कथाशंभरी - भेट - मंजूताई

Submitted by मंजूताई on 11 September, 2022 - 23:34

बर्‍याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. गौरीच्या लग्नात शिल्पाला पाहिलं अन् तिला धक्काच बसला. तिला चुकवत गौरीला आशीर्वाद देऊन घाईघाईने ती बाहेर पडली. घरी आली. पलंगावर निपचीत पडून राहिली. आयुष्यात हा प्रसंग कधी येईल ही कल्पनाच तिने कधी केली नव्हती. रमेशने काय झाले विचारताच त्याच्या गळ्यात पडून रडू लागली. रडता रडता शिल्पा भेटल्याचं सांगितले. रमेश तिची समजूत घालत म्हणाला की आपण वरदाशी बोललो ना काही एक न लपवता व आपण सगळे मिळून तिचा शोध घेऊ असं प्रॉमिस केलं होतं ना .... होतं ना ? डोळे पूस ,लवकर छान तयार हो वरदा कॉलेजमधून येईलच एवढ्यात आपण शिल्पाला भेटायला जाऊ....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋन्मेष, धन्यवाद! कळतेय की नाही असं वाटत होतं म्हणून टाकू की नको टाकू विचार करत होते. प्रतिसाद संपादित करतो का

कळवून घेतली,पण मग गौरी कोण आहे?

मंजूताई, चांगला प्रयत्न.माझ्यासारख्याना कळण्यात अडचण आली असेल तर आबुदो.