उलट्सुलट -२

Submitted by विजय देशमुख on 18 July, 2013 - 02:14

भाग १ http://www.maayboli.com/node/44121

"काही सिरिअस आहे का?"
"मला आत्ताच काही सांगता येणार नाही. आधी मला सगळे डिटेल्स हवेत..."
"हो तुम्ही विचारा मी सांगतो. पण प्लिज निलिमाला यातुन बाहेर काढा डॉक्टर. अहो एकुलती एक मुलगी आहे हो ती आमची..."
"मी समजू शकतो तुमच्या भावना. मला सांगा नेमकं काय होतय निलिमाला"
"ती कधीच अशी नव्हती. अगदी शांत, सुस्वभावी अशी मुलगी. म्हणजे मी तिचा बाप आहे म्हणुन नाही म्हणत पण खरच खुप सुशिल मुलगी आहे ती. दिलिप तिचा बालपणीचा मित्र. दिलिपचे वडिल आणि मी २० वर्ष शेजारी राहायचो. पण ५ वर्षांपुर्वी आमची चाळ पाडली आणि आम्हाला विरारला तर दिलिपला वसईला घर घ्यावं लागलं. अर्थात ते ही फार दुर नाही. आणि त्या दोघांच्या लग्नाला आमचा कोणाचाच विरोध नाही, उलट आनंदच आहे."
"अच्छा... मग जॉबमधे काही..."
"नाही, फारसं नाही. तिला रोज अंधेरीला जावं लागतं पण लहानपणापासुन मुंबईत आहे ती त्यामुळे फारसं असं अवघड नाही. त्यात तिचं टेबल वर्क, त्यामुळे फारसं टेन्शन आणि धावपळ नाही"
"आणि दिलिप"
"तो मार्केटींग करतो.... त्यामुळे बरेचदा उशिरापर्यंत काम चालतं त्याच, पण निलिमाची किंवा त्याचीही त्याबद्दल काही तक्रार नाही"
"हं... बरं नेमका त्रास काय होतोय?"
"ओह, सॉरी हं, मी नेमकं काय सांगायच, ते सोडुन भलतच सांगत बसलो.... निलिमाला जवळजवळ ५-६ महिन्यांपासुन दिलिप, मी किंवा इतर कोणाशीही एकदम जोरात बोलणे, तुसडेपणानं वागणे, किंवा ओळख न दाखवणे, असं व्हायला लागलय... आणि नंतर तिला ते आठवतही नाही"
"त्यावेळी ती तिचं नाव काय सांगते...?"
"नाही नाही डॉक्टर तशी ती निलिमाच असते, पण रागीट, उद्धट.. अशी काहीशी"
"नाही तुम्ही म्हणालात ओळख न दाखवणे, म्हणजे..."
"नाही त्या अर्थाने नव्हे... ओळख न दाखवणे म्हणजे जसं एखाद्या माणसाकडे खूप पैसा आला, की तो कसा वागेल, तसं काहिसं"
"निलिमाजवळ अचानक काही पैसा.........."
"नाही हो डॉक्टर... साधी कारकुनी नोकरी, त्यात कुठुन आलाय पैसा?"
"नाही म्हणजे अचानक तिचं राहणीमान बदलल वगैरे.."
"नाही, फारसं नाही... एखाद्यावेळी मेकअप करते, तितकच..."
"अहो ते सांगा ना."
"काय?"
"तुम्ही सांगा वहिनी, काय झालं ते"
"नाही म्हणजे हे कामचं असेल असच नाही, पण निलिमा आजकाल बरेचदा बाथरुममध्ये असते. जाते, येते... आणि मग चिडचिड... कधी प्रेमाने बोलेल, तर अचानक चिडचिड..."
"हं... ठिक आहे, मी काही औषधं देतो. फक्त रात्री द्यायचे, झोपताना. बघु एक आठवड्याने..."

*************************************************************************

"निलिमा, ते टेंडर लगेच भरुन पाठवायचे आहे"
"हो सर. ऑलमोस्ट झालच आहे. मी ५ मिनिटात फोन करतेच"
"ओके"
********************************
"निलिमा"
"सर ती वॉशरुममध्ये आहे, आली की .... सर आलीच ती"
"कोण?"
"सरांचा फोन."
"हा सर"
"ते टेंडर झालं का?"
"कोणतं टेंडर?"
"निलिमा, आर यु ओके? कोणतं काय? बीएआरसीचं"
"सर ते तर पाठवलं होत ना?"
"केव्हा?"
"उद्या ते ओपन होणार आहे ते"
"ते नाही.... तुला काय झालय, ५ मिनिटांआधी घेउन येते म्हणालिस आणि आता म्हणते कोणतं टेंडर, कामात लक्ष नाही का?"
"मी म्हणाले होते?"
"मग काय ............ निलिमा, बरं वाटत नसेल तर निलेशला सांग, तु आराम कर थोडा आणि मग कामाला लाग...."
"पण खरच ........"

***************************************
"सर आत येऊ?"
"हा"
"सर टेंडरवर सह्या हव्या होत्या."
"सापडलं का?"
"म्हणजे?"
"आताच फोनवर म्हणत होती की कोणतं टेंडर अन आता लगेच घेउन आली."
"मी म्हणत होते?"
"तुझा काय गजनी होतोय की काय? हा हा हा ...."
"नाही सर, सिरिअसली विचारतेय, मी असं म्हणाले?"
"हो, पण जाऊ दे... आता हे लगेच सील करुन आनंदला दे तो जातोय चेंबुरला, स्वतः देउन ये म्हणाव."
"ओके सर.... पण मी खरच कोणतं टेंडर म्हणाले होते?"
"आता जा लौकर.... ते नंतर बघू"

****************************************************
"डॉक्टर मला आता काळजी वाटत आहे."
"निलिमा, मागच्या आठवड्यात काही औषधं दिली होती"
"हो, त्यामुळे झोप चांगली लागतेय, पण दिवसभर सुस्ती वाटते"
"हम्म. डोस कमी करु जरा. तू खूप विचार करतेस की काय?"
"नाही डॉक्टर पण अजुनही सगळ्यांच्या तक्रारी तश्याच आहेत."

*****************************************************
"डॉक्टर हा दिलिप..."
"या"
"निलिमाच्या तब्येतीत अजुनही काही सुधारणा झालेली नाही"
"हो. काल आली होती ती"
"काल? कधी? मला काही बोलली नाही"
"हम्म... तिचं भांडणं, चिडणं काही कमी झालय?"
"नाही... उलट काल ती दिलिपशी अजुन एकदा भांडली"
"कशावरुन?"
"नेहमीचच... ती मला म्हणाली की ती चेंबुरला येत आहे, आनंद्सोबत. तिचा ऑफिसमेट... मी चेंबूरला गेलो. तिथे बीआरसीएच्या गेटवर वाट पहात होतो. मला आनंदसुद्धा भेटला, पण ती आलीच नव्हती. मी फोन केला तर म्हणे की ती येणारच नव्हती. मी उगाच उन्हातान्हात वाट पहात होतो. माझी ३ ची मिटींगपण सोडली मी तिच्यासाठी, पण ती हे सगळं ऐकुन मलाच रागवायला लागली की तिने असं काही म्हटलच नव्हतं"
"एक- एक मिनिट..."
"............"
"तुम्ही म्हणताय की तुम्ही ३ वाजताच्या दरम्यान तिला फोन केला होता."
"हो"
"एक्झॅक्टली किती वाजता?"
"अं ... ३:१० ला"
"मोबाईलवर?"
"हो आधी मोबाईलवरच केला, पण उचलला नाही म्हणुन कंपनीच्या फोनवर केला"
"कंपनी कुठे आहे"
"अंधेरी (ईस्टला), पण असं काय विचारत आहे तुम्ही?"
"कारण ३ ते ३:१५ किंवा ३:२० पर्यंत निलिमा माझ्या केबीनमध्ये होती"
"कसं शक्य आहे, अहो मी स्वतः तिच्याशी बोललो. आणि हे बघा ३:१० चा माझा कॉल... अं .. २४ मिनिटं १२ सेकंद... "
"अरे नाही दिलिप, ती माझ्या केबीनमध्येच होती. "

*********************************************
(क्र्मशः)

भाग ३ http://www.maayboli.com/node/44186

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सॉरी ते चुकुन टाकल्या गेलं होतं. आता अपडेट केलय. नुस्त सेव्ह करायच्या प्रयत्नात प्रकाशीत झालं होतं. Sad