उलट्सुलट -१

Submitted by विजय देशमुख on 15 July, 2013 - 03:20

"मग काय ठरलय तुझं"
"कशाबद्दल" निलिमा नॅपकिनला हात पुसत डायनिंग टेबलवर बसत म्हणाली.
"अग तू लग्न करणार आहेस की नाही?"
"पुन्हा तेच...."
"ठिक आहे. माझ्या समाधानासाठी पुन्हा एकदा सांग ना..."
"हो. करणार आहे आणि दिलिपशीच करणार आहे. अजुन काही ?"
"भेंडीची भाजी"
"अं"
"तुझ्या आवडीची भेंडीची भाजी"
"आजकाल तुम्ही आणि आई तूही, असे विचित्र का वागता कुणास ठाऊक"
"अगं, लोकं बोलतात गं आणि मग ह्यांना टेन्शन येते... तू लक्ष देऊ नकोस. मला माहीती आहे, तू दिलिपशीच लग्न करणार आहे ते."
********************************************************************
"मुर्खा... अरे मी नरिमनला ये म्हटलं होतं ना"
"सॉरी यार, मला व्यवस्थित ऐकु आलं नसेल. जाऊ दे"
"जाऊ दे काय? मागच्या शनीवारी तसच. त्या चौपाटीला गेला होतास..."
"अगं आज तिकडे एक डिलिव्हरी दिली आणि पैसेही घ्यायचे होते..."
"हो ... म्हणे डिलिव्हरी..."
"बरं आईस्क्रीम खाणार..."
"नेकी और पुछपुछ..."
"हा हा हा ... चल"
*********************************************************************
"काय आहे?"
"काही नाही, जेवतोय ..."
"असं का बघताय माझ्याकडे?"
"तू खरच....."
"बाबा आता मात्र हद्द झाली... मी आता ओरडुन सांगू का. मी दिलिपशीच लग्न करणार आहे"
"मग मघाशी भांडली का त्याच्याशी..."
"भांडेन मी, तो ही तसाच मुर्ख आहे..."
"काय झालं?"
"आज मी त्याला ऑफिसला बोलावलं तर तो चर्चगेटला वाट पहात होता... आणि वरुन म्हणतो कसा की मीच त्याला चर्चगेटला बोलावलं होतं..."
"अगं तू बोलावलं असशील..."
"बाबा... एकतर मी वेडी होईन नाहीतर ..."
".............."
"आणि हे काय चाललय? तुम्ही २-३ महिन्यांपासुन मला लग्न करनार ना नक्की विचारताय, आणि दिलिप दरवेळी दुसर्‍याच जागेवर जातो, मला भेटायला...काय चाललय काय?"
"काही नाही गं"
"आई तू शांत बस.... तु उगाच पांघरुण घालते... मला काही होतय का?"
"नाही रे बट्या... तू कधीकधी जरा वेगळी वागतेस म्हणुन मला टेन्शन येते"
"बाबा ! वेगळी म्हणजे कशी?"
"म्हणजे तू दिलिपशी लग्न करणार नाही आणि ..... "
"आणि काय...?"
"जाऊ दे"
*******************************************************************
"दिलिप"
"काय चाललय तुझं"
"कुठे काय, दगड फेकतेय...."
"काल फोनवर किती जोरात भांडत होतीस"
"कोण?"
"घ्या, आता कोण...."
"अरे पण मी काल कॉल केलाच कुठे?"
"मग काय भुताने केला होता..."
"बघु तुझ्या फोनवर दाखव..."
"हे बघ...."
"............."
"आणि तू..."
"दिलिप प्लिज...."
"काय प्लिज?"
"आता हे नको विचारुस की मी लग्न करनार आहे की नाही"
"मग काल काय झालं होतं तुला"
"दिलिप अरे देवाशपथ सांगते मी काल ८ च्या दरम्यान घरी पोचली आणि जेवण करुन झोपली रे मी. मी खरच तुला कॉल केला नव्हता."
"बरं जाउ दे.... "
********************************************************************
"हॅलो"
"हा बोला मॅडम"
"मला माझे फोनकॉल्सचं डिटेल बिल हवय"
"ओके मॅडम... प्लिज होल्ड मॅडम"
"................."
"मॅडम यासाठी..."
"माहिती आहे मला... बिलात अ‍ॅड करा"
"ओके मॅडम... २-३ दिवसात तुम्हाला डिटेल बिल मिळेल मॅडम... एनिथिन्ग एल्स....."
"नो"
*********************************************************************
"डॉक्टर, मला मदत हवीय"
"हो नक्की मदत करेन मी. बोला कोणाचा प्रॉब्लेम आहे?"
"माझाच"
"म्हणजे?"
"म्हणजे मी वेडी होतेय की काय असं वाटत आहे मला"
"पण असं का वाटतय तुम्हाला..."
"माझे बाबा म्हणतात की मी कधी दिलिपशी लग्न करणार म्हणते तर कधी नाही करणार. दिलिप माझा जुना मित्र आहे आणि आम्ही लग्न करणार आहोत, पण ..."
"पण काय?"
"दिलिपही म्हणतोय की मी २-३ महिन्यांपासुन कधी एक तर कधी दुसरच बोलते. कधी मी त्याच्याशी कडकडुन भांडते"
"भांडण? कशावरुन..."
"ते जाउ द्या हो, पण मी दिलिपशी भांडू शकते, ह्यावर माझाच विश्वास बसत नाही. आणि मी त्याच्याशी भांडले, हेही मला आठवत नाही."
"आय सी... मला तुमच्या आईवडिलांशी आणि दिलिपशी बोलावं लागेल"
"नक्कीच. माझी काहीच हरकत नाही"

क्रमशः
भाग २ http://www.maayboli.com/node/44172
भाग ३ http://www.maayboli.com/node/44186

Group content visibility: 
Public - accessible to all site users

????