सुख

ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (७)

Submitted by तुमचा अभिषेक on 31 August, 2013 - 14:01

दर दुसर्‍या तासाला येणारा तिचा फोन.. आज ऑफिसला पोहोचून तीन तास उलटून गेले तरी आला नाही तेव्हा चुकचुकल्यासारखे वाटणे साहजिकच होते.. मात्र कामाच्या घाईगडबडीत डोक्यात येणारे सारेच विचार तसेच रेंगाळत ठेवता येत नाहीत.. दुपारी खिशातला फोन खणखणला तेव्हा तिची आठवण झाली, पण वेगळाच नंबर पाहून चुटपुटलो.. तेवढ्यापुरतेच.. कारण समोरून आवाज तिचाच होता, बातमी तेवढी चांगली नव्हती.. बाईसाहेब फोन कुठेतरी हरवून आल्या होत्या.. तिच्यावर ओरडावे कि डाफरावे या विचारांत असतानाच तिने फोन कट देखील केला. कदाचित मला हे कळवण्यापुरताच केला असावा.. ते ही खरेच, दुसर्‍याच्या फोनवरून कितीसे बोलणार..

विषय: 

ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (६)

Submitted by तुमचा अभिषेक on 27 August, 2013 - 07:39

२६ ऑगस्ट २०१३

विषय: 

ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (५)

Submitted by तुमचा अभिषेक on 9 July, 2013 - 00:05

दिवसभर पायाला भिंगरी लावलीय, असे धावपळीचे आयुष्य आम्हा मुंबईकरांचे. संध्याकाळी परतताना मात्र पळत सुटायचे काम ट्रेनवर सोपवून आम्ही निवांत बसतो.. नेहमीचेच कंपार्टमेंट, अन आवडीचीच जागा, पण नेहमीच काही गप्पा मारल्या जात नाहीत किंवा पुरेश्या मारून झाल्या की आपापल्या आवडीनुसार हाताला चाळा अन बुद्धीला खाद्य पुरवायला सुरुवात होते. ती मोबाईल गेम्स उघडते, तर मी माझ्या तोडक्यामोडक्या ईंग्रजीच्या भरवश्यावर न्यूजपेपरमध्ये शिरतो. आजही तसेच काहीसे..

विषय: 

ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (३)

Submitted by तुमचा अभिषेक on 16 June, 2013 - 09:50

१० जुन २०१३

ती नेहमी मला बोलते, जेव्हा तू मला भेटतोस, हसत नाहीस.. जसा लग्नाआधी हसायचास.. जेव्हा लांबूनच बघायचास.. नजर पडताच खुलायचास.. आता तिला कसे समजवू, उगाच हसता येत नाही मला, आणि कृत्रिम हसायला तर मुळीच जमत नाही.. लग्नाआधीची गोष्ट वेगळी होती.. आता तुला भेटणे आणि तुझ्याबरोबर घरी जाणे रोजचेच आहे.. रोज तशीच तूच दिसणार हे ठाऊक आहे.. मग का उगाचच ते औपचारीक हसणे.. पण.., गेले दोनचार दिवस मात्र हे रुटीन बदलले होते.. तिच्या कॉलेजला सुट्ट्या, तर घर ते ऑफिस माझ्या एकट्याच्या वार्‍या.. आजही एकटाच होतो.. आणि ती कसल्याश्या कामासाठी बोरीबंदरला गेली होती.

विषय: 

ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (२)

Submitted by तुमचा अभिषेक on 10 June, 2013 - 04:29

८ जुन २०१३

पहिल्या पावसाची चाहूल लागल्यापासून बायकोचे कुठेतरी लांबवर फिरायला घेऊन चल चालूय.. तिचेही खरेच आहे.. पावसाळा हा काही खिडकीतून बघायचा उत्सव नाही.. कडाडणारी वीज अन गडगडणारे ढग.. घरबसल्याच धडकी भरवतात.. जणू काही शत्रू अंगावर चाल करून येतोय.. पण मैदानात उतरायचे ठरवल्यास तेच जोडीदार बनून राहतात.. तरीही लांबवर कुठे जायचे म्हणजे वेळ हवा, सुट्टी हवी.. पैशाचेही सोंग काही घेता येत नाही.. जमेल तेव्हा जाऊच, पण आजची संध्याकाळ भाऊच्या धक्क्यावर घालवूया म्हणालो.. हो ना करता झाली तयार..

विषय: 

माझ्या घरट्यातील आनंददायक क्षण

Submitted by हरिहर on 13 May, 2013 - 05:25

मध्यंतरी सुमन कल्याणपूरकरचे ‘हरिनाम मुखी रंगते’ हे गाणे ऐकत होतो. त्यातील एक कडवे मनाला अतिशय भिडले. मीरा श्रीकृष्णाला विनवणी करते की, ‘‘घरट्यात माझीया आनंदाचा ठेवा । तूच यदुनाथा सदा असू द्यावा ॥ इतुकेच मागणे तुझ्यापाशी मी मागते । गोड नामी तुझ्या रंगते ॥‘‘ आणि त्यानंतर मी माझ्या घरट्यातील आनंदाचे क्षण टिपण्यास सुरुवात केली.

सुख दुख

Submitted by Sarang Damkondwar on 24 February, 2012 - 13:21

सुख दुःख काय ते या मधून सांगण्याचा प्रयत्न....

जीवनात दोनच गोष्टी आसतात आणि घडतात
त्या वाईट आणि चांगल्या आसतात ......

मनुष्य म्हणतो चांगल्या गोष्टी सुख देतात
तर वाईट गोष्टी दुःखाचे आश्रू आणतात......

मनुष्य दोन प्रकारे सुख संपादन करतो
एक प्रयत्नातून अणि दुसरे हिस्काउन.....

आजच्या युगात हिस्कव्लेले सुख हवे असते
म्हणजे ते दुसर्या शब्दात दुःख असते......

चांगल्या गोष्टी दोन प्रकारच्या आसतात
एक मनाला पटनर्या आणि दुसर्या न पटनर्या....
हे मनाला न पटनारे कटुसत्याचे कोड़े असते

मी तर म्हणतो माणसाच्या जीवनात दुःख नसतेच

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सुख

Submitted by मुरारी on 4 May, 2011 - 23:34

आज सकाळी ७.४७ ला नेहमीच्या खटारा लोकल ऐवजी , नवी कोरी निळी लोकल , लाजत मुरडत येताना बघून तमाम ठाकुर्ली वासीयांच्या काळजाचा ठोकाच चुकला, आम्ही मंत्रमुग्ध होऊन तिच्याकडेच बघत होतो, काय तो थाट. काय ती अदा अहाहा
सगळं पब्लिक आज एक दम शिस्तीत आत शिरलं, आमचा ग्रुप आधीच आतमध्ये बसून टवाळक्या करत होताच, चायला कसाऱ्याच्या चाळीतून एकदम मलबार हिल च्या बंगल्यात गेल्यासारखं वाटल, बसायला गुबगुबीत गाद्या, मोठ्या मोठ्या खिडक्या, प्रचंड वेगाचे पंखे Happy

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - सुख