24 - मालिका

Submitted by उदयन.. on 7 October, 2013 - 05:44

नविन मालिका - २४

अनिल कपुर ची नविन मालिका "२४" कलर्स वाहिनीवर शुक्रवार पासुन दाखवली जात आहे.
इंग्लिश मालिका "२४" चे भारतीय रुपांतर आहे

जय सिंग राठोड ( अनिल कपुर) एटीयु ( अँटी टेरेरीस्ट युनिट) चा ऑफिसर आहे. त्याला आदल्यारात्री माहीती मिळते की दुसर्या दिवशी शपथग्रहण करणार्या पंतप्रधानांचा काही अतिरेकी लोक खुन करणार आहे..त्या पुर्ण २४ तासाच्या दिवसाच्या घडामोडींवरची ही मालिका...... २४भागात प्रसारीत करणार आहेत... दर भाग एक तासाचा....

सुरुवात तर प्रचंड आशादायक झालेली आहे...

दोन एपिसोड तर झाले आहेत... प्रचंड गुंतागुंत आणि वेगवेगळे कथानकाचे पैलु एकाच वेळेला समोर येत आहेत

आता पर्यंतचे कथानक:-

जय सिंग राठोड आपल्या बायकोचा वाढदिवस साजरा करण्यासाठी रात्री घरी असतो...साजरा करत असतानाच त्याला ऑफिस मधुन फोन येतो..की उद्या पंतप्रधानांवर हल्ला होणार आहे.. तो सगळे तसेच टाकुन ऑफिस ला निघतो... जय सिंग ची बायको आधीच दोघांमधे काही अपसेट असल्यामुळे चिंतेत असते.. त्यांची मुलगी या प्रकाराला कंटाळुन मैत्रीणी बरोबर रात्री कुणाला न सांगता पार्टीला निघुन जाते...

जय सिंग ऑफिस मधे आल्यावर त्याचे सहकारी त्याला ब्रिफींग करतात..त्या वेळेला त्याचा मित्र अनुपम खेर जो वार्ताहर असतो.. तो सुध्दा हीच बातमी देतो.. त्यासाठी लागणारे पुरावे त्याला एका सिनेमाघरात त्याचा सहकारी देणार असतो ते घेण्यासाठी तो निघालेला असतो...

घरी मुलगी नाहिशी झाल्याचे समजल्यावर तिस्का (जय सिंग ची बायको) जय सिंग ला कळवुन शोधार्थात मुलीच्या मैत्रीणीचे वडील (अजिंक्य देव) यांच्या बरोबर निघते.. त्याची सुध्दा मुलगी पार्टीला गेलेली असते...

पार्टी मधे किरण (जय सिंग ची मुलगी) तिच्या मैत्रीणीच्या मित्रांबरोबर बाहेर फिरायला जाते..ती, तिची मैत्रीण , आणि तिचे दोन मित्र असे चौघेजण कार मधुन लाँगड्राईव्ह ला निघतात.. परंतु या दोन मित्रांचा प्लॅन वेगळाच असतो...मित्र तिला आणि तिच्या मैत्रीणीला मारहाण करतात.. अतिरेकी टोळीचा प्रमुखाच्या इशार्यावर किरण चे अपहरण तिच्या मित्राने केलेले असते...

भारताचे भावी तरुण प्रंतप्रधान आदित्य सिंघानिया मुंबईत आदल्या दिवशी रात्री काहीकामानिमित्ताने आलेला असतो.. त्याची आई (अनिता राज ... फार फार फार वर्षांनी Wink ) आपल्या परिने त्याला कंट्रोल मधे ठेवण्याचे बघत असते.. ती पार्टीअध्यक्षा असते... मुंबईत आल्यावर .. आदित्याला जय सिंग हल्याची माहीती देतो आणि त्याला योग्य ती काळजी घेण्यासाठी सांगतो.. आदित्यचे सुरक्षारक्षक प्रमुख सगळ्या हॉटेल ची कसुन तपासणी करतो आणि बंदोबस्त वाढवतो....
अश्यात आदित्यला एका टिव्ही एंकर चा फोन येतो...कॉलेज मधे असताना एका अपघाताने आदित्यच्या हातातुन खुन झालेला असतो आणि तो खुन आदित्यचा भावाने दडपलेला असतो... अँकर शी बोलण्यानंतर आदित्या आपल्या भावाबरोबर तिची भेट घेण्यासाठी गुपचुप हॉटेल मधुन बाहेर पडतो...

अनुपम खेर पुरावे घेण्यासाठी सिनेमाघरात आलेला असतो.. परंतु तिथे त्याच्यावर गोळीबार होतो...तो जय सिंग ला बोलवुन ते पुरावे त्याच्या हाती सोपवतो.. परंतु गोळीबार मधे दगावतो..
जय सिंग ला संशय असतो की त्याच्याच ऑफिस मधुन कोणी या कटात सामिल आहे...

-----------------

आता पुढे............

सुरुवात तर अतिशय रंजक झालेली आहे... एकाच वेळी सगळ्या घडामोडीं चित्रीत केल्या आहेत...त्यामुळे एपिसोड संपताना पुढे काय होईल याची ओढ तर लागतेच.....त्याच बरोबर... प्रत्येकाच्या बरोबर काय होईल हा ही एक विचार येतो....

-----------------------

फार वर्षांनी एक चांगली आणि सशक्त कथानक असलेली मालिका आलेली आहे..
सासबहु पेक्षा ही मालिका कैकपटींनी दर्जेदार आणि अतिशय उत्तम आहे............. Wink

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मलापण आवडतेय बघायला आणि २४ एपिसोडच असल्याने शेवटपर्यंत ओघवती असेल, उगाचच मालिका वाढविण्यासाठी काहीतरी घुसवणार नाहीत, असे वाटते.

मस्त आहे ही मालिका खुप..रवीवारी सलग २ तास पाहीले...पण शेवटच्या क्षणापर्यंत खिळवुन ठेवलं!

मला पण आवडली.

२४ एपिसोडच असल्याने शेवटपर्यंत ओघवती असेल, उगाचच मालिका वाढविण्यासाठी काहीतरी घुसवणार नाहीत, असे वाटते.>>> हो असेच असुदे Happy

मला आवडली २४.
काहीतरी वेगळं आहे, आणि सॉलिड स्टारकास्ट, काही खूप आवडते कलाकार आहेत (अनिल कपूर, मंदिरा बेदी, टिस्का चोप्रा, अजिंक्य, शबाना (अजून एन्ट्री व्ह्यायची आहे) यांच्यासाठी पाहणार)

खरोखर classss आहे... 24 ...
आणि मुख्य म्हणजे स्पीड जबरदस्त आहे.....स्टोरीला....
त्यात 24 एपिसोड मधे च संपवणार म्हणजे दुधात साखरच.. Wink

कॅमेरावर्क जबरदस्त आहे. भारतात क्वचित दिसणारं. एडिटिंग क्रिस्प आहे.
एटीयुचा सेट व्हाइट हाउस, कॅसल.इ.तल्या सेट्सची आठवण करून देतात.
फारच गुंतागुंत आहे.
भा.पं.नी कॉलेजात असताना एक खून केला होता का हे एक टीव्ही अँकर त्याला सरळ फोन करून विचारते?
ते अख्ख प्लेन कशाला उडवलं?
तिस्का की टिस्का?
मंदिरा बेदीबद्दल माबोकरांचे काय म्हणणे आहे?
बॉसला नकली इंजेक्शन देण्याची आयडिया मला रिपीट वाटली.

आम्ही इंग्लिश २४ अक्षरशः वेड लागल्यासारखं एकाच वेळी ६,७ तास बसून बघितलेलं आहे. भयंकर इंटेन्स आणि अ‍ॅडिक्टिव्ह आहे. हिंदी २४ ची सुरूवात चांगली झाली हे वाचून आनंद वाटला. थरार शेवटपर्यंत टिकून राहो.

भा.पं.नी कॉलेजात असताना एक खून केला होता का हे एक टीव्ही अँकर त्याला सरळ फोन करून विचारते?..
अगदी हाच विचार मनात आला तो scene पाहून.

आम्ही इंग्लिश २४ अक्षरशः वेड लागल्यासारखं एकाच वेळी ६,७ तास बसून बघितलेलं आहे. भयंकर इंटेन्स आणि अ‍ॅडिक्टिव्ह आहे.>>>>> + १

अरेच्चा................ही मालिका झाली का चालू........... आता बघितली पाहिजे. ट्रेलर आवडला होता...... Happy थॅन्क्स रे उदय.

<<आम्ही इंग्लिश २४ अक्षरशः वेड लागल्यासारखं एकाच वेळी ६,७ तास बसून बघितलेलं आहे. भयंकर इंटेन्स आणि अ‍ॅडिक्टिव्ह आहे >> +१

आम्ही इंग्लिश २४ अक्षरशः वेड लागल्यासारखं एकाच वेळी ६,७ तास बसून बघितलेलं आहे. भयंकर इंटेन्स आणि अ‍ॅडिक्टिव्ह आहे.>>>>> + ११११

आम्ही इंग्लिश २४ अक्षरशः वेड लागल्यासारखं एकाच वेळी ६,७ तास बसून बघितलेलं आहे. भयंकर इंटेन्स आणि अ‍ॅडिक्टिव्ह आहे.>>>>> + १११११११११११

असंच लॉस्ट, प्रिझन ब्रेकही पाहिलेत. ह्यांचेही भारतीय व्हर्जन्स यायला हवेत..

व्हॅम्पायर डायरीज मात्र तितकंसं नाही आवडलं. पण ह्याचं भारतीय व्हर्जन निघालं, तर धमाल येईल..

वरच्या इंग्लिश २४ फॅन्सनी 'हाऊस ऑफ कार्ड्स' ही बघा. मस्तय.
२४ संपल्यावर एक पूर्ण दिवस 'आता जीवनात काही अर्थ न राहिल्याचं' फिलींग आलं होतं Proud

आम्ही इंग्लिश २४ वेड लागल्यासारखं पाहायचो.....>>>>> अगदी अगदी....बसल्याजागी ९-१० एपिसोड पाहिलेत मी. आमच्या ओळखीचे एक महाभाग बसल्या जागी एक सीझन पाहायचे २४ चा. प्रत्येक वीकेन्डला एक सीझन सम्पवायचे. बीबीसीवरच्या एम.आय.५ (MI5 किंवा Spooks) चे ही पंखे होतो आम्ही.

बरे झाले इथेच वाचले
आता त्या मल्लीका च्या सिरीयल बद्दल कोण लिहिणारे म्हण्जे बघण्या आधी वाचायला बरे Happy
रचाक्याने काल होस्पितल मधे टी व्ही होता तिथे अ‍ॅड पाहिली गम्मत वाटली Happy

बघितले, बघितले. दोन्ही एपिसोड्स बघितले. सिरीयल चांगली काढलीये. एक अनिल 'करपू' सोडून सगळेच मस्त कामं करतायत. अ‍ॅक्च्युअली तो ही बरं काम करतोय पण बेसिकली तो मला आवडत नाही. Happy

ओरीजिनलची शेम टू शेम कॉपी आहे का? गांधी घराण्याच्या ऐवजी काय होतं ओरीजिनलमध्ये?

काल काय झाल २४ मध्ये??? प्लीज अपडेट टाका ना कुणीतरी................
>>>> मुग्धा, फक्त शुक्रवार्-शनिवारी रात्री १० वाजता ही दाखवली जाते. त्यामुळे तू काही मिस केलं नाहीयेस. आतापर्यंतचे दोन्ही एपिसोडस http://colors.in.com/in/24/ इथे बघायला मिळतील.

आवडली. इंग्लीश मालिकेवर आहे हे नव्याने समजलं. नाहीतर मालिका पाहताना आई, मुलगा, बहीण, जावई हे पाहून वेगळंच काही वाटत होतं.
२४ भागातच का संपवायचीय मालिका ?

काल चा एपिसोड मधे बर्याच प्रश्नांची उत्तरे मिळालीत....... उदा.एक टीव्ही अँकर त्याला सरळ फोन करून विचारते?

त्या पार्टीची "पाळलेली अँकर" असते बहुतेक त्यामुळेच तिने सरळ फोन केला........ आता तिचा सुध्दा निक्काल लागेल

चांगला वेग घेतलेला आहे आता...... बघु आज काय होते Happy

Pages