गद्यलेखन

रंगल्या रात्री अश्या !!!!

Submitted by दिनेश. on 16 May, 2016 - 07:56

मी गेली ४० वर्षे तरी रात्रीचा केवळ ५ तास झोपत आलोय. कॉलेज सकाळचे असायचे, म्हणून त्या काळात जी सवय लागली लवकर उठायची, ती आजही कायम आहे. रात्री साडे अकरा ते पहाटे साडे चार, एवढी झोप मला पुरेशी होते.
पण ती लागते मात्र अतिशय गाढ. अगदी मला कुणी उचलून नेले तरी जाग येणार नाही अशी.

पण तेवढी झोप मात्र मला हवीच. जागरण मला जमत नाही. कधी घडलेच तर दुसरा दिवस वाईट जातो. आताशा माझे इमिरेटस चे विमान पहाटे साडेचारचे असल्याने, ती सर्व रात्र जागतच काढावी लागते, पण मग एकदा विमानात बसलो, कि थेट दुबईलाच जाग येते. विमान धावले कधी, उडाले कधी आणि उतरले कधी, ते अजिबात कळत नाही.

एक ओपन व्यथा १

Submitted by चेतन.. on 16 May, 2016 - 04:34

….

साधारण संध्याकाळची वेळ… गावातली एक साधारण मध्यवर्ती पेठ… खूप सारी गर्दी...
एक जण (डोकावत) : काय हो?
दुसरा (तोही मान उंचावत गर्दीत बघतोय): काय?
तोच एक जण: काय झालंय?
तोच दुसरा जण: काय माहित… गर्दी दिसली म्हणून घुसलोय.. काय झालंय देव जाणे…
तो एक जण पुन्हा एका तिसर्याला: ओ…
तिसरा: काय?
एक जण: काय झालंय?
तिसरा: नाही ओ माहित काही… काहीतरी झालंय खरं…
एक जण: ते तर मलापण कळतंय…
तिसरा: बहुतेक कोणीतरी मेलंय…
पुन्हा तो एक जण: मेलंय??? कि मारलंय??
तिसरा: काय माहित… पण असंच काहीतरी झालंय खरं…

बहुरुपी तुकोबा !!

Submitted by पुरंदरे शशांक on 16 May, 2016 - 00:17

बहुरुपी तुकोबा !!

नटनाट्ये अवघें संपादिलें सोंग । भेद दाऊं रंग न पालटे ॥१॥
मांडियेला खेळ कौतुक बहुरूप । आपुलें स्वरूप जाणतसों ॥ध्रु.॥
स्फटिकाची शिळा उपाधि न मिळे । भाव दावी पिवळे लाल संगे ॥२॥
तुका म्हणे आम्ही या जनाविरहित । होऊनि निश्चिंत क्रीडा करूं ॥३॥५६४

जाग

Submitted by कवठीचाफा on 15 May, 2016 - 23:29

" एकच मिनिट, आपलं काम झाल्यात जमा आहे " मेणबत्ती पेटवत योग्या कुजबुजला

" अरे पण.. हे बरं नव्हे यार " मी अपराधी स्वरात पुटपुटलो

" शू ... आवाज नको "

" तू चटका देणार त्याला ? " कळवळत म्हणालो मी

" थोडासाच, तू फक्त पाहत राहा रे " मेणबत्तीची ज्योत हळूच झोपलेल्या माधवच्या हाताला टेकवत योग्या म्हणाला " बस्स, आणखी एक -दोन वेळा, मग कळेलच गंमत "

माधवची किंचित हालचाल झाली पण अजूनही तो गाढ झोपेतच होता. योग्यानं त्याचा उपद्व्याप बंद केला आणि माझ्या दंडाला धरत बेडरूमच्या बाहेर काढलं

प्रवास

Submitted by श्वेता़क्षरा on 15 May, 2016 - 13:14

दोघांचं प्लानिंग आधीच झालेलं होतं. मेक, मॉडेल, रंग, सीट कव्हर्स, गणपती कुठे लावायचा ते अगदी थेट त्यावेळी पेन ड्राईव्ह मध्ये कुठली गाणी टाकायची आहेत इथपर्यंत. म्हणता म्हणता डाऊनपेमेंट जमलं, इ.एम.आय. अड्जस्ट झाला, दोघांनीही ड्रायव्हिंग क्लास लावला. तो जरा पटकनच शिकला. सवय ना रोजच्या बाईक च्या प्रवासाची. तीही शिकत होतीच जमेल तसं पण तिला चिंता नव्हती. नाहीच जमलं आपल्याला तर तो आहेच की ! ऐटीत ग्लासेस लावून, शिफॉन ची साडी नेसून कारमधे बसायचं. गेली काही वर्ष सक्त ताकीद होती ना, बाईकने जायचं असेल तर साडी नेसायची नाही. तिची चिडचिड व्हायची मग, पण आता कळी खुलली होती.

शब्दखुणा: 

गरीब श्रीमंत!

Submitted by झुलेलाल on 15 May, 2016 - 03:29

परवा मी रद्दी आणि काही जुनं सामान भंगारात देण्यासाठी काढलं, आणि बराच कचराही काढून टाकला. यात काही जुने कपडेही होते. भंगारात काही जुनी विजेची उपकरणे, काही भांडी, वगैरे होतं. आमच्याकडे नेहमी रद्दीसाठी येणाऱ्या भंगारवाल्याने ते सारं भंगार एका बॉक्समधे भरलं. त्यानं किती पैसे द्यावेत यावर मी कधीच घासाघीस करत नाही.
तो बॉक्स उचलून तो निघाला आणि मला कचऱ्याची पिशवी आठवली. खाली जाताजाता ती कचऱ्याच्या डब्यात टाकशील का, असं मी त्यालाच विचारलं, आणि त्याने खांद्यावरचा बॉक्स खाली ठेवून कचऱ्याची पिशवी उघडली.
आतले जुने कपडे पाहून त्याचे डोळे चमकत होते.

चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो - भाग १

Submitted by अस्मि_ता on 14 May, 2016 - 06:18

नमस्कार मंडळी .. हा माझा लेखनाचा पहिलाच प्रयत्न आहे . कृपया आपल्या प्रतिक्रिया आणि टिपण्णी जरूर द्या ..

"चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो" ... FM वर गाणं चालू होत..

शब्दखुणा: 

चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो - भाग १

Submitted by अस्मि_ता on 14 May, 2016 - 06:05

नमस्कार मंडळी .. हा माझा लेखनाचा पहिलाच प्रयत्न आहे . कृपया आपल्या प्रतिक्रिया आणि टिपण्णी जरूर द्या ..

शब्दखुणा: 

नेकलेस भाग २

Submitted by Chetan02012 on 13 May, 2016 - 16:02

साल्या मी बोललो म्हणून विचारलास तरी तिला. नाहीतर नुसता दिवसाढवळ्या स्वप्न पाहत बसला असतास तीची...
तस नाही रे राजा ..... She is different, तुला कस सांगू तेच कळत नाहीये रे ....
अबे मला काय सांगतोस.... मला सगळ माहितीये बे... मी आहे म्हणून तू आहेस... नेहमी लक्षात ठेव कोंबड्या ....
तुझी अशी फालतुगिरी चालते न म्हणून काही बोलावस वाटत नाही मला.....
गप बे.... माझी फालतूगिरी आयुष्यभर तुझ्या अंगचटीला आहे बघ .....
पण ती आल्यावर तुला आराम आहे राजा.....
लेट्स सी .....
वोह जब नजदीक होती हे तो साला पूरी दुनिया उलटी घुमने लागती हे यार .....
अबे पुराने मूव्ही के फ्लोप हिरो ... बंद पड......

शब्दखुणा: 

शृंगार १३

Submitted by अनाहुत on 9 May, 2016 - 07:55

दुस-याला काही शिकवणे किंवा तसा प्रयत्न करणे म्हणजे स्वतः दोनदा शिकणे अस म्हणतात . याचाच प्रत्यय यायला लागला होता . मलाही आता त्या सामाजिक कोप-याची गरज भासू लागली होती . याची सुरूवात सोसायटीमधून करायच ठरवल . ज्यांची थोडीफार तोंडओळख होती त्यांना जाता-येता स्माईल द्यायला सुरूवात केली . हळूहळू त्याला प्रतिउत्तरही मिळू लागल . ज्या लोकांशी थोडस बोलत होतो त्यांच्याशी संवाद थोडा वाढवला . सुरूवातीला बोलायला काही विषयच नाही सुचायचा पण अगदी जनरल टॉपिक पासून सुरूवात करून मग हळूहळू टॉपिक मिळू लागले . जितके वाटतात तितके लोक रूक्ष अबोल नसतात . फक्त एका स्टार्टरची गरज असते त्यांना .

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन