आपली नसतात मुले

Submitted by अमितकरकरे on 24 April, 2013 - 08:45

Your children are not your children
They are the sons and daughters of life’s longing for itself
They come through you but not from you
And though they are with you yet they belong not to you
You may give them your love but not your thoughts
For they have their own thoughts
You may house their bodies but not their souls
For their souls dwell in the house of tomorrow
Which you cannot visit not even in your dreams
You may strive to be like them but seek not to make them like you
For life goes not backward nor tarries with yesterday
~ Khalil Gibran

खलील जिब्रान यांच्या वरिल कवितेचे स्वैर रूपांतर

कितीही गाजवा मालकी, तरीही आपली नसतात मुले

जगण्यालाच येते हुक्की पुन्हा जन्माला यायची,
आपली प्रजनन-शक्ती ही इतकीच पुरेशी लायकी,
बाहेर येताच होते त्यांना अवकाश सगळे खुले,
कितीही गाजवा मालकी, तरीही आपली नसतात मुले

आपल्या प्रेमाखाली रुजते मायेची आसक्ती
संस्कारी-चमच्यात भरवितो थोटी विचारशक्ती
नाकारुनी या सर्वांवरती चढलेली ती पुटे,
कितीही गाजवा मालकी, तरीही आपली नसतात मुले

बांधतो घरट्याच्या नावाखाली आपण चार-भिंती
आकांक्षांना तोलून त्यांच्या, आपल्या निकषांवरती
स्वप्नांपुढती त्यांच्या ठरते आपले विश्वच थिटे,
कितीही गाजवा मालकी, तरीही आपली नसतात मुले

‘बदल’ हा एकच शाश्वत सत्य म्हणोनी राही
भूतासारखे भविष्य असणे कधीच होणे नाही
काळानुसार बदले तो फेऱ्यातून सहजी सुटे
कितीही गाजवा मालकी, तरीही आपली नसतात मुले

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान जमले आहे रुपांतर. मूळ काव्यच जबरी आहे. मुलेच काय तसे तर कोणीच आपले नसते आपण एक काल्पनिक खेळ खेळतो स्वतःला relevant ठेवण्याचा. हे कळण्याचा क्षण खरा मुक्तीचा.

मूळ कविता आणि भावानुवाद दोन्हीही तोलामोलाचे. भावानुवाद कसा असावा याचा उत्तम धडा दिलाय. आभार.

धन्यवाद.
खलील जिब्रान पर्यंत जाण्याचा प्रयत्न करणे हीच मोठी गोष्ट आहे.
खलील जिब्रान चा The Prophet सगळ्यांनी (विशेषकरून कवींनी आणि गझलकारांनी) वाचायला हवाच.

एक गोष्ट भावली नाही. यमकांचा आग्रह नसावा. गरजही नसावी.