतो आहे.
त्या नियमामध्ये विडिओ ची पळवाट दिसते आहे. Happy
त्याच्या धाग्यांप्रमाणे त्याच्या कथादेखील अभ्यासू नव्हत्या. >>>> स्वतःवर विनोद करणे आवडले. Happy

शशक नव्हे तर सशशक (सव्वा सात) आहे.
त्याच्या धाग्यांप्रमाणे त्याच्या कथादेखील अभ्यासू नव्हत्या>>>> Lol
क्लिकबेट आहे का??

छान जमवून आणलीये Happy

त्या नियमामध्ये विडिओ ची पळवाट दिसते आहे. Happy
>>>
अरे हो की...
पण ही पळवाट मायबोलीच्या बाहेर जाऊ देऊ नका ..पुन्हा गर्दी जमवाल Happy

Lol