कायापालट स्पर्धा "रंग नभाचे" प्रवेशिका ७ : रंग घराचे - kautukshirodakar
प्रवेशिका ७ : रंग घराचे
मूळ गझल : रंग नभाचे - कवी वैभव जोशी
रंग घराचे दिसादिसाला बदलत होते
कुठेतरी गळती़च असावी.. समजत होते
काल अचानक फार बरसले मिळून सारे
आज ढगांचे पाय कुठेही भटकत होते
जागोजागी सजले होते तडे, पोपडे
लोभस नव्हते, शोभत नव्हते .. चिडवत होते
नकोच आता पुन्हा चुना तो उभा आडवा
वरवर बघता भिंतीचीही फसगत होते
मी काही ठरवून पापुद्रे खरडत नाही
जे होते ते माझ्याकडुनी नकळत होते
उपदेशाचा डोस चुकीचा असेल तर मग..
केल्या गेल्या खर्चाचीही.. करवत होते
अधेमधे ती भिंत तुकडे टाकत होती