गद्यलेखन

घाबरट

Submitted by निशा राकेश on 12 October, 2022 - 07:17

नमस्कार , मी सदाशिव रामेश्वर कर्णिक , वय वर्ष चाळीस , मी विवाहित आहे आणि दोन मुलींचा बाप देखील ,खूप पैसेवाला जरी नसलो तरी पोटापुरत आणि कधीमधी मुलींची आणि बायकोची हौस पुरवण्या इतपत कमावतो , हि झाली माझी जुजबी ओळख, काय म्हणता काम काय करतो , काही विशेष नाही ओ एक सामान्य सेल्समन आहे एका कपड्याच्या दुकानात , आणि हो माझ स्वतःच एक घर देखील आहे , वडिलोपार्जित असल तरी स्वतःच , भाड्याच नाही , तीच एक गोष्ट आहे जी मी नेहमी अभिमानाने सांगतो, हे सगळ मी तुम्हाला का सांगतोय , काही महिन्यांपूर्वी माझ आयुष्य हे अगदी सरळमार्गी होत , पण मंडळी मला एक तुम्हाला देखील विचारावस वाटत आपल्याला कधी कधी आपल्याच स

शब्दखुणा: 

एक मूड असाही

Submitted by सामो on 3 October, 2022 - 04:43

कॉफी कमी पडली की, मन प्रचंड रिसेप्टिव्ह होउन जातं. तरल-भावुक. मग लॅपटॉपवर, कीबोर्डच्या वरच्या रिकाम्या जागेत ठेवलेल्या , इवल्याश्या निळ्या व पांढर्‍या रंगांच्या शिंपल्यांच्या डब्याही कशा एकमेकांशी गप्पा मारणार्‍या सख्या वाटू लागतात. टेबलवरचे बांबूचे रोपटे, आपल्याला त्याच्या मनातील अलवार गूज सांगते आहे असे वाटू लागते. आणि हे सारे केव्हा आता ..... पहाटेच्या तीन-चार वाजता. जेव्हा आख्खे शहर निद्राधिन झालेले आहे, सारे शहर अमूर्त मनाच्या राज्यातून फेरफटका मारीत आहे. स्वप्नांच्या अगणित पालख्या, मिरवणुका निघालेल्या आहेत, काही भरजरी, डौलदार, दिमाखदार तर काही शांत, प्रार्थनेसारख्या.

पांडूबाबा.

Submitted by deepak_pawar on 30 September, 2022 - 10:48

पांडूबाबा आमच्या वाडीतील सगळ्यात जुना माणूस. जुना म्हणजे इतका जुना कि त्याच्यासमोरची लहान लहान मुलं आता म्हातारी झालेली. हाता-पायाची कातडी लोंबू लागलेली, दातांनी तोंडाचा केव्हांच निरोप घेतलेला. त्यामुळे गालाला जिथे खळी पडते, तिथं खड्डा पडलेला. भाकर खाताना सुद्धा त्याला डाळीत कुसकरून खावी लागायची.
एकदा मी सहज त्याला विचारलं," बाबा, तुझं वय किती?"
माझा प्रश्न ऐकून तो जरा विचारात पडल्यासारखा दिसला. नंतर," तुझ्या पणज्याचं वय किती?" हा प्रश्न विचारून मलाच कोड्यात टाकलं.

बाहुली – कुट्टीची गोष्ट

Submitted by SharmilaR on 26 September, 2022 - 00:55

बाहुली – कुट्टीची गोष्ट

"अडकित जाऊ , खिडकीत जाऊ खिडकीत होता बत्ता |
भुलोजीला लेक झाला , नाव ठेवा दत्ता ||
अडकित जाऊ , खिडकीत जाऊ खिडकीत होता गिलास |
भुलोजीला लेक झाला , नाव ठेवा विलास ||
अडकित जाऊ , खिडकीत जाऊ खिडकीत होत्या पिना |
भुलोजीला लेक झाली , नाव ठेवा मीना ||
अडकित जाऊ , खिडकीत जाऊ खिडकीत होतं कॅलेंडर |
भुलोजीला लेक झाला , नाव ठेवा अलेक्झांडर ||

गेले ते "मोरपंखी" दिवस.

Submitted by केशवकूल on 15 September, 2022 - 07:34

मी दहावी पास झाल्यावर माझ्या बाबांच्या माझ्याबद्दलच्या अपेक्षा फार वाढल्या. आपला मुलगा कमीत कमी इंजिनिअर होणारच होणार आणि लगेच पहिले विमान पकडून अमेरिकेला जाणार अशी दिवास्वप्ने त्यांना पडू लागली. ती स्वप्ने खरी झाली आहेत अश्या थाटांत कॉलर ताठ करून ते कॉलनीत फिरू लागले. तरी बरं मला फक्त एकोणसाठ टक्के गुण मिळाले होते. गणितात माझी अवस्था वादळांत सापडून वाताहात झालेल्या जहाजावरील खलाशासारखी होती. एखाद्या फळकुटाला पकडून, वादळ आणि लाटांनी अस्त व्यस्त मार खाऊन अर्धमेला झालेला खलाशी शेवटी देवाच्या दयेने किनाऱ्याला पोहोचतो तसा मी गणिताच्या पस्तीस गुणांच्या काठाला येऊन थडकलो होतो.

काकारहस्य

Submitted by केशवकूल on 14 September, 2022 - 02:52

“हेलो, नॅंसी, काय झालं?”
“बॉस, तीन सभ्य गृहस्थ आपल्याला भेटू इच्छितात. तुम्हाला वेळ असेल तर.....”
सेक्रेटरीने ‘सभ्य’ असा शब्द वापरून इशारा दिला होता. पण मी त्यांची भेट घायचे ठरवले. त्या आधी माझे पिस्तुल टेबलावर दिसेल अशा तऱ्हेने ठेवले. आणि सी सी टी वी वर नजर टाकली. खरेच जरा गुंडे दिसत होते खरे.
“ओके,” मी बेदरकारपणे नॅंसीला सूचना दिली.
“सर, पण जरा काळजी घ्या.”
तिघे जण माझ्या केबिन मध्ये घुसले.
“काय उकाडा आहे पुण्यात.” अस म्हणून एकाने फॅन फुल केला.
“अरे रूम एसी असताना फॅन कशाला लावलास?”

पार्टनर

Submitted by ध्येयवेडा on 13 September, 2022 - 14:16

"हट .. भें s s चो"

"काय रे, बसल्या बसल्या कोणाला शिव्या घालतोय?" पार्टनरनं विचारलं

मी फक्त नकारार्थी मान डोलावली.

"ओ साहेब, अशी अचानक शिवी हासडण्याची ही काय पहिली वेळ नाही आपली. कोणाला शिव्या घालतोय सांग?" - पार्टनर ऐकेना

पार्टनर

Submitted by ध्येयवेडा on 13 September, 2022 - 14:16

"हट .. भें s s चो"

"काय रे, बसल्या बसल्या कोणाला शिव्या घालतोय?" पार्टनरनं विचारलं

मी फक्त नकारार्थी मान डोलावली.

"ओ साहेब, अशी अचानक शिवी हासडण्याची ही काय पहिली वेळ नाही आपली. कोणाला शिव्या घालतोय सांग?" - पार्टनर ऐकेना

एका ग्रामीण पाटीचा अंत

Submitted by दत्तात्रय साळुंके on 12 September, 2022 - 06:31

टुकारवाडीचे सरपंच रामरावांना गावातल्या लोकांनी प्रगतीशील सरपंच अशी उपाधी बहाल केली होती. या कृतीत कुणी म्हणेल गावक-यांना त्यांचा आधुनिक दृष्टिकोन आवडला असेल पण तसं काही नाही. यासाठी त्यांची बायको लक्ष्मी हीचा मोठा वरदहस्त त्यांच्यावर होता.तिला रामराव लाडानं प्रगती म्हणतं. सरपंच शेतीवाडी अजिबात बघत नव्हते. शेतीकारण हे लक्ष्मीचं खातं. तिला शासनाने प्रगतीशील शेतकरी ही उपाधी देऊन गौरविले होते. म्हणून लोक रामरावला प्रगतीशील सरपंच म्हणत. म्हणजे मुख्यमंत्र्याच्या बायकोला मुख्यमंत्रीनबाई उपाधी आपोआप लागते तसं काहीसं.

शब्दखुणा: 

कथाशंभरी - भेट - मंजूताई

Submitted by मंजूताई on 11 September, 2022 - 23:34

बर्‍याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. गौरीच्या लग्नात शिल्पाला पाहिलं अन् तिला धक्काच बसला. तिला चुकवत गौरीला आशीर्वाद देऊन घाईघाईने ती बाहेर पडली. घरी आली. पलंगावर निपचीत पडून राहिली. आयुष्यात हा प्रसंग कधी येईल ही कल्पनाच तिने कधी केली नव्हती. रमेशने काय झाले विचारताच त्याच्या गळ्यात पडून रडू लागली. रडता रडता शिल्पा भेटल्याचं सांगितले. रमेश तिची समजूत घालत म्हणाला की आपण वरदाशी बोललो ना काही एक न लपवता व आपण सगळे मिळून तिचा शोध घेऊ असं प्रॉमिस केलं होतं ना .... होतं ना ?

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन